सामाजिक

अर्धा टक्काही आरक्षण कमी केले जाणार नाही मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही

नागपूर : प्रतिनिधी वैद्यकीय शिक्षण शिक्षणामध्ये कोणत्याही समाजाच्या आरक्षणात कपात केलेली नाही. मात्र तसे जर वाटत असले तर ओबीसींचे पूर्ण आरक्षण त्यांच्यासाठी देण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. वैद्यकीय प्रवेशासाठी असलेले प्रादेशिक आरक्षण रद्द करण्याबाबतचा प्रश्न काँग्रेसचे आमदार डी.पी.सावंत यांनी विधानसभेत उपस्थित केला. त्यास उत्तर देताना …

Read More »

मुस्लिम ओबीसी समाजाचे प्रश्न सोडवणार – मंत्री प्रा. राम शिंदे ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्ग.ला आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी मुस्लिम ओबीसी समाजाच्या प्रश्नांसंदर्भात लवकरच बैठक घेऊन सकारात्मक मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन राजशिष्टाचार व ओबीसी कल्याण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिले. ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या शिष्टमंडळाने मुस्लिम ओबीसी समाजाच्या मागण्यांसंदर्भात राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अंसारी यांनी पदाधिकाऱ्यांना आदेश दिल्यानंतर शिंदे यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत …

Read More »

‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती’करिता अर्ज करण्याचे आवाहन १० जुलै पर्यंत अर्ज करण्याचे साठे महामंडळाक़डून आवाहन

मुंबई : प्रतिनिधी मुंबई शहर-उपनगर जिल्ह्यातील मातंग समाजातील १२ पोटजातीतील सरासरी ६०% पेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांकडून सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठी ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती’ करिता महामंडळाकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ज्येष्ठता व गुणक्रमांकानुसार यासाठी निवड करण्यात येणार आहे. या पोटजातीमध्ये मांग, मातंग, मिनी मादीग,मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा यांचा समावेश आहे. …

Read More »

एमपीएससी आणि वैद्यकीय प्रवेशात मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर अन्याय कॉंग्रेस आमदार हरिभाऊ राठोड यांचा सरकावर आरोप

मुंबई : प्रतिनिधी एमपीएससी परिक्षेतील उत्तीर्ण होणाऱ्या मागासवर्गीय परिक्षार्थी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर राज्य सरकारकडून अन्याय करण्यात येत आहे. या दोन्ही ठिकाणी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना चांगले मार्क आणि मार्काच्या आधारे खुल्या प्रवर्गातून प्रवेश मिळत असला तरी या विद्यार्थ्यांपेक्षा खुल्या प्रवर्गातील कमी मार्क मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देवून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना …

Read More »

प्लास्टिकच्या कारखान्यावर धाडी टाकून गुन्हे दाखल करा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी प्लास्टिकची उत्पादने तयार करणाऱ्या कारखान्यांवर तातडीने धाडी टाकून गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिले. राज्यातील विविध शहरातून किती प्लास्टिक जमा होते, त्यावर रिसायकलिंग केले जाते का ?  याचा अहवाल आठ दिवसात द्यावा. पर्यटन स्थळे व तीर्थस्थळे, यात्रा, उत्सवाच्या वेळी भाविकांना, ग्राहकांना दिल्या …

Read More »

आदीवासी समाजाच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समित्याची पदे भरण्याचे आदेश कोळी समाज समन्वय समितीच्या प्रयत्नाला यश

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील अनुसूचित जमातीमधील जातींना तातडीने जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी तपासणी समित्यांची पदे भरण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आदेश दिले. या आदेशानुसार अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्यांची रिक्त पदे भरण्याबाबत आदीवासी कोळी समाज समन्वय समितीने केलेल्या प्रयत्नाला यश आले असून आदीवासी मंत्री विष्णू सवरा यांनी याबाबत आदेश …

Read More »

मंत्रालयात महापुरूषांच्या विचारांचा जागर महापुरूषांची संयुक्तीक जयंती उत्साहात साजरी

मुंबई : प्रतिनिधी “शिवराया – भिमराया दोघांनी झिजवली काया दोघांचाही जगी गाजावाजा एक रयतेचा राजा एक विद्येचा राजा…” या पक्तींनी मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगण दुमदुमुन गेले होते. सप्तखंजेरी वादक प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी आपल्या प्रबोधनात्मक अभंगाने आणि खंजेरीच्या खिळवुन ठेवणा-या नादाने प्रसन्नावस्थेतील वातावरण अधीकच मोहक केले…निमीत्त होते मंत्रालयातील अनुसुचित जाती, जमाती, …

Read More »

मातोश्री रमाबाई यांचे जीवन भारतीय महिलांना प्रेरणादायी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे प्रतिप्रादन : पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

पुणे : प्रतिनिधी मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या जीवनाकडून प्रत्येक भारतीय महिलेने प्रेरणा घेण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज येथे केले. पुणे महानगरपालिकेच्या मातोश्री रमाबाई आंबेडकर उद्यानात राज्यातील पहिल्या मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या  हस्ते अनावरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. …

Read More »

भूमिहीन शेतकऱ्यांना जमिन घेण्यासाठी सरकार दुप्पट रक्कम आणि अनुदान देणार अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा-राजकुमार बडोले

मुंबई : प्रतिनिधी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांना शेत जमिन खरेदी करण्यासाठी आता चार एकर कोरडवाहूसाठी वीस लाख तर दोन एकर बागायती शेतीसाठी १६ लाख रूपये देण्याचा तसेच या रकमेवर तब्बल १०० टक्के अनुदान देण्याचा महत्वपूर्ण निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण …

Read More »

आदीवासी विद्यार्थी आश्रमशाळा असूनही मुलभूत सुविधांपासून वंचित जव्हार, डहाणू, शहापूर तालुक्यातील आश्रमशाळांकडे सरकारचे दुर्लक्ष

मुंबई : कविता वरे ग्रामीण व आदिवासी भागात प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अनुदानित व शासकीय आश्रमशाळा वसलेल्या आहेत. ह्या भागात आश्रमशाळा आदिवासी विद्यार्थ्याच्या शिक्षणाचे मुख्य माध्यम आहे. ह्या भागातील सामान्य विद्यार्थी हे ह्या शाळांमधून शिक्षण घेताना दिसून येतात. मात्र राज्य शासनाचा ह्या आश्रमशाळांमधून शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आजही खेळायला क्रिंडागणे, …

Read More »