Tag Archives: radhakrushna vikhe patil

नदीजोड प्रकल्पांतील कामांचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतला आढावा दमणगंगा–वैतरणा–गोदावरी नदीजोड प्रकल्प, दमणगंगा–एकदरे– गोदावरी नदीजोड प्रकल्पाचा घेतला आढावा

राज्यात राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पांतील कामांना गती देण्याच्या अनुषंगाने जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे- पाटील यांनी सविस्तर आढावा घेतला. दमणगंगा–वैतरणा–गोदावरी नदीजोड प्रकल्प, दमणगंगा–एकदरे– गोदावरी नदीजोड प्रकल्प तसेच कृष्णा खोऱ्यातील पुराचे पाणी भीमा नदी खोऱ्यात वळविण्यासाठी सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा यावेळी घेण्यात आला. सह्याद्री अतिथीगृह …

Read More »

छगन भुजबळ यांची मागणी, मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या शासन निर्णयात स्पष्टता आणा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन

राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात २ सप्टेंबर रोजी एक शासन निर्णय जारी केला आहे. मराठा समाजाला कुणबी, मराठा- कुणबी, कुणबी- मराठा  प्रमाणपत्र देण्यासाठी हा शासन निर्णय काढण्यात आला आहे. मात्र या शासन निर्णयामध्ये अनेक शब्दांवर ओबीसी संघटनांचा आक्षेप आहे या शासन निर्णयामधील काही शब्दांमुळे सरसकट मराठा समाज हा ओबीसीमध्ये येऊ शकतो …

Read More »

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, सरकारला प्रश्न सोडवायचा आहे मनोज जरांगे पाटीडल यांनी मराठा आरक्षणप्रश्नी दिलेल्या प्रस्तावावर मंत्रिमंडळ उपसमितीची चर्चा

मराठा आरक्षणाचा प्रश्नाबाबत जरांगे पाटील यांच्याकडून आलेल्या प्रस्तावावर उपसमितीने चर्चा केली असून, यासंदर्भात कायदेशीर मार्गदर्शन घेत आहोत. सरकारला प्रश्न सोडवायचा आहे, मात्र महाविकास आघाडीचे नेते केवळ राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी वेगवेगळी विधान करीत आहे. घटनेत बदल करून आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याचा सल्ला देणारे शरद पवार केंद्रात मंत्री असताना गप्प का …

Read More »

न्यायमूर्ती शिंदे समितीला सहा महिन्यांची मुदतवाढ मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपसमितीचा निर्णय

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे यांनी मुंबईत धडक देण्याचे जाहीर केले असताना मराठा -कुणबी, कुणबी -मराठा नोंदी शोधण्यासाठी  गठीत केलेल्या माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीला मुदतवाढ देण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. राज्य सरकारने यापूर्वी शिंदे समितीला ३० जून २०२५ पर्यंत मुदत दिली होती. मनोज जरांगे …

Read More »

छगन भुजबळ म्हणाले, पिण्याच्या पाण्यासाठी किकवी धरण आगामी कुंभमेळ्याच्या पूर्वी पूर्ण करा दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी वेळेत योजनांची कामे पूर्ण करण्याचा महायुती शासनाचा मानस - मंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील

नाशिक शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या किकवी धरण हे अतिशय महत्वाचे असून आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हे धरण अतिशय महत्वाचे आहे. त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे तसेच संपूर्ण महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध होणारे संपूर्ण ११५ टीएमसी पाणी पूर्णपणे गोदावरी खोऱ्यात वळवावे असे प्रतिपादन राज्याचे अन्न, …

Read More »

राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मतदारसंघात वसतिगृहातील विद्यार्थ्यानाच बनविले मतदार काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांच्याकडून विद्यार्थी मतदारांची मतदान केंद्रावरच तपासणी

विधानसभा निवडणूकीची घोषणा जाहिर झाल्यापासून अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघात विद्यमान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उमेदवारीची आणि त्यांच्या रणनीतीची चर्चा अहमदनगरसह संपूर्ण राज्यात सुरु झाली. त्यातच काँग्रेसकडून प्रभावती घोगरे यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली. त्यामुळे काँग्रेसच्या प्रभावती घोगरे विरूद्ध राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यात सामना सुरुवातीला एककल्ली वाटत होता. मात्र आज …

Read More »

डिफेन्स क्लस्टरच्या बैठकीत शिर्डी एमआयडीसीची निवड रस्ते आणि वीज विकासासाठी १०० कोटींची मान्यता

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने उभारल्या डिफेन्स क्लस्टर उद्योग समूहात शिर्डी एमआयडीसीची निवड झाली असून सवलतीच्या दरात जागा देण्याचा निर्णय उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज दिला. तसेच या औद्योगिक नगरीच्या रस्ते आणि वीज विकासासाठी १०० कोटी रुपयांना मान्यता देण्यात आली. यामुळे आता शिर्डी एमआयडीसीचा विकास जलद गतीने होऊन शिर्डीची देवस्थानाबरोबर …

Read More »

२० लाख लीटर दुधाचे संकलन केले तरच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ३५ रूपये देणे शक्य पशु व दुग्धविकास मंत्री विखे-पाटील यांची माहिती

राज्‍यातील अतिरिक्‍त दूधाचा प्रश्‍न सोडविण्‍यासाठी अमुल उद्योग समुहासह इतरही प्रक्रिया केंद्रानी अतिरिक्‍त २० लाख लिटर दूधाचे संकलन करावे असे आवाहन दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले आहे. या प्रक्रीया केंद्रानी सहकार्य केल्‍यास राज्‍यातील दूध उत्‍पादकांना ३५ रुपये भाव देणे शक्‍य होईल असा विश्‍वासही व्‍यक्‍त केला. राज्‍य सरकारने …

Read More »

महसूल मंत्री विखे-पाटील यांचे निर्देश, महिनाभरात भटके विमुक्तांना दाखले द्या दाखल देण्यासाठी विशेष शिबिरं आयोजित करा

भटक्या विमुक्त समाजातील नागरिकांना महिना भरात दाखले वाटप करा त्यासाठी विशेष शिबिरांचे सर्व जिल्ह्यात आयोजन करण्याचे आदेश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. त्याच बरोबर कागदपत्रांची कोणतीही जाचक अट न ठेवता कोणत्याही एका पुराव्यावर त्यांना दाखले देण्यात यावे असेही त्यांनी बैठकीत सांगितले. भटके विमुक्त यांना विविध दाखले मिळविण्यासाठी येणाऱ्या …

Read More »

राधाकृष्ण विखे-पाटील यांचा आरोप, चार वेळा मुख्यमंत्री राहूनही आरक्षणावर ब्र सुद्धा काढला नाही आरक्षणाचे खरे शत्रू कोण आता मराठा समाजाने ओळखावे

मराठा आरक्षणाचे खरे शत्रू कोण हे आता मराठा समाजाने ओळखावे ,चार वेळा मुख्यमंत्री राहून सुद्धा एकदाही मराठा आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेतली नाही.केवळ मताचे राजकारण करत समजा समाजात दुही माजवयाची आणि आपली राजकीय समीकरणे मांडायची अशी बोचरी टीका राज्याचे महसूल तथा दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांचे …

Read More »