मुंबई: प्रतिनिधी कोरोनाग्रस्त रूग्णांना वेळेत रूग्णालयात खाट न मिळाल्याने मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यापार्श्वभूमीवर लक्षण दिसायला लागल्यानंतर सदर व्यक्तीला तातडीने रूग्णालयात दाखल करता यावे यासाठी मुंबईतील सर्व रूग्णालयातील खाटांची अर्थात बेडची संख्या पुढील आठवड्यापासून ऑनलाईन उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दिली. …
Read More »२४ तासात आतापर्यतची सर्वाधिक मृत्यूची नोंद ९७ जणांचे मृत्यू तर २०९१ नव्या रूग्णांचे निदान
मुंबई: प्रतिनिधी राज्यात मागील काही दिवसांमध्ये कोरोनाबाधीतांच्या मृत्यूमध्ये आकडे कमी-जास्त होताना दिसून येत होते. तसेच मागील काही दिवसात ही संख्या कधी ८४ तर कधी ६० च्या दरम्यान रहात असे. मात्र आतापर्यत सर्वाधिक ९७ जणांचा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली असून २ हजार ९१ रूग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे कोरोनाबाधीतांची संख्या …
Read More »रोगराई वाढणार नाही याची काळजी घ्याच, पण रस्त्यांवरही खड्डे नकोच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला आदेश
मुंबई: प्रतिनिधी सध्या आपण कोविडचा मुकाबला करीत असतांनाच येणाऱ्या पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तींना देखील आपल्याला समर्थपणे तोंड द्यायचे आहे, त्यादृष्टीने सर्व यंत्रणांनी एकमेकांत चांगला समन्वय ठेऊन काम करावे तसेच रोगराई पसरणार नाही यासाठी आधीपासून नियोजन करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देत पावसाळ्याच्या कालावधीत मुंबईसह राज्यातील कोणत्याही भागात रस्त्यावर खड्डे …
Read More »गुजरातच म्हणतेय, चाचणी करत नसल्याने अहमदाबादेत ४० लाख कोरोना रुग्ण भाजपशासित राज्यात कोरोना रुग्णसंख्या दडवली जातेय : सचिन सावंत
मुंबई: प्रतिनिधी भाजपशासित राज्यात कोरोनाची रुग्ण संख्या दडवली जात असून गुजरातमध्ये तर चाचण्याच केल्या जात नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. उच्च न्यायालयानेच गुजरातमधील आरोग्य यंत्रणेची पोलखोल करत तेथील रुग्णालये हे अंधार कोठडीपेक्षा भयानक असून गुजरातची तुलना बुडत्या टायटॅनिक जहाजाशी केली. गुजरातमध्ये चाचण्याच केल्या जात नाहीत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमध्ये …
Read More »प्रचंड उकडतं ना? पुन्हा एसी-कुलर सुरु करायचाय, मग हे वाचा केंद्र सरकारकडून एसी, कुलर वापरण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्वे जाहीर
मुंबई: प्रतिनिधी ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर अर्थात मार्च महिन्यात कोरोनाबाधित रूग्ण सापडायला सुरुवात झाली. त्यामुळे घरात, कार्यालयात वापरण्यात येणाऱ्या सिंगल आणि सेंट्रल एसी वापरण्यावर सुरुवातीला बंधन घालण्यात आली. मात्र आता घरात किंवा कार्यालया एसी आणि कुलरचा वापर करण्याबाबत केंद्र सरकाच्या सीपीडब्लूडीने यासंदर्भात मार्गदर्शक तत्वे जाहीर केलीत. या मार्गदर्शक तत्वानुसार एसी वापरायचा …
Read More »सोलापूरने पार केली ६०० रूग्णांची संख्या २४ तासात ७ जणांचा मृत्यू
सोलापूर: प्रतिनिधी मागील काही दिवसात जिल्हा आणि शहरातील संख्या वेगाने वाढत असून आज सकाळी ८ आणि दिवसभरात मिळून २५ रूग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे आतापर्यंतची जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ६०८ वर पोहोचली आहे. तर ७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज निदान झालेले रूग्ण हे कुमठा नाका १, बुधवार पेठ १, …
Read More »राज्यात ५२ हजार कोरोनाग्रस्तांपैकी ३५ हजार रूग्ण अॅक्टीव्ह २ हजार ४३६ नवे रूग्ण, ६०जणांचा मृत्यू तर १५ हजार बरे होवून घरी
मुंबई: प्रधिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत कालच्या तुलनेत २ हजार ४३६ ने आज वाढ झालेली असली तरी प्रत्यक्षात ३५ हजार १७८ रूग्ण अॅक्टीव्ह आहेत. तसेच ११८६ जणांना आज घरी सोडण्यात आल्याने बरे होवून घरी जाणाऱ्यांची संख्या १५ हजार ७८६ इतकी झाली असून ६० जणांचा २४ तासात मृत्यू झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री …
Read More »महाराष्ट्र प.बंगाल बनू पाहतोय का ? मुख्यमंत्री विरूध्द राज्यपाल संघर्ष अधिक पेटण्याची चिन्हे
मुंबई: विशेष प्रतिनिधी पश्चिम बंगाल मध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पाच वर्षे लवकरच पूर्ण होत आहेत. मात्र त्या राज्याच्या राज्यपाल पदी जगदीप धंखार यांची नियुक्ती झाल्यापासून मुख्यमंत्री बॅनर्जी विरूध्द राज्यपाल असा सामाना सुरु असल्याचे चित्र पाह्यला मिळत आहे. अगदी त्याच पध्दतीने महाराष्ट्रातही महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होवून ६ …
Read More »३ हजार रूग्णांच्या विक्रमी संख्येसह राज्य पोहोचले ५० हजारांवर तर अॅक्टीव केसेस अवघ्या ३३ हजार: ५८ जणांचा मृत्यू
मुंबई : प्रतिनिधी राज्यात आजपर्यंतचे सर्वाधिक रूग्ण अर्थात ३ हजार ४१ रूग्ण राज्यात आढळून आले असून महाराष्ट्राने ५० हजार रूग्ण संख्येचा टप्पा पार केला. तर मुंबई शहराची संख्या ३० हजार ५४२ वर पोहोचली आहे. ५८ रूग्णांचा मृत्यू झाला तर ११९६ रूग्णांना घरी सोडून दिल्याने त्यांची संख्या १४ हजार ३०० वर …
Read More »शाररीक अंतर पाळत १५ जूनपासून शाळा सुरु? शिक्षण विभागाची तयारी तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे स्पष्ट संकेत
मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूला रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. मात्र राज्यातील कोरोनाची संख्या तरीही वाढताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनासोबत जगण्याचा भाग म्हणून रेड झोन वगळता राज्याच्या इतर भागातील शाळा १५ जून पासून सुरु करण्याचा विचार शालेय शिक्षण विभागाकडून गांभीर्याने करण्यात येत असल्याची माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे …
Read More »
Marathi e-Batmya