सामाजिक

देशातील महापुरूषांच्या आदर्श शिकवणूकीचा विद्यार्थ्यांना भीम आर्मी पाठ देणार भीम आर्मी जून महिन्यापासून महाराष्ट्रभर ५०० पाठशाळा सुरु करणार

मुंबई : प्रतिनिधी विद्यार्थ्यांमध्ये महापुरुषांविषयी जागरूकता व देशाचा आदर्श नागरिक घडविण्याच्या दृष्टीने उत्तर प्रदेशच्या धर्तीवर मुंबईसह महाराष्ट्रात जवळपास ५०० भीम पाठशाळा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र  प्रमुख अशोकभाऊ कांबळे  यांनी दिली. १ जूनपासून किमान ५००  पाठशाळा महाराष्ट्रभर  सुरु करण्यात येणार असून त्यासाठी इच्छुक शिक्षकांना व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत संपर्क साधण्यात येणार असल्याचे …

Read More »

वीरशैव-लिंगायत समाजाच्या मागण्या सोडविण्याचा प्रयत्न करू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी महात्मा बसवेश्वर यांनी मानवतेला भेदभाव विरहीत आणि प्रगतीकडे जाणाऱ्या समाजाचा विचार दिला. वीरशैव लिंगायत समाज त्या विचारांचा पाईक आहे. त्यामुळे या समाजाच्या मागण्यांच्या सोडवणुकीबाबत शासन सकारात्मक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. महात्मा बसवेश्वर यांच्या मंगळवेढा येथील प्रस्तावित स्मारकाचे कामही लवकरच सुरु केले जाईल, असेही …

Read More »

बौद्ध विवाह कायदा तयार करण्यात आता नागरीकांचाही सहभाग महत्वाचा कायद्याच्या मसुद्यासंदर्भात हरकती व सूचना करण्याचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील बौद्ध समाजासाठी बौद्ध मंगल परिणय (विवाह) कायद्याचा मसुदा सामाजिक न्याय विभागाच्या https://sjsa.maharashtra.gov. in व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे, यांच्याhttp://www.barti.in या संकेतस्थळावर एक महिन्याकरिता प्रसिद्ध करण्यात आला आहे. या कायद्याच्या तरतुदींबाबत जनतेच्या काही हरकती किंवा सूचना असल्यास त्या ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्याचे आवाहन सामाजिक न्याय विभागाचे अवर सचिव यांनी …

Read More »

अण्णा हजारेंना हवेत व्यवस्था परिवर्तनासाठी कार्यकर्त्ये फक्त सत्ता बदलल्याने देशात खरे परिवर्तन होत नाही तर व्यवस्था परिवर्तन गरजेचे

मुंबई : प्रतिनिधी दिल्लीतील मोदी सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नी पुकारलेल्या आंदोलनाचा फियास्को झाल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आता पुन्हा व्यवस्था परिवर्तन चळवळ उभारण्याची तयारी सुरु केली आहे. विशेष म्हणजे या चळवळीसाठी नव्याने कार्यकर्त्ये जमा करण्यासाठी प्रयत्न सुरु असून  भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे राज्यात मध्यवर्ती कार्यकारी मंडळाच्या माध्यमातून प्रत्येक …

Read More »

मराठा आरक्षणाबाबत १५ दिवसात निर्णय न घेतल्यास आंदोलन छेडणार मराठा क्रांती मोर्चाचा सरकारला इशारा

मुंबई : प्रतिनिधी येत्या पंधरा दिवसात मराठा क्रांती मोर्चाच्या आरक्षणाच्या मागणीसह अन्य मागण्यांबाबत राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी जर केली नाही, तर आतापर्यंत सरकारने  समाजाचे मूक मोर्चे पहिले आहेत. पण  समाजाचा उद्रेक झाल्यास त्याला सरकार जबाबदार राहील असा इशारा मराठा कृती मोर्चाने  दिला आहे. मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली …

