Tag Archives: congress

काँग्रेस नेते-मंत्री करणार मोदी सरकारच्या काळ्या कारभाराची पोलखोल काँग्रेसची उद्या राज्यभर निदर्शने: नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या सात वर्षातील कारभाराने देश २५ वर्षे अधोगतीकडे गेला असून त्याचे गंभीर परिणाम देशातील जनतेला भोगावे लागत आहेत. मागील सात वर्षांत मोदींनी विकासाच्या नावाखाली देश भकास करुन टाकला आहे. काँग्रेसच्या सरकारने ७० वर्षात देशाला समृद्ध, स्वाभिमानी राष्ट्र म्हणून जगात ताठमानेने उभे केले त्याची …

Read More »

तीन पर्यायांसह ६ जूनचा संभाजी राजेंचा सत्ताधारी-विरोधकांना अल्टीमेटम दिल्लीत मराठा गोलमेज परिषद घेणार असल्याची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आपण सर्वपक्षिय नेत्यांच्या गाठी-भेटी घेत असून आपण तीन पर्याय सत्ताधारी आणि विरोधकांना देत असून येत्या ६ जूनपर्यंत जर राज्य सरकारने योग्य ती कार्यवाही केली नाही आणि निश्चित असा प्लॅन ऑफ अॅक्शन ठरवला नाही, तर आम्ही कोविड-बिविड काहीही बघणार नाही असा इशारा छत्रपती …

Read More »

मत्स्य व्यावसायिकांना मिळाली सहा महिन्यांची मुदतवाढ मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मच्छिमार, मत्स्यसंवर्धक व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना आर्थिक दिलासा देण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय विभागाने विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. यामध्ये ठेक्याने देण्यात आलेल्या तलाव/जलाशयाची चालू वर्षाची ठेका तलाव रक्कम भरण्यास तसेच मत्स्य बोटुकली संचयनाची आगाऊ रक्कम भरणे आणि मत्स्य बीज केंद्राची रक्कम भरणे आदीसह …

Read More »

#BreakTheChain आनंदाची बातमी: टप्प्याटप्प्याने निर्बंध उठविणार राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा; मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी आणि बाधित रूग्णांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी राज्यात १४ एप्रिल २०२१ रोजीच्या रात्री ८ वाजल्यापासून राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. येत्या १ जून २०२१ रोजी त्यास दिड महिने पूर्ण होत असून १ जूनपासून राज्यातील लॉकडाऊनचे निर्बंध टप्प्या टप्प्याने उठविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उध्दव …

Read More »

मराठा आरक्षणविरोधात न्यायालयीन लढाई लढणाऱ्यांचे नागपूर कनेक्शन मराठा आरक्षणविरोधातील न्यायालयीन लढाईला भाजपाची रसद- काँग्रेस प्रवक्ते सावंत यांचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी मराठा आरक्षणाविरोधात न्यायालयीन लढाई लढणाऱ्या सेव्ह मेरिट सेव्ह नेशन या संस्थेचे व त्यांच्या पदाधिका-यांचे भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूर कनेक्शन उघड झाले असून यात भाजप पदाधिकारीच अग्रेसर असल्याने मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत आरक्षण विरोधी लोकं व संस्थांना रसद पुरवून भाजपानेच मराठा समाजाशी दगाबाजी केली आहे का? असा …

Read More »

पदोन्नतीतील आरक्षण प्रश्नी काँग्रेस आक्रमक: विश्वासात न घेता निर्णय घेतला ७ मे चा जीआर रद्द करायला भाग पाडूः नाना पटोले

मुंबई : प्रतिनिधी पदोन्नतीतील आरक्षण कायम राहिले पाहिजे या मुद्यावर काँग्रेस पक्ष ठाम असून या प्रकरणी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, पदोन्नतीतील आरक्षण रद्द करणारा ७ मे चा शासन निर्णय रद्द करायला भाग पाडू, अशी ग्वाही आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.   पदोन्नतीतील आरक्षण या विषयावर राज्यभरातील अधिकारी-कर्मचारी …

Read More »

प्रियांका, कंगनाला वेळ देणाऱ्या मोदींनी संभाजीराजेंना वेळ न देणे हा महाराष्ट्राचा अवमान मोदींना छत्रपतींची आठवण केवळ मतांकरिताच होते का?- सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: प्रतिनिधी मराठा आरक्षण प्रश्नावर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चारवेळा भेटण्याची वेळ मागितली, परंतु आजपर्यंत मोदींनी त्यांना वेळच दिली नाही. चित्रपट अभिनेत्री प्रियांका चोप्रा, कंगना राणावत व इतर बॉलिवूड अभिनेत्यांना भेट देतात. या सर्व तारकांचे कोणते गहन प्रश्न होते त्यांना मोदींनी वेळ दिला आणि मराठा आरक्षणाकरिता …

Read More »

भाजपप्रणित राज्यातच “मोदी मॉडेल”चा फज्जा ! काँग्रेस प्रवक्ते अनंत गाडगीळ यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने ज्या ‘गुजरात मॉडेल’ चा डंका पिटवून देशातील सत्ता काबिज केली, त्याच गुजरातमधे कोरोनाची दूसरी लाट बेफिकीरपणे हाताळल्याबद्द्ल ना केवळ खुद्द स्थानिक प्रसार माध्यमांनी खरी वस्तुस्थिती मांडत सरकारचे वाभाड़े काढले, पण सन्मा. गुजरात उच्च न्यायालयानेही नाराजी व्यक्त करीत खड़े बोलही सुनावले. यामुळे, गुजरातचे “अकार्यक्षम …

Read More »

आता प्रामाणिकपणे मोदींचे आभारही माना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे महाविकास आघाडी नेत्यांना आवाहन

मुंबई : प्रतिनिधी ऐन मान्सूनच्या तोंडावर खतांच्या दरात वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी याबाबत तीव्र नापसंती व्यक्त करत दरवाढीच्या निर्णयाचा पुर्नविचार करण्याचे आवाहन केले. तर भाजपा नेत्यांनी दरवाढ रद्द करण्याऐवजी खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्याची मागणी केंद्रीय रसायने आणि खते मंत्री सदानंद गौडा …

Read More »

टास्कफोर्स स्थापून सर्वोच्च न्यायालयाकडून मोदींच्या अपयशावर शिक्कामोर्तब कोरोना प्रतिबंधक लसीचे 'राष्ट्रीय धोरण' जाहीर करावे : नाना पटोले

मुंबई : प्रतिनिधी केंद्रातील मोदी सरकार कोवीड परिस्थिती हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. केंद्र सरकारच्या गलथानपणामुळे लसीकरण मोहिमही फसली आहे. देशभरात लसीकरण केंद्राबाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. १७ कोटी जनतेला लस दिल्याचे मोदी सरकार सांगते पण लाखो लोकांची दुसऱ्या डोसची कालमर्यादा उलटून गेली तरी अजून त्यांना दुसरा डोस …

Read More »