मुंबई: प्रतिनिधी राफेल प्रकरणात यशवंत सिन्हा, प्रशांत भूषण आणि अरुण शौरी या नेत्यांनी दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने काल फेटाळून लावली असून त्यासंदर्भात पूर्ण निकालाचे वाचन न करता मोदी सरकारला पुन्हा एकदा क्लीन चीट दिल्याचे चित्र उभा केले जात आहे. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे तपशिलात जाऊन वाचन केल्यास मोदी …
Read More »पंचतारांकित हॉटेलमध्ये काँग्रेसची शिवसेनेबरोबर सदिच्छा भेट उध्दव ठाकरेंच्या भेटीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात, चव्हाण, ठाकरे आदी नेते
मुंबईः प्रतिनिधी शिकाँरा महाआघाडीच्यावतीने राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. विशेषतः मंगळवारी काँग्रेस नेते अहमद पटेल आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची संयुक्त पत्रकार परिषद झाल्यानंतर आज बुधवारी शिवसेनेशी पुढील चर्चा करण्यासाठी नरिमन पाँईट येथील हॉटेल ट्रायडंट येथे जावून काँग्रेस नेत्यांनी उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. तब्बल दोन …
Read More »सामायिक कार्यक्रम ठरविण्यासाठी राष्ट्रवादीच्या ५ नेत्यांची समिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीत निर्णय
मुंबईः प्रतिनिधी राज्यात शिकाँरा अर्थात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसबरोबरील सामायिक कार्यक्रम ठरविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाच जणांची समिती स्थापन करण्यात आली. या समितीत अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि प्रवक्ते नवाब मलिक यांचा समावेश आहे. नरिमन पाँईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आज राष्ट्रवादी …
Read More »शिकाँरा सत्तेत येणार…पण आधी आमचं ठरणार मगच सेनेशी चर्चा काँग्रेस नेते अहमद पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांची माहिती
मुंबईः प्रतिनिधी राज्यात शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अर्थात शिकाँरा महाआघाडी सत्तेत येणार असल्याचे स्पष्ट संकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दिले. तत्पूर्वी आमच्या दोन पक्षातील बोलणी अंतिम होणार असून त्यानंतरच शिवसेनेशी चर्चा करणार असल्याचे काँग्रेस नेते अहमद पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती …
Read More »शिकाँरासाठी अखेर काँग्रेस नेते पटेल, वेणूगोपाल पोहोचले शरद पवारांकडे शिवसेनेशी नंतर चर्चा करणार असल्याची माहिती
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील शिकाँरा अर्थात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीचे सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना उशीराने का होईना वेग आला आले. कालपासून सुरु असलेला बैठकींचा सिलसिला आजही काँग्रेसकडून सुरु असून शरद पवारांशी अंतिम बैठक करण्यासाठी काँग्रेस नेते अहमद पटेल. मल्लिकार्जून खर्गे आणि वेणूगोपाल राव हे यशवंतराव प्रतिष्ठान येथे संध्याकाळी …
Read More »शिवसेनेकडून सत्ता स्थापनेचा दावा..मात्र काँ.रा.कडून पाठिंब्याचे अधिकृत पत्र नाही शिवसेना नेते आदीत्य ठाकरे यांची माहिती
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील सत्ता स्थापनेचा घोळ सुटण्याची शक्यता दिसत असताना शिवसेनेच्या सत्ता स्थापनेचा दाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप पाठिंब्याचे पत्र दिले नाही. त्यामुळे राज्यातील सत्ता स्थापनेचा आणखी काही दिवस चालण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, राज्यात सत्ता स्थापन करण्याचा दावा राज्यपालांकडे करण्यात आला असून आणखी दोन दिवसाचा अवधी देण्यास राज्यपालांनी नकार …
Read More »शि.रा.ला अखेर काँग्रेसकडून बाहेरून पाठिंबा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचा निर्णय
नवी दिल्ली-मुंबईः प्रतिनिधी राज्यातील सत्ता स्थापनेचा अखेर घोळ संपुष्टात आला असून काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबधीची माहिती काँग्रेसकडून शिवसेनेला कळविण्यात आल्याचे १० जनपथवरील सुत्रांनी दिली. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा या प्रमुख मुद्यावरून भाजपाबरोबर सवता सुभा मांडला होता. शिवसेनेला सरकार स्थापन …
Read More »शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाशिवआघाडी संध्याकाळी जाहीर होणार संध्याकाळी ५ वाजेपर्यंत दोन्ही पक्षांकडून भूमिका जाहीर करणार
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील सत्ता स्थापनेचा घोळ संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली असून आज संध्याकाळपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेना सरकारला पाठिंबा देण्याबाबतची अधिकृत घोषणेची शक्यता आहे. काँग्रेसकडून भूमिका जाहीर झाल्यानंतर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाठिंबा जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. त्यानंतर राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील …
Read More »गांधी कुटुंबियांची एसपीजी सुरक्षा काढण्याचा निर्णय राजकीय सूडबुद्धीतून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची टीका
मुंबईः प्रतिनिधी काँग्रेस अध्यक्षा खा. सोनिया गांधी, खा. राहुल गांधी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांची एसपीजी सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने राजकीय सूडबुद्धीने घेतला आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. भाजप सरकारच्या या विद्वेषी कृतीचा तीव्र निषेध …
Read More »देवेंद्र म्हणाले माझी अडचण होईल…अमित शाह आणि कंपनीवर विश्वास नाही मुख्यमंत्री पदावर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे ठाम
मुंबईः प्रतिनिधी निवडणूकीसाठी युती करताना अमित शाह यांच्यासमोर मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा करण्यात आली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी हे आताच जाहीर करू नका नाहीतर माझी पक्षात अडचण होईल अशी विनंती केली. आता ते मुख्यमंत्री पदाबाबत अशी चर्चा झालीच नसल्याचे सांगत मला खोट ठरविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचे प्रतित्तुर भाजपा नेते …
Read More »
Marathi e-Batmya