खरीप हंगाम २०२२ मध्ये कापूस पिकासाठी सर्वसाधारणपणे १.७१ कोटी बियाणांच्या पाकिटांची आवश्यकता असते. राज्यात कापूस पिकाच्या एकूण क्षेत्रापैकी बीटी कापसाचे ९८ टक्के क्षेत्र असून, बीटी कापसाच्या बियाणांची २.०१ कोटी पाकिटे उपलब्ध आहेत. सोयाबीन पिकासाठी एकूण ३४.५ लाख क्विंटल बियाणांची आवश्यकता आहे. सध्या सोयाबीनचे ४८.८२ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. याचाच अर्थ चालू वर्षी कापूस, सोयाबीन बियाणांचा कोणत्याही प्रकारचा तुटवडा भासणार नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी …
Read More »शरद पवार म्हणाले, केंद्रात कोणताही प्रश्न आला तर महाराष्ट्रासाठी एकच व्यक्ती म्हणजे… दूरगामी दृष्टी, संकल्प आणि तंत्रज्ञानाधिष्ठीत उपायोजना ही साखर उद्योगासाठी त्रिसूत्री
सद्यस्थितीत महाराष्ट्रात निर्माण होणाऱ्या कोणत्याही प्रश्नावर केंद्र सरकारमध्ये नितीन गडकरी भक्कमपणे महाराष्ट्राच्या मागे उभी असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक केले. पुण्यात वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने राज्यस्तरीय साखर परिषद २०२२ चं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत …
Read More »इथेनॉल निर्मिती शेतकऱ्यांना समृद्ध केल्याशिवाय राहणार नाही पुण्यात इथेनॉलचे पंप सुरू करा-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कृषी आणि ग्रामीण क्षेत्रात क्रांतीची गरज आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषी आणि निगडीत क्षेत्राचे प्रमाण केवळ १२ टक्के आहे. शेतकरी संपन्न झाल्याशिवाय देशाच्या प्रगतीत अनेक अडचणी आहेत. आकांक्षित जिल्ह्यातही शेतीला समृद्ध केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. यