मुंबई: प्रतिनिधी दिल्लीच्या निजामुद्दीन येथे तब्लिगीने मरकजचे आयोजन केले होते. यामध्ये राज्यातील हजारो लोक सहभागी झाले, काही लोकांनी कदाचित कोरोना रोगाला बरोबर घेवून प्रवास केल्याचे नाकारता येत नसल्याने हा रोग फैलावतो की काय असे चित्र दिसत आहे. यापार्श्वभूमीवर ८ एप्रिल २०२० रोजी मुस्लिम समुदायाने हयात नसलेल्यांना कब्रस्तानमध्ये जावून स्मरण न …
Read More »आक्रोशाची टाळी, तृतीय पंथीयांना कोणी देईल का भाजी पोळी ? स्नेहालय संस्थेकडून देणगीसाठी आवाहन
अहमदनगर, दिनांक ३० मार्च २०२०: कोरोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दिनांक १४ एप्रिल पर्यंत संपूर्ण देशात लॉक डाऊन म्हणजेच संचारबंदी सदृश्य परिस्थिती लागू केली आहे. त्यामुळे अनेक शोषित-वंचित-दुर्लक्षित-उपेक्षित घटकांतील समुदायांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यात तृतीयपंथी समुदायाचा देखील समावेश आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एकूण १५० पेक्षा जास्त तृतीयपंथीसमुदाय आहे. समाजाने वाळीत टाकल्याने यांच्याकडे भीक मागून खाण्याशिवाय पर्याय नाही. …
Read More »सर्व दिव्यांगांसाठी खुषखबर, रेशन आणि किट मिळणार एक महिन्याची पेन्शन ऍडव्हान्स देण्याचा सामाजिक न्याय विभागाचा निर्णय
मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या संकटकाळी राज्यातील दिव्यांग बांधवांना दिलासा देण्यासाठी लॉकडाऊनच्या कालावधीत हालचाल न करू शकणाऱ्या दिव्यांगांना एक महिन्याचे रेशन व आरोग्यविषयक किट घरपोच वाटप करण्यात येणार असून, यामध्ये धान्य, कडधान्य, डाळी, तांदूळ, तेल इत्यादी साहित्यासह सॅनिटायझर, मास्क, रुमाल, साबण, डेटॉल, फिनेल आणि आरोग्यविषयक साहित्याचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती …
Read More »घरेलु कामगार कल्याण मंडळामार्फत घर मोलकरणींना पैसे द्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय घरकामगार चळवळीची मागणी
मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने लॉकडाऊन केले आहे. या पार्श्वभूमीवर घरकामगार आणि त्यांच्या मालकांनी संमतीने काम बंद केले. परंतु त्यांचा रखडलेला मार्चचा पगार लगेच मिळणे शक्य नसल्याने या घरकामगार मोलकरणींना पैसे देण्यासाठी राज्य सरकारनेच स्थापन केलेल्या घरेलु कामगार मंडळाच्या खात्याकडून थकबाकीची रक्कम देण्यात यावी …
Read More »कोरोना प्रभाव: रोजगारबाधीतांच्या मध्यान्ह भोजनासाठी देह व्यापारातील महिलांची मदत स्नेहालय - अनाम प्रेम परिवाराच्या पुढाकाराने १२३० कुटुंबियांना भोजन
अहमदनगर: प्रतिनिधी कोरोनामूळे अहमदनगर मधील झोपडपट्ट्यातील रोजगारबाधीत १२३० कुटुंबांना मध्यान्ह भोजन देण्यात स्नेहालय – अनाम प्रेम परिवाराने पुढाकार घेतला. यासाठी येथील वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांनी मदतीचा हात देत ७ हजार रूपयांची मदत देत एक अनोखा आदर्श समाजापुढे निर्माण केला. नगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी कोरोना पासून बचाव करण्याबाबत सर्व काळजी घेण्याची …
Read More »नांदेडमधल्या कामेश्वरच्या धाडसाचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारासाठी शिफारस
मुंबई: प्रतिनिधी नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात असलेल्या घोडज गावातील, कामेश्वर जगन्नाथ वाघमारे या १४ वर्षाच्या आठवीतील धाडसी विद्यार्थ्यांने, मानार नदीच्या पाण्यात बुडत असलेल्या, दोन शाळकरी मुलांचा जीव वाचवला. कामेश्वरीने नदीत उडी घेऊन मोठ्या धाडसाने या दोघा मुलांना नदीतून बाहेर काढले. या कौतुकास्पद कार्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान भवनातील त्यांच्या …
Read More »संत गाडगेबाबांच्या दशसूत्रीवर कारभार चालविण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही मंत्रालयात दशसूत्रीचे अनावरण
मुंबई : प्रतिनिधी संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्री शिकवणीनुसार महाविकास आघाडीचे सरकार काम करेल, हा विश्वास दर्शविणाऱ्या फलकाचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ केले. संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्रीनुसार आपले सरकार काम करेल आणि या दशसूत्रीचा फलक मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळ लावण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी नागपूर येथील अधिवेशनात केली होती. त्यानुसार या मार्बल …
Read More »समाजाच्या वेलीवर फुटलेली सहृदयाची “पालवी” मंगल शहा एक धीरोदात्त आधारछाया
एच आय व्ही (एड्स) हा समाजाला भेडसावणाऱ्या ज्वलंत प्रश्न. एचआयव्हीच्या अज्ञानातून पदरी उपेक्षा आलेल्या बालकांना स्मशानभूमी, रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड, कचराकुंडी अशा ठिकाणी सोडून दिले जाते. या बालकांना सांभाळण्यासाठी मंगल शहा यांनी पंढरपूर येथे पालवी संस्थेची स्थापना केली. पंढरीला आल्यावर विठ्ठलाचे दर्शन घ्या, कैकाडी महाराजांचा मठ पहा; पण त्याच बरोबर …
Read More »वेश्यांची सहेली… आत्मभानातून जगण्याची नवी ऊर्जा देणारी संस्था
उद्धरेत् आत्मना आत्मानम् हे गीतेचे वचन. त्यांनी ते वचन प्रत्यक्ष कृतीत उतरवले आहे. त्यांच्या जगण्याचे ते सूत्र बनले आहे. वेश्या व्यवसायात ओढल्या गेलेल्या मात्र त्यातून बाहेर पडू इच्छिणाऱ्या आणि त्यातील वय झालेल्या स्त्रियांना स्वत:च्या पायावर उभी करणारी संस्था म्हणजेच सहेली! वेश्या व्यवसायातील दहा बारा महिलांनी एकत्र येऊन सहेलीची स्थापना केली. …
Read More »मुकबधिरांची तेजोमयी यशोदीप रामेश्वरीच्या हसऱ्या चेहऱ्याने मुकबधिरांच्या जीवनाला फुटला कंठ
माणसाचा जन्म आहे हा! म्हणजे संकटे आलीच. विविधरुपांनी ती आपल्यासमोर येतात. मग घाबरायचं कशाला? संकटावर मात करुन आपलं आयुष्य जगायचं. जे होणार असतं, घडणार असतं ते ते होत राहणारच, घडणारच. पण, त्यामुळं डगमगून न जाता पुढं चालतच रहायचं. आल्या प्रसंगाला हसत सामोरं जाणं, झालेलं नुकसानही हसण्यावारी न्यायचं. आपला हसरा चेहरा …
Read More »
Marathi e-Batmya