विशेष बातमी

केंद्रीय मंत्री दानवेंचा व्हिडीओ ट्विटरने ठरविला पोटेंन्शियल सेन्सिटीव्ह विभागाने केलेल्या कामाच्या जाहिरातीचा व्हिडिओ

मुंबई : विशेष प्रतिनिधी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीसह संपूर्ण देशभरात शेतकऱ्यांकडून आंदोलने करण्यात येत आहेत. तर दुसऱ्याबाजूला भाजपा केंद्रीय मंत्र्यांकडून कृषी विभागाशी संबधित असलेल्या विभागांनी काय काय कामे केली याची जाहिरात करण्यात येत आहे. अशाच पध्दतीचा एक व्हिडिओ केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या ट्विटर अकॉऊंटवर …

Read More »

मंत्रालयीन कर्मचाऱ्यांनो, दोन वेळा उशीरा आलात तर माफी, ३ ऱ्यांदा थेट रजा वजा राज्य सरकारकडून आदेश जारी

मुंबई : प्रतिनिधी मंत्रालयात काम करणारे ७ हजार ५०० कर्मचारी-अधिकाच्यांबरोबर राज्यातील सर्व शासकिय कार्यालयातील कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या  उपस्थितीबाबत नव्याने आदेश सरत्या वर्षाच्या शेवटी राज्य सरकारने जारी केले असून उशीराने येणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वागणूकीला चाप लावण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने एक नवा आदेश जारी केला आहे. त्यानुसार दोन वेळा उशीराने येणे माफ केले जाणार आहे. …

Read More »

उपजिल्हाधिकाऱ्यांसाठी खुशखबर : पद भरती प्रमाण आणि सेवाज्येष्ठता निश्चित न्यायालय, मॅटच्या अनेक दट्यानंतर अखेर महसूल विभागाच्या विशेष सेलकडून धोरण जाहीर

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील महसूल विभागाच्या अखत्यारीत कार्यरत असलेल्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या एकूण पद संख्या आणि पदोन्नती, थेट भरतीतून येणाऱ्यांचे प्रमाण आतापर्यत निश्चित नव्हते. मात्र न्यायालय, मॅटने अनेकवेळा आदेश दिल्यानंतर अखेर महसूल विभागाने याबाबतचे अंतिम धोरण तयार केले असून सेवाज्येष्ठता यादीही जाहीर केली. मागील अनेक वर्षे उपजिल्हाधिकाऱ्यांची पदसंख्या निश्चित करण्यात आली नव्हती. …

Read More »

करदात्यांना दिलासा: आयकर भरण्याची मुदत वाढविली आयकर विभागाकडून प्रसिध्दी पत्रकाद्वारे माहिती

मुंबई: प्रतिनिधी देशातील आयकरदात्यांना ३१ डिसेंबर २०२० अखेरपर्यंत आपला कर भरण्याची वाढीव मुदत देण्यात आली होती. मात्र आता या मुदतीत आयकर विभागाने पुन्हा १० दिवसांची  मुदत वाढ दिली असून आज ज्यांना कर भरणा आणि कर परताव्याचा अर्ज भरता आला नाही त्यांच्यासाठी १० जानेवारी २०२१ पर्यतची मुदतवाढ देण्यात आली आहे. तर …

Read More »

इमारती, गृहनिर्माण संस्थाना जमिनीची मालकी प्रदान करण्यासाठी विशेष मोहिम १ ते १५ जानेवारी दरम्यान डीम्ड कन्व्हेअन्स विशेष मोहिम- सहकार मंत्री बाळासाहेब पाटील

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील गृहनिर्माण संस्थांची संख्या विचारात घेता प्रत्यक्षात गृहनिर्माण  संस्थेचे मानीव अभिहस्तांतरण झालेल्या संस्थांची संख्या अल्प आहे. मानीव अभिहस्तांतरण प्रक्रियेची माहिती सहज उपलब्ध व्हावी आणि ही प्रक्रिया सुलभ व्हावी म्हणून संस्थासाठी १ ते १५ जानेवारी २०२१ पर्यंत मानीव अभिहस्तांतरण (डीम्ड कन्व्हेअन्स) विशेष मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. या …

Read More »

या खेळाडूंना राज्य सरकारने दिले प्रत्येकी ५० लाख रूपये ऑलम्पिंक स्पर्धेच्या तयारीसाठी प्रोत्साहन निधी

मुंबई : प्रतिनिधी टोकियो ऑलिम्पिक २०२१ मध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंना पूर्व तयारीसाठी प्रोत्साहन म्हणून प्रत्येकी ५० लाख रुपये असे २.५० कोटी रक्कम आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आली. वर्षा येथील समिती कक्षात झालेल्या कार्यक्रमात स्वरूप उन्हाळकर ( शूटिंग पॅराऑलिम्पिक), राही सरनोबत ( शूटिंग),  तेजस्विनी सावंत ( शूटिंग), प्रवीण जाधव …

Read More »

३१ डिसेंबरला अलविदा करून नववर्षाचे स्वागत करायचेय? मग या सूचना वाचा राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई : प्रतिनिधी मदत व पुनर्वसन विभागाने एका आदेशान्वये राज्यात २२ डिसेंबर,२०२० ते ५ जानेवारी, २०२१ या कालावधीत रात्री ११.०० ते सकाळी ६.०० वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. कोविड  -19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता त्याचप्रमाणे वरील आदेशान्वये दिलेल्या सूचना विचारात घेता ३१ डिसेंबर २०२० व नूतन वर्षाचे स्वागत अत्यंत साधेपणाने करणे अपेक्षित आहे. त्या दृष्टीने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत. कोरोनाच्या …

Read More »

आठवलेंना त्यांच्याच कविता स्टाईलमधून गृहमंत्र्यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या वाढदिनाचे औचित्य

मुंबई : प्रतिनिधी आज नाताळचा दिवस असल्याने सर्वत्र उत्सवाचे वातावरण असताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा वाढदिवस आहे. या दिनाचे औचित्य साधत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असून देशमुखांनी आपल्या खुमासदार शैलीतून कविता रंगवली आहे. वाचू या त्यांच्याच भाषेतील कविता. बाहेर पडलीय थंडी घालून बसा बंडीबाहेर फिरू …

Read More »

या ९६ पोलिस निरिक्षकांना मिळाल्या तात्पुरत्या पदोन्नत्या गृहविभागाकडून पदोन्नतीचे आदेश जारी

मुंबई: प्रतिनिधी मागील तीन वर्षापासून रखडलेल्या ९६ पोलिस निरिक्षकांच्या रखडलेल्या पदोन्नतीचे आदेश आज गृहविभागाने जारी केले. या ९६ अधिकाऱ्यांमध्ये २०१७-१८ आणि २०१८-१९ आणि २०१९-२० या तीन वर्षातील निवड सूचीतील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यातील पोलिस निरिक्षकांना उप अधिक्षक आणि सहाय्यक पोलिस आयुक्त पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या सर्व …

Read More »

शेतकऱ्यांकडील ३७ हजार कोटींच्या वसुलीसाठी ग्रामपंचायतीसह या संस्थाची नियुक्ती नव्या वीज धोरणास राज्य सरकारची मंजूरी

मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्यातील कृषीपंपधारक ४२ लाख ६० हजार ४३१ शेतकऱ्यांकडील ३७ हजार कोटी रूपयांची वसुली तसेच दर महिन्याच्या कृषीपंपधारक आणि अकृषिक वापर कर्त्यांकडून थकित आणि मासिक वीज बिलाची वसुली करण्यासाठी ग्रामपंचायती, वीज वितरण कर्मचारी, साखर कारखाने यांच्यासह महिला बचत गटांना नियुक्त करण्याच्या धोरणाला राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिली. …

Read More »