मुंबईः प्रतिनिधी राज्यात विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. या रणधुमाळीचा फायदा उठवित भाजपाकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भाषणाच्या मूळ व्हीडीओत काटछाट करत चुकीचा व्हीडीओ व्हायरल दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनी शेअर केला. तसेच या काटछाट केलेल्या व्हीडीओचा वापर राजकिय कारणासाठी केल्याप्रकरणी सायबर क्राईम विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या ४० सेंकदाच्या …
Read More »सरकारच्या दबावाखाली दूरदर्शन विरोधकांचा आवाज दाबतेय काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप
मुंबईः प्रतिनिधी सरकारच्या दबावाखाली विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा दूरदर्शन प्रयत्न करत असून मतदानासाठी आवाहन करण्याच्या काँग्रेसच्या स्क्रिप्टमध्ये परस्पर बदल करण्यात आला आहे. दूरदर्शनचा हा प्रकार संताप आणणारा असून विरोधकांच्या संवैधानिक मत स्वातंत्र्याच्या अधिकारावर गदा आणणारा असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. दूरदर्शनवरील कार्यक्रमासाठी …
Read More »धारावीचा पुनर्विकास १० वर्षासाठी रखडला निविदा प्रक्रियाच पुन्हा नव्याने होणार
मुंबईः खास प्रतिनिधी २५ वर्षाहून अधिक काळ रखडलेल्या धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास पुन्हा एकदा १० वर्षासाठी रखडणार आहे. यापूर्वी मार्गी लागलेली निविदा प्रक्रिया नव्याने सुरु करण्यात येणार असल्याची माहिती गृहनिर्माण विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. राज्यातील गतीमान सरकारने साधारणतः दोन वर्षापूर्वी धारावीच्या पुनर्विकासाला चालना देण्यासाठी धारावी झोपडपट्टीच्या विकासासाठी नव्याने निविदा मागविली होती. …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदींची जळगांवातून प्रचाराची सुरुवात केंद्रीय मंत्री स्मृती ईरानी यांची माहिती
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विधानसभा निवडणूकीतील भाजपाच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत असून पक्षाच्या उमेदवारांसाठी ९ प्रचार सभा घेणार आहेत, अशी माहिती केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी शुक्रवारी प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. विशेष म्हणजे भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना तिकिट न देता त्यांच्या …
Read More »भाजपाची परिस्थिती म्हणजे, करुन गेलं गाव आणि भलत्याचंच नाव उरळी कांचन ( पुणे-शिरुर) येथील जाहीर सभेत पवारांनी साधला मोदींवर निशाणा
मुंबईः प्रतिनिधी पुलवामाचा बदला हवाईदलाच्या सैनिकांनी घुसुन मारुन घेतला. मात्र क्रेडिट कुणी घेतले? असा उपरोधिक टोला लगावतानाच ‘करुन गेलं गाव आणि भलत्याचंच नाव अशी सध्याची भाजपाची परिस्थिती असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी उरळी कांचन येथील जाहीर सभेत केली. पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला त्याचा बदला घेण्यासाठी …
Read More »भाजपाने आमदार चरण वाघमारेसह चारजणांना दाखविला घरचा रस्ता बंडखोर उमेदवारी मागे न घेतल्याने पक्षातून निष्कासित
मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीत तिकिट मिळेल, नाही मिळाले तर बंडखोरी करत निवडणूकीच्या रिंगणात उतरणारे तुमसरचे विद्यमान आमदार चरण वाघमारे, नगरसेविका गीता जैन यांच्यासह चार जणांना पक्षातून काढून टाकल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली. भारतीय जनता पार्टी- शिवसेना महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात बंडखोरी करून निवडणूक लढविणाऱ्या आमदार …
Read More »पीएमसी बँक खातेदारांची भाजपा कार्यालयाबाहेर निदर्शने बँकप्रकरणी आरबीआयशी बोलण्याची केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आश्वासन
मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई दौऱ्यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पीएमसी बँक खातेदारांच्या नाराजीचा सामना करावा लागला असून भाजपा प्रदेश कार्यालयाबाहेर या खातेदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी खातेदारांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी खातेदारांचे म्हणणे ऐकून घेत याप्रश्नी रिझर्व्ह बँकेशी बोलणार असल्याचे आश्वासन दिले. खातेदारांच्या घोषणेमुळे यापरिसरात काही काळ तणाव …
Read More »राज्यावर ४ लाख कोटींच कर्ज केलं पण विकास किती झाला ? राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा सवाल
वर्धा – हिंगणघाटः प्रतिनिधी एकेकाळी आपल्या राज्याची ओळख धनिक राज्य अशी केली जायची. पण मागील पाच वर्षात या सरकारने राज्यावर ४ लाख कोटी रुपयाचे कर्ज करून ठेवले. यातून राज्याचा विकास किती केला यावर न बोललेले बरं असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी हिंगणघाट येथील जाहीर सभेत सरकारला …
Read More »राज्यात सर्वाधिक उमेदवार नांदेड पश्चिम मध्ये ४ हजार ७४३ अर्ज वैध तर ८०० उमेदवारांचे अर्ज अवैध
मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा सोमवार ७ ऑक्टोंबर रोजीचा शेवटचा दिवस होता. दिवसभरात जवळपास ५०० हून अधिक उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतले. राज्यातील सर्वाधिक उमेदवार नांदेड पश्चिम मध्ये ३८ उमेदवार रिंगणात राहीले आहेत. सर्वात कमी उमेदवार हे चिपळून मध्ये असून या विधानसभा मतदारसंघात अवघे ३ उमेदवार रिंगणात …
Read More »मुंबईत सर्वाधिक उमेदवार वरळी आणि मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात ५ उमेदवारांनी घेतली माघार एकूण उमेदवार ८९ रिंगणात
मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूक-२०१९ मुंबई शहर जिल्ह्यांतर्गत १० विधानसभा मतदार संघात सर्वाधिक उमेदवार वरळी आणि मुंबादेवी मतदारसंघात आहेत. यातील वरळी विधानसभा मतदारसंघात १३ उमेदवार रिंगणात आहेत. तर मुंबईदेवी विधानसभा मतदारसंघात १२ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या आज शेवटच्या दिवशी ३ मतदारसंघातून ५ उमेदवारांनी माघार घेतली. उमेदवारी अर्ज …
Read More »
Marathi e-Batmya