Read More »

अनामप्रेमच्या दोन दिव्यांग कन्यांना मिळाले जीवानाचे साथीदार वधू-वर मेळाव्यात ४०० जणांनी नोंदविला सहभाग

अहमदनगर : प्रतिनिधी समाजात पालक असूनही अनेक सदृढ व्यक्तींचे विवाह होत नाहीत. मात्र समाजात आणि जगात ज्यांचे कोणी नाहीत अशासाठी स्नेहाच्या अर्थात प्रेम आणि मैत्रीच्या भावनेतून अनामप्रेमाच्या मायेतून त्यांचा सांभाळ करणे आणि त्यांना मनुष्य म्हणून जगायला समर्थपणे उभे करणाऱ्या स्नेहालयच्या अनामप्रेमच्या दोन दिव्यांग कन्यांचा विवाह काल रविवारी २९/०४/२०१८ रोजी पार …

Read More »

६१ वर्षपूर्तीच्या निमित्ताने ‘संत तुकाराम’च्या प्रयोगात माऊलींचा भव्य सत्कार गृह राज्यमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते सत्कार

मुंबई : प्रतिनिधी दादा महाराज मोरे माऊलींच्या ६१ वर्षपूर्तीच्या निमित्ताने संगीत ‘संत तुकाराम’ या नाटकाच्या मंचावर त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी बोलताना माऊलींनी आपले विचार प्रकट केले. या सोहळ्याला गृहमंत्र्यांसोबत किर्तनकार आत्माराम महाराज बडे उपस्थित होते. श्री वारकरी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्यामसुदर सोन्नर महाराज यांच्या प्रयत्नांनी या सत्कार सोहळ्याचं …

Read More »

दिव्यांगाना नवा आपलं साथीदार देणारा कार्यक्रम दिव्यांग वधू-वर मेळाव्याचे अनामप्रेममध्ये आयोजन

अहमदनगर : प्रतिनिधी स्नेहालय संचलित अनामप्रेम या संस्थेच्यावतीने महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या दिव्यांगांसाठी  वधू-वर मेळावा येत्या शनिवार २८ एप्रिल २०१८ रोजी सकाळी १० ते ४ या वेळेत  आयोजित करण्यात आला आहे. सर्व प्रकारच्या दिव्यांगासाठी असणारा हा मेळावा निंबळक गाव येथील स्नेहालयच्या सत्यमेव जयते ग्राम या प्रकल्पात होणार आहे. या मेळाव्यात संपूर्णतः मोफत प्रवेश …

Read More »

राज्यातील कामगारांना आधुनिक वैद्यकीय सुविधा आणि उपचार मिळणार राज्य कामगार विमा सोसायटी स्थापन करण्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कामगारांना अतिविशिष्ट वैद्यकीय उपचारांसह आधुनिक वैद्यकीय सुविधा सुलभतेने व परिणामकारकरित्या पुरविण्यासाठी राज्य कामगार विमा सोसायटीची स्थापना करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यातील कामगारांच्या आरोग्य सुरक्षेच्यादृष्टीने केंद्र शासनाच्या अधिपत्याखालील राज्य कामगार विमा महामंडळ यांच्याकडून राज्य कामगार विमा योजना राज्यातील एकूण २२ जिल्ह्यांमध्ये ४३ …

Read More »

भिमा कोरेगाव दंगलीतील साक्षीदार पूजा सकट हिची आत्महत्या की हत्या ? सखोल चौकशीची प्रवक्ते महेश तपासे यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी भिमा कोरेगाव दंगलीतील मुख्य साक्षीदार असलेल्या पूजा सकट हिचा संशयास्पद मृत्यू झाला असून तिने आत्महत्या केली की तिची हत्या झाली याची सखोल चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. भीमा कोरेगाव दंगलीमध्ये ज्या पूजा सकट हिच्या घरावर हल्ला करण्यात आला होता. …

Read More »