Tag Archives: state government

हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा, शेतकऱ्यांच्या प्रश्नी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काँग्रेसचे आंदोलन महानगरपालिका क्षेत्रातील प्रश्नांवर ४ मार्चला महानगरपालिका क्षेत्रात काँग्रेसचे आंदोलन.

भाजपाच्या राज्यात शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट असून शेतमालाला हमीभाव मिळत नाही. निवडणुकीच्या काळात भाजपा युतीने शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याची घोषणा केली परंतु अद्याप त्यावर निर्णय घेतला नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ३ मार्च रोजी काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार आहे. तसेच महापालिका क्षेत्रातील विकास कामे व जनतेची …

Read More »

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यात केली वाढः असुधारीत वेतन कर्मचाऱ्यांनाही लाभ ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार राज्य सरकारने महागाई भत्यात केली वाढ

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता पर्यंत ५० टक्क्यापर्यंत असलेला महागाई भत्ता आता ५३ टक्क्यावर पोहोचला आहे. हा महागाई भत्ता १ जुलै २०२४ पासून देण्यात येणार आहे. तसेच हा भत्ता थकबाकीसह रोखीने देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दर सहा महिन्यांनी …

Read More »

उच्च न्यायालयात मुंबई महापालिकेची माहिती, १४०० कोटींचे सफाई कंत्राट रद्द निविदा प्रक्रिया रद्द करण्याची महापालिकेवर नामुष्की

झोपडपट्ट्यांतील सफाईचे कंत्राट बेरोजगारांच्या संस्थेला देण्याचे राज्य शासनाचे धोरण असताना महापालिकेने मुंबई शहर बेरोजगार सेवा सहकारी संस्थेऐवजी अन्य संस्थांना कंत्राट देण्याच्या उद्देशाने निविदा प्रक्रिया सुरू केली होती. या निविदा प्रक्रियेवर मागील सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने कानउघाडणी केल्यानंतर निविदा रद्द करण्याची नामुष्की महापालिकेवर ओढवली. महापालिकेने हे कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचा ई-रिक्षा प्रकरणी राज्य सरकारला दोन आठवड्यांचा दिला वेळ माथेरान येथे ई रिक्षा वाटप प्रकरणी प्रस्ताव नव्याने सादर करण्याचे दिले आदेश

माथेरान या पादचाऱ्यांसाठी असलेल्या टेकडीवरील शहरातील मूळ हातगाडी चालकांना २० ई-रिक्षा परवाने वाटप करण्याच्या प्रक्रियेचा पुनर्विचार करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्र राज्याला २ आठवड्यांचा वेळ दिला. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी.आर. गवई आणि ए.जी. मसीह यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने डोंगराळ शहरातील पायलट ई-रिक्षा प्रकल्पाशी संबंधित मुद्द्यांवर सुनावणी केली. महाराष्ट्राच्या …

Read More »

उच्च न्यायालयाचे आदेश, पालघर जिल्हा ग्राहक मंच ४ आठवड्यात कार्यरत करा राज्य सरकारला न्यायालयाने दिले आदेश

पालघर जिल्हा मुख्यालय संकुलात स्थापन करण्यात आलेले पालघर जिल्हा ग्राहक मंच चार आठवड्यात कार्यरत करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला दिले. पालघर जिल्ह्यात जिल्हा ग्राहक मंच स्थापन करण्याची मागणी दत्ता अदोदे यांनी व जनहित याचिकेतून केली होती, त्या याचिकेवर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्या. आलोक आराधे आणि न्या. भारती डांगरे यांच्या …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, आणखी किती मृत्यू होण्याची वाट भाजपा सरकार पाहणार आहे? महिनाभरात ८ मृत्यू होऊनही राज्य सरकारला जीबीएस आजाराचे गांर्भीय नाही

राज्यात जीबीएस GBS चा पहिला रुग्ण सापडून एक महिना झाला आणि या एका महिन्यात या आजाराने ८ मृत्यू झाले आहेत. या आजाराचे रुग्ण आता मुंबईतही सापडू लागले आहे परंतु राज्य सरकार मात्र या आजाराकडे फारसे गांभिर्याने पहात असल्याचे दिसत नाही, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी …

Read More »

सर्वोच्च न्यायालयात राज्यपालाच्या कृती विरोधात याचिका तामीळनाडू सरकारची न्यायालयात याचिका

राज्यपाल डॉ. आर.एन. यांना पदावरून हटवण्याच्या तामिळनाडू सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. १२ विधेयकांना संमती न देणाऱ्या रवीविरुद्ध दाखल केलेल्या रिट याचिकांवर निकाल राखून ठेवला. यातील सर्वात जुने विधेयक जानेवारी २०२० पासून प्रलंबित आहे. सरकारने विशेष अधिवेशनात विधेयके पुन्हा मंजूर केल्यानंतर, राज्यपालांनी पुन्हा मंजूर केलेले काही कायदे राष्ट्रपतींकडे …

Read More »

सामाजिक न्याय विभागाच्या रिक्त पदाच्यासाठीच्या परिक्षेचे वेळापत्रक जाहीर ४ मार्चे ते १९ मार्च या कालावधीत ऑनलाईन परिक्षा होणार

सामाजिक न्याय विभागांतर्गत समाज कल्याण आयुक्तालय, पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग-३ संवर्गातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. या भरती प्रक्रियेचे ऑनलाईन परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. कॉम्प्युटरबेस ऑनलाईन परीक्षा ४ मार्च २०२५ ते १९ मार्च २०२५ रोजी विविध सत्रांमध्ये आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी दिली …

Read More »

विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांची मागणी, मंत्रालयातील चेहरा पडताळणी व्यवस्था बंद करा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर इतके आरोप होता असताना सरकार कारवाई का करत नाही?

मंत्रालयात प्रवेशासाठी आता चेहरा पडताळणीची नवीन व्यवस्था करण्यात आली आहे. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसला आहे. त्यामुळे ही व्यवस्था बंद करण्यात यावी ही मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, तालुका किंवा जिल्हा पातळीवर प्रश्न सुटले नाहीतर सामान्य जनता मंत्रालयात मंत्री, सचिव यांना …

Read More »

राज्यातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विशेष स्पर्धा सर्जनशील जाहिरातींच्या संकल्पना, डिझाईन याबरोबरच टॅगलाईन स्पर्धेसाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन

राज्यातील उपयोजित कला (अप्लाईड आर्ट) महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून मुंबईतील सर ज.जी.कला महाविद्यालयासह महाराष्ट्रात असलेल्या उपयोजित कला महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण, प्रभावी याबरोबरच सर्जनशील आणि कलात्मक जाहिरातींच्या संकल्पना, जाहिरात डिझाईन आणि टॅगलाईन अशा तीन स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धेसाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने …

Read More »