१० वीचा पेपर फुटला, पुणे मंडळ म्हणते, वृत्त चुकीचे बोर्डाच्या परिक्षेतील गैरप्रकार रोखण्यात सरकार व शालेय शिक्षण विभाग अपयशी?

१० वी च्या परिक्षेला आज सुरुवात झाली,मात्र या १० वी परिक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपर फुटल्याची घटना घडली. पेपर सुरु झाल्यानंतर पहिल्या १५ मिनिटातच प्रश्नपत्रिका बाहेर आली. त्यानंतर उत्तर पत्रिकेच्या छायाकिंग प्रत काढून विद्यार्थ्यांना पुरविल्या गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. जालन्यात हा प्रकार घडल्यानंतर यवतमाळ येथेही असाच प्रकार घडला. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले.

तर राज्याच्या मराठवाड्यातील काही भागात परिक्षा केंद्रावर कॉपी पुरविण्याचे प्रकार सुरु राहिले. त्यामुळे राज्य सरकारने जाहिर केलेल्या कॉपीमुक्त महाराष्ट्राच्या अभियानाचा फज्जा उडाला आहे.

दरम्यान या प्रकरणावरून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा तथा माजी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, राज्य सरकारने बोर्डाच्या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी मोठमोठ्या घोषणा केल्या होत्या. पण दहावीच्या परीक्षेतील पहिल्याच दिवशी या घोषणांची हवा निघून गेली. बारावीचा पेपर देखील एका झेरॉक्स सेंटरमध्ये सापडला होता. सरकार आणि शालेय शिक्षण विभाग परिक्षेतील गैरप्रकार रोखण्यात अपयशी का ठरत आहे? असा सवाल करत पेपरफुटी प्रकरणातील सर्व दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी आणि असे प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी निर्णायक पावले उचलावीत, अशी मागणी केली.

बोर्डाच्या परिक्षेतील गैरप्रकार रोखण्यात अपयशी ठरलेल्या सरकारवर तोफ डागत खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, राज्य मंडळाच्या दहावीच्या पहिल्याच दिवशी पेपरफुटीची घटना घडल्याची बातमी अत्यंत निंदनीय आणि चिंताजनक आहे. तरुण पिढी मोठ्या मेहनतीने परीक्षांची तयारी करते, अशा परिस्थितीत पेपरफुटी आणि कॉपीचे प्रकार होणे म्हणजे प्रामाणिक विद्यार्थ्यांवर सरळसरळ अन्याय आहे, त्यांच्या भविष्याशी खेळ आहे. तरुणांच्या स्वप्नांचा चुराडा करण्याचा अधिकार कोणालाही नाही. राज्य सरकार व परीक्षा महामंडळाच्या गहाळ कारभारामुळेच असे गैरप्रकार वाढत आहेत. राज्य सरकारने केवळ गाजावाजा करून जबाबदारी झटकू नये तर अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी ठोस आणि परिणामकारक उपाययोजना त्वरित जाहीर कराव्यात असेही यावेळी सांगितले.

तर पुणे मंडळाचा दावा बातमी चुकीची

मुंबई महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका पहिल्याच दिवशी फुटल्याची बातमी बाहेर आली असताना राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पेपरफुटीचे वृत्त खरे नसल्याचा दावा केला.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सांगितले की, जालना येथील बदनापूर परीक्षा केंद्रावरील पेपरफुटी प्रकरणाच्या चौकशीदरम्यान असे आढळून आले की प्रश्नपत्रिकेतील दोन पाने मूळ प्रश्नपत्रिकेतील नव्हती तर ती एका खाजगी प्रकाशकाने प्रकाशित केली होती. काही हस्तलिखित पाने देखील सापडली. याचा अर्थ असा की पेपर लीक झाला नव्हता तर प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न आणि उत्तरे लोकांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने व्हायरल करण्यात आली होती. या घटनेची गांभीर्याने दखल घेत, जिल्हा प्रशासनाला या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आणि दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव कोठारी परीक्षा केंद्रावर मोबाईलवरून प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याची बातमी आली होती. अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी केली आणि असे आढळून आले की प्रश्नपत्रिका लीक झाल्या नव्हत्या तर जनतेची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने त्या प्रसारित केल्या गेल्या होत्या. या प्रकरणात दोषी व्यक्तींविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

About Editor

Check Also

शेतकरीविरोधी भाजपा सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेसची ‘अन्नदाता संघर्ष पदयात्रा’ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वाखाली मानेगाव ते जळगाव जामोद पदयात्रा

केंद्रातील व राज्यातील भाजपा महायुतीच्या मागील १२ वर्षांच्या काळात शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतमालाला भाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *