मुंबई: प्रतिनिधी
अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिवाळी निमित्ताने शिधापत्रिकाधारकांसाठी चांगला निर्णय घेतला आहे. आता शिधापत्रिका धारकांना प्रती कार्ड 1 किलो याप्रमाणे साखर वाटप करण्यात येणार आहे. प्राधान्य कुटुंबातील कार्डधारकांना सदर साखरेचे प्रति कुटुंब 1 किलोप्रमाणे व प्रतीकिलो 20 रु. दराने नोव्हेंबरच्या अन्नधान्य वाटपासोबत e PoS द्वारे वितरण करण्यात येणार आहे. तर, प्रति कार्ड 1 किलो चणाडाळ व एक किलो उडीद डाळ किंवा दोन्ही पैकी कोणतीही एक डाळ 2 किलो, प्रतिकिलो 35 रु. दराने उपलब्ध होणार आहे. या निर्णयामुळे शिधापत्रिकाधारकांची दिवाळी गोड होणार आहे.
मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रातील प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी कुटुंबांना येत्या नोव्हेंबरमध्ये दिवाळी सणानिमित्त प्रती कार्ड 1 किलोप्रमाणे साखर वाटप करण्याचा निर्णय शासना निर्णयानुसार मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्राकरिता शासनाने 12 हजार 500 क्विंटल साखर उपलब्ध करुन दिली आहे. तसेच मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना 885 मे. टन चणाडाळ व 442 मे.टन उडीद डाळ उपलब्ध करुन देण्यात आली. सदर डाळ प्रती कार्ड 1 किलो चणाडाळ व एक किलो उडीदडळ किंवा दोन्ही पैकी कोणतीही एक डाळ 2 किलो, प्रतिकिलो रु. 35/- या दराने उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
सर्व पात्र लाभार्थींनी आपल्या हक्काच्या शिधावस्तुंची (सवलतीतील साखर, डाळ व इतर शिधाजिन्नस ) पावती घेऊनच उचल करावी, असे आवाहन नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांनी केले आहे.
Tags food and drug minister girish bapat sugar
Check Also
माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भाचीची गळफास घेऊन आत्महत्या नैराश्याने ग्रस्त असल्याने केली आत्महत्या
पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भाची मंगळवारी बीरभूम जिल्ह्यातील तिच्या घरी गळफास घेतलेल्या …
Marathi e-Batmya