२००२ साली गुजरातच्या मुख्यमंत्री पदी विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी असताना गोध्रा दंगल झाली. त्या दंगलीवरून मोदी यांच्या भूमिकेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने अखेर नरेंद्र मोदी आणि विद्यमान गृहमंत्री अमित शाह यांना निर्दोष ठरविले. त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेसंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक डॉक्युमेंटरी नुकतीच बीबीसीने जगभरात …
Read More »राहुल कलाटे म्हणाले, होय मला अजित पवार, उध्दव ठाकरेंचा फोन होता… पिंपरी चिंचवडची निवडणूक आता तिरंगी
पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून लढविणार असल्याची घोषणा करण्यात आल्यानंतर या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भूमिका घेतली. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडूनही या जागेसाठी आग्रही दावा करत राहुल कलाटे हे संभावित उमेदवार असतील असे संकेतही दिले. मात्र अखेर अजित पवार यांच्या आग्रहामुळे शिवसेने ही जागा राष्ट्रवादीला …
Read More »काँग्रेसची मागणी, MPSC ने नव्या अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीतील संभ्रम दूर करावा नवा अभ्यासक्रमानुसार २०२५ पासून परिक्षा घेण्याचे प्रसिद्धीपत्र आयोगाने जाहीर करावे
MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बदलेल्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी २०२३ पासून करण्याऐवजी २०२५ पासून करावी असा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. परंतु एमपीएसीने राज्यसेवा परिक्षेसंदर्भात अजूनही या निर्णयाबद्दल स्पष्टपणे काहीही जाहीर करण्यात आलेले नाही. दोन दिवसापूर्वी आयोगाने कृषी, वन, अभियांत्रिकी या परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने २०२३ पासून होतील असे जाहीर केले …
Read More »सुप्रिया सुळेंचा सवाल, पंतप्रधानांनी पेन्शनरांना वचन दिले होते काय झाले त्याचे? पंतप्रधान मोदींनी काही राज्य सरकारांनी जूनी पेन्शन योजना लागू केल्यानंतर राष्ट्रवादीच्या सुळे यांनी केली मागणी
संसदेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशाला सुरुवातीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचे अभिभाषण झाले. या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जूनी पेन्शनवरून काँग्रेसशासित राज्य सरकारांचे कान टोचत यामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल असे भाकित केले. त्यामुळे जूनी पेन्शन योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाही विरोधात असल्याचे दिसून आले. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार …
Read More »आमदार शहाजी बापू पाटील यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात दुचाकी स्वाराचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या वाहनाला अपघात होऊन त्यात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून त्याचा जोडीदार गंभीर जखमी झाला आहे. सांगोला तालुक्यातील माळवाड-नाझरे दरम्यान गुरूवारी दुपारी साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला. अशोक नाना वाघामारे (वय ५०, रा. माडगुळे, ता. आटपाडी, जि.सांगली) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव …
Read More »पदुम विभाग म्हणतो व्हॅलेनटाईन डे ला गाईला मिठी.., अजित पवार म्हणाले, मी मिठ्या मारा म्हणालो का? सदसदविवेक बुध्दीला स्मरून योग्य निर्णय घ्या
जगभरात १४ फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा केला जातो. मात्र या दिवसाला भारतातील एका वर्गाकडून विरोध केला जातो. या वर्षाचा व्हॅलेंटाईन डे अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. असे असतानाच केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने प्रेमवीरांना सल्ला देत १४ फेब्रुवारी हा दिवस ‘काऊ हग डे’ अर्थात …
Read More »३६६ ठिकाणी रक्तदान शिबीर, १८०० शाळांध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे 'आपला दवाखाना' योजनेच्या विस्ताराची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा
राज्यात ३६६ ठिकाणी रक्तदान शिबीर, १८०० शाळांध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, जागरुक पालक सुदृढ बालक अभियानाचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या संख्येने राज्यात एकाच दिवशी आरोग्याचा महायज्ञ पहिल्यांदाच होत असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे “आपला दवाखाना” या योजनेच्या विस्ताराची घोषणा देखील केली. राज्यातील सगळ्या घटकांचं आरोग्य उत्तम राहावं, …
Read More »मुंबई आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका कोपरी रेल्वे ओलांडणी पुलाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
मुंबई-ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर प्रवाशांची वाहतूक कोंडीपासून सुटका करण्याच्या दृष्टीने मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्यावतीने उभारण्यात आलेल्या ठाणे शहरातील कोपरी येथील रेल्वे ओलंडणी पुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या पुलाच्या रुंदीकरणामुळे मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील सीमेवरील वाहतूक कोंडी दूर होऊन ती सुरळीत होणार आहे. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत …
Read More »उद्या पंतप्रधान मोदींचा दौरा, पण नाराज राज्यपाल कोश्यारींची कार्यक्रमाकडे पाठ राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त करूनही अद्याप आदेश आला नसल्याने राज्यपालांचा निर्णय
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्ये करत अवमान केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर विरोधकांकडून टीकेची झोड उठविली. यापार्श्वभूमीवर सातत्याने साधारणतः महिनाभरापूर्वी मुंबई दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पदमुक्त करण्याची विनंती केली होती. याबाबतची अधिकृत माहिती राजभवनाकडून जारी करण्यात आली होती. त्यानंतर …
Read More »ठाकरे गटाच्या टीकेवर अतुल लोंढे म्हणाले, पटोलेंचा राजीनामा अध्यक्षांच्या सूचनेनुसार मित्रपक्षाच्या निर्णयावर मतमतांतर व्यक्त करणे अयोग्य
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ‘सामना’तून केलेली टीका अयोग्य आहे. नाना पटोले यांनी तडकाफडकी वा घिसाडघाईने निर्णय घेतलेला नव्हता. राजीनाम्याचा निर्णय काँग्रेसच्या तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सुचनेनुसारच घेतला होता. आघाडीचा धर्म पाळत मित्रपक्षाच्या निर्णयाचा शिवसेनेने मान राखायला हवा, असे प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे …
Read More »
Marathi e-Batmya