Editor

ईपीएफ खात्यात ई-नामांकन आवश्यक, ऑनलाइन प्रक्रिया जाणून घ्या ईपीएफओच्या वेबसाइटनुसार, ईपीएफ स्कीम १९५२ च्या पॅरा ३३,३४ आणि ६१

सर्व नोकरदार कर्मचाऱ्यांचे पीएफ खाते आहे. हे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) द्वारे चालवले जाते. ईपीएफओच्या वेबसाइटनुसार, ईपीएफ स्कीम १९५२ च्या पॅरा ३३,३४ आणि ६१ नुसार सर्व सदस्यांसाठी नामांकन अनिवार्य आहे. याशिवाय ऑनलाइन डेथ क्लेम सबमिट करताना नामांकन आवश्यक आहे. ईपीएफओ सदस्य कधीही आणि कितीही वेळा त्यांचे ई-नामांकन दाखल …

Read More »

अबब, ऑगस्टमध्ये युपीआयच्या माध्यमातून १० अब्ज व्यवहार डिजिटल पेमेंटवर देशवासीयांचा विश्वास वाढला

युनिफाइड पेमेंट्स सिस्टम (UPI) द्वारे झालेल्या व्यवहारांची संख्या ऑगस्टमध्ये १० अब्जांच्या पुढे गेली आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या आकडेवारीनुसार, ३० ऑगस्ट रोजी युपीआय व्यवहारांची संख्या १०.२४ अब्जांवर पोहोचली आहे. या व्यवहारांचे मूल्य १५,१८,४५६.४ कोटी रुपये आहे. जुलैमध्ये यूपीआय व्यवहारांची संख्या ९.९६ अब्ज होती. तर जूनमध्ये ती ९.३३ …

Read More »

प्रधानमंत्री पीक विमा योजना : कृषी खात्याच्या छाननीत होतायत अपात्र अर्ज बाद कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची समयसूचकता

प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा केवळ पात्र शेतकऱ्याना लाभ मिळावा, यासाठी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी समयसूचकता दाखवून योग्य वेळी प्राप्त अर्जांची छाननी करण्याचे आदेश कृषी खात्याला दिले होते. त्यानुसार कृषी आयुक्त, पुणे यांनी राज्यातील सर्व विमा कंपन्यांना संबंधित अधिकाऱ्यांमार्फत अर्जाची छाननी करण्याचे आदेश दिले होते. या छाननीमुळे आता अनेक अपात्र अर्ज …

Read More »

जी २० अंतर्गत आर्थिक समावेशनासाठी जागतिक भागीदारीची चौथी बैठक मुंबईत एमएसएमईना सक्षम करण्यासाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा या विषयावर परिसंवाद

मुंबईत आजपासून १६ सप्टेंबर २०२३ पर्यंत जी २० अंतर्गत आर्थिक समावेशनासाठी जागतिक भागीदारीची (जीपीएफआय) चौथी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत, जीपीएफआयद्वारे राबवण्यात येत असलेल्या तीन वर्षांच्या आणि आता अंतिम वर्षात असलेल्या आर्थिक समावेशन कृती योजना २०२० च्या उर्वरित कामावर चर्चा समाविष्ट असेल. डिजिटल आर्थिक समावेशन तसेच लघु आणि …

Read More »

राज ठाकरे म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणात मुख्यमंत्री शिंदेंनी तोडगा काढला ते … पूर्ण न होणारी आश्वासन दिली नसतील अशी आशा

मनोज जरांगे पाटील ह्यांचं मराठा आरक्षणासाठी गेले १७ दिवस जे उपोषण सुरु होतं ते त्यांनी मागे घेतलं, ही समाधानाची बाब. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांनी मध्यस्थी करून तोडगा काढला हे बरं झालं. पण हे उपोषण सोडवताना सरकारकडून कोणतीही पूर्ण न होऊ शकणारी आश्वासनं दिली गेलेली नाहीत, अशी मी आशा करतो असे …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा सवाल, ट्रिपल इंजिन सरकारला दुष्काळ जाहीर करण्याची बुद्धी कधी येणार ? ट्रिपल इंजिन सरकारला दुष्काळग्रस्त शेतकऱयांचा डब्बा जड जातोय

महाराष्ट्र यंदा दुष्काळात होरपळतोय. राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात पिके करपली आहेत. काही जिल्ह्यांमध्ये दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे, यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पाणी, चाराटंचाई दिसताच कर्नाटक सरकारनं १९५ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. मग केंद्रात आणि राज्यात भाजपा सरकार …

Read More »

इंडिया आघाडीची समन्वय समिती जाहिरः या १२ संपादक-पत्रकारांच्या कार्यक्रमावर बंदी दिल्लीतील शरद पवार यांच्या निवासस्थानी झाली बैठक

आगामी लोकसभा निवडणूकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला पराभूत करण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या इंडिया आघाडीची समन्वय समिती आज जाहिर करण्यात आली. या समन्वय समितीत काँग्रेससह प्रमुख विरोधी पक्षांना स्थान देण्यात आले आहे. इंडिया आघाडीच्या समन्वय समिती आणि त्यातील सदस्यांची घोषणा नवी दिल्लीस्थित शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत करण्यात …

Read More »

नवीन आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालयांना मंजुरीसह श्रेणीवर्धन व पदभरतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

राज्यातील वरुड, मोर्शी, अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, तुमसर, पुसद, चंदगड, गडहिंग्लज, आजरा, वसमत, गंगापूर, खुलताबाद, औंढा नागनाथ, अकोले, संगमनेर, सुरगाणा, शिरूर, आंबेगाव, मंचर, बारामती, खेड, मोहोळ, अहमदनगर आदी तालुक्यातील नवीन प्राथमिक तसेच उप आरोग्य केंद्रे, उप जिल्हा रुग्णालयांना मंजुरी देण्याबरोबरच, रुग्णालयांचे श्रेणीवर्धन, पदभरतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात यावी. रुग्णालयांना वैद्यकीय …

Read More »

अपात्रतेच्या मुद्दाप्रकरणी शिंदे आणि ठाकरे गटाच्या आमदारांना दोन आठवड्यांची मुदत विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांची माहिती

आमदारांच्या अपात्रतेसंबंधी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतलेल्या सुनावणीत काही निर्णय होईल अशी अपेक्षा होती, मात्र या प्रकरणी आमदारांना दोन आठवड्यांचा अवधी वाढवून मिळाला आहे. या मुदतवाढीसाठी न मिळालेल्या कागदपत्रांबरोबरच गणेशोत्सवाचे कारण पुढे करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या तरी अपात्रतेची टांगती तलवार असणाऱ्या आमदारांना गणपती पावला असे म्हटले जात …

Read More »

सत्तेत असताना मराठा समाजाला आरक्षण देण्याची उद्धव ठाकरेंची इच्छा नव्हती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची टीका

अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणासाठी काहीही न करणारे उद्धव ठाकरे सध्या आरक्षण विषयावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पातळी सोडून टीका करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला आपण स्वतः त्याच भाषेत उत्तर देऊ, असे केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी गुरूवारी सांगितले. भाजपा प्रदेश कार्यालयात …

Read More »