Editor

उध्दव ठाकरेंच्या त्या टीकेला शिंदे गटाकडून प्रत्युत्तर, पक्षातील पदांसाठी मतदानच घेतले नाही शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिल्लीतून उत्तर

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह प्रश्नी सध्या सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी प्रलंबित आहे. तसेच शिवसेना आणि पक्षचिन्ह कोणाला मिळणार याची उत्सुकता राज्यातील जनतेत निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यघटनेतील तरतूदीनुसार शिवसेना पक्षाची घटना आणि पदांची निर्मिती करण्यात आली. देशात लोकशाही आहे, असं …

Read More »

विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी, हिवाळी अधिवेशन नाही घेतले किमान अर्थसंकल्पीय… कामकाज सल्लागार समिती बैठकीत केली मागणी

नागपूरचे हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवडे घेण्याची विरोधी पक्षांनी मागणी असतानाही हिवाळी अधिवेशन तीन आठवडे घेण्यात आले नाही. त्यामुळे राज्यातील सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन किमान पाच आठवड्याचे घेण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत केली. तसेच अजित पवार म्हणाले, मराठवाडा मुक्ती …

Read More »

महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहिर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष २०२२ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिक्कामोर्तब केले. आज रेवदंडा येथे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दोघांनीही आप्पासाहेबांची भेटही घेत …

Read More »

उध्दव ठाकरे यांचा भाजपासह शिंदे गटावर निशाणा, तर उद्योगपतीही मुख्यमंत्री-पंतप्रधान होऊ शकतात न्यायालयाने तातडीने निर्णय घेणे अपेक्षित होते

जवळपास मागील सात महिन्यापासून शिवसेना उध्दव ठाकरे गटाची की शिंदे गटाची यावरून राज्यात उत्सुकता लागून राहिली आहे. त्यातच निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात सातत्याने सुनावणी अद्याप प्रलंबित आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयातही एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या विरोधात अपात्रतेचा निर्णय प्रलंबित आहे. त्यातच भाजपाकडून काही विशिष्ट उद्योगपतींसाठी धोरण राबविले जात असून उद्योगपतींच्या आर्थिक …

Read More »

आदित्य ठाकरेंची टीका, कितीही नेते येऊ दे गल्लीगल्लीत फिरायला लावणार वरळीतील शिंदे-फडणवीसांच्या सत्कारावरून साधला निशाणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज ७ फेब्रुवारी रोजी वरळीत जाहिर सत्कार होणार आहे. यावरून युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे. कितीही नेते येऊ दे वरळीतील गल्लीगल्लीत फिरायला लावणार, तरी विजय आपलाच होणार, असा विश्वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला. आदित्य ठाकरेंच्या संवाद …

Read More »

आंबा बागायतदारांच्या मागण्यांसाठी ‘आंबा बोर्ड’ स्थापन करणार पालकमंत्री उदय सामंत यांची घोषणा

आंब्याला हमीभाव मिळावा आणि आंबा बागायतदारांच्या मागण्या, समस्या सोडविण्यासाठी काजू बोर्डाच्या धर्तीवर स्वतंत्र ‘आंबा बोर्ड’ स्थापन करण्याचा निर्णय आज उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. आंबा उत्पादकांना हमीभाव देण्याबरोबरच विविध मागण्या या बोर्डाच्या माध्यमातून सोडविण्यासाठी समिती नेमून या समितीवर दोन बागायतदार प्रतिनिधी नेमण्याचाही निर्णय …

Read More »

खुल्या बाजारातून उभारलेल्या महाराष्ट्र राज्य विकास कर्जाची ५ मार्चला परतफेड ५ तारखेपर्यंत रोखे सादर करा

राज्य शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ८.६२ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्जाची ६ मार्च २०२३ रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल. या कर्जात गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना कर्जाची परतफेड करण्यात येणार आहे, असे वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी कळविले आहे. या कर्जाची अदत्त शिल्लक रकमेची ५ मार्च २०२३ पर्यंत देय असलेल्या …

Read More »

मुख्यमंत्री फेलोशिपसाठी या तारखेपर्यंत अर्ज करा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन

युवकांना राज्य शासनासोबत काम करण्याची संधी देणाऱ्या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. पुढील २४ दिवस ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा २ मार्च २०२३ असा आहे. राज्याच्या विकासात योगदान देण्याची इच्छा असणाऱ्या तरुण व होतकरू मुला – मुलींनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे …

Read More »

शिंदे गटाच्या आमदाराने केली शिफारस अन नियमबाह्य पध्दतीने उंदीर घोटाळ्यातील अभियंत्याला बढती मुख्य अभियंता रणजीत हांडे यांना कार्य अहवाल सादर करण्याचे आदेश

विधानसभेत गाजलेला उंदीर घोटाळ्यातील मंत्रालयातील सार्वजनिक विभागातील शाखा अभियंता कु. रेश्मा चव्हाण यांच्यासाठी बांधकाम मंत्र्यांच्या अधिकाराचा गैरवापर करून त्यांच्याकडे मुख्य अभियंता रणजीत हांडे यांनी आमदार निवास उपविभागाच्या अतिरिक्त कार्यभार सोपवल्याची गंभीर तक्रार विधानसभेतील शिवसेनेचे विधीमंडळ मुख्य प्रतोद आमदार भरतशेठ गोगावले यांनी राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केल्याने त्यांची मंत्री …

Read More »

एफ. सी. बायर्न महाराष्ट्र फुटबॉल करंडक स्पर्धेच्या लोगोचे अनावरण एफसी बायर्नबरोबरच्या करारामुळे राज्यातील फुटबॉल खेळाडू करतील उज्ज्वल कामगिरी-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जर्मनीतील एफ. सी. बायर्न म्युनिक फुटबॉल क्लबबरोबर राज्याने केलेल्या सामंजस्य करारामुळे राज्यातील फुटबॉल खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत उज्ज्वल कामगिरी करतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात एफ. सी. बायर्न महाराष्ट्र करंडक फुटबॉल स्पर्धेच्या बोधचिन्हाचे (लोगो) अनावरण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत …

Read More »