Tag Archives: bombay high court

टोरेस घोटाळा प्रकरण: युक्रेनियन अभिनेत्याची जामीनासाठी धाव संबंधित कंपनीची आपला काडीमात्र संबंध नसल्याचा दावा

टोरेस घोटाळा प्रकरणात अटकेत असलेल्या युक्रेनियन अभिनेत्याने जामीनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. आपला फर्मशी कोणताही संबंध नसल्याचा दावा अभइनेत्याने जामीन अर्जात केला आहे. या घोटाळ्यात सहभागी असल्याप्रकरणी आर्मन अतेन या युक्रेनियन अभिनेत्याला गेल्या महिन्यात पोलिसांनी मालाड मालवणीतून अटक केली होती. तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत आहे. आपले नाव मूळ गुन्ह्यातमध्ये …

Read More »

उच्च न्यायालयाकडून धीरज आणि कपिल वाधवान यांना जामीन येस बँक आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरणी पावणेपाच वर्षांहून अधिक काळ वाधवान बंधू अटकेत

येस बँक कर्ज घोटाळ्य़ाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे (डीएचएफएल) प्रवर्तक धीरज आणि कपिल वाधवान यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. दोघेही दीर्घकाळ तुरुंगात असून त्यांच्याविरोधातील खटला नजीकच्या काळात सुरू होण्याची शक्यता नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने वाधवान बंधुंना जामीन मंजूर करताना नोंदवले. मागील पावणेपाच वर्षांपासून वाधवान बंधू कारागृहात आहेत. …

Read More »

उच्च न्यायालयाचे आदेश, पालघर जिल्हा ग्राहक मंच ४ आठवड्यात कार्यरत करा राज्य सरकारला न्यायालयाने दिले आदेश

पालघर जिल्हा मुख्यालय संकुलात स्थापन करण्यात आलेले पालघर जिल्हा ग्राहक मंच चार आठवड्यात कार्यरत करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला दिले. पालघर जिल्ह्यात जिल्हा ग्राहक मंच स्थापन करण्याची मागणी दत्ता अदोदे यांनी व जनहित याचिकेतून केली होती, त्या याचिकेवर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्या. आलोक आराधे आणि न्या. भारती डांगरे यांच्या …

Read More »

उच्च न्यायालयाचे आदेश, सोलापूर जिल्हा परिषदेच्या सीईओंचे वेतन रोखा याचिकाकर्त्यांचे वेतन होईपर्यंत त्यांनाही वेतन न देण्याचे उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश

न्यायालयाने शिक्षकांचे थकित वेतन देण्याचे स्पष्ट आदेश दिले असतानाही शिक्षकांचे वेतन देण्यात आले नाही, याची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली. तसेच सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे (सीईओ) शिक्षकांचे वेतन होत नाही तोपर्यंत सीईओंचेही वेतन रोखण्याचे आदेश राज्य़ सरकारला दिले. उच्च न्यायालयाने पुढे आपल्या निकालात असेही म्हणाले की, इतके महिने …

Read More »

पवईतील जयभीम नगरातील मागासवर्गीयांची घरे तोडणा-या अधिकारी व बिल्डरवर गुन्हे दाखल माजी मंत्री नसीम खान यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश, ६५० कुटुंबियांना न्याय मिळणार

पवईच्या जयभीम नगरमधील जवळपास ६५० मागासवर्गीय परिवारांवर ६ जून २०२४ रोजी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, पोलीस, बिल्डर निरंजन हिरानंदानी व स्थानिक आमदार यांनी संगनमताने बेकायदेशीर कारवाई केली. पोलिसांनी घरात घुसून लहान मुले, गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक यांना मारहाण करत जबरदस्तीने घरांवर बुलडोझर चालवून त्यांना बेघर केले. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने …

Read More »

मुंबई उच्च न्यायालयाने जनहित याचिका फेटाळली विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची पार्श्वभूमी तपासणीसाठी सीसीटीव्ही तपासण्याची मागणी करणारी याचिका

कायद्याच्या विद्यार्थ्यांना अंतिम गुणपत्रिका जारी करण्यापूर्वी गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासणे बंधनकारक करणाऱ्या बार कौन्सिल ऑफ इंडिया (BCI) च्या परिपत्रकाला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेवर (PIL) सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणी घेण्यास नकार दिला. उच्च न्यायालयात  वकील अशोक येंडे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेत गोपनीयता, निष्पक्षता आणि अधिकारक्षेत्राबाबत चिंता व्यक्त करून BCI ने …

Read More »

मुंबई उच्च न्यायालयाचा अनिल अंबानीला दिलासा

उद्योजक अनिल अंबानी यांना दिलासा देताना, मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी कॅनरा बँकेने दिलेल्या आदेशाला स्थगिती दिली, ज्यामध्ये त्यांनी रिलायन्स कम्युनिकेशन्सशी संबंधित त्यांचे कर्ज खाते “फसवे खाते” म्हणून वर्गीकृत केले होते. उच्च न्यायालायच्या न्यायाधीश रेवती मोहिते-डेरे आणि डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने असे नमूद केले की बँकेची ही कारवाई रिझर्व्ह बँक …

Read More »

उच्च न्यायालयाचा सवाल, आदित्य ठाकरे यांना ताब्यात घेऊन चौकशीची गरज का? दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नितेश राणे यांच्या याचिकेवरील सुनावणीवेळी उच्च न्यायालयाचा सवाल

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांची व्यवस्थापक दिशा सालियन प्रकरणी भाजपाचे आमदार तथा मंत्री नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच या याचिकेच्या अनुशषंगाने शिवसेना उबाठा पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या चौकशीची मागणीही केली होती. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने आदित्य ठाकरे यांना ताब्यात घेऊन चौकशीची …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांच्या युक्तीवादानंतर, उच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस निवडणूक आयोगाला बजावली नोटीस, दोन आठवड्यानंतर होणार सविस्तर सुनावणी

मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांना आव्हान देणाऱ्या याचिकेवर सोमवारी (३ फेब्रुवारी) मुंबई उच्च न्यायालयाने नोटीस बजावली. मतदानाच्या अधिकृत बंद वेळेनंतर (सायंकाळी ६ वाजता) ७५ लाखांहून अधिक मते पडली आणि जवळजवळ ९५ मतदारसंघांमध्ये अनेक विसंगती आढळल्या, ज्यामध्ये मतदान झालेल्या मतांची संख्या आणि मोजणी झालेल्या मतांची संख्या जुळत नाही, असा …

Read More »

फोक्सवॅगनची कर आकारणी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका भारतीय अधिकाऱ्यांच्या विरोधात कर आकारणीवरून याचिका

न्यायालयीन कागदपत्रांनुसार, फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर्सची “अशक्य प्रमाणात प्रचंड” कर मागणी रद्द करण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांवर खटला दाखल केला आहे, कारण ही विनंती नवी दिल्लीच्या कारच्या सुटे भागांसाठी आयात कर नियमांच्या विरुद्ध आहे आणि कंपनीच्या व्यवसाय योजनांना अडथळा आणेल असा युक्तिवाद केला आहे. १०५ पानांच्या या दाखल्यानुसार, सार्वजनिक नसलेल्या परंतु, फोक्सवॅगनच्या …

Read More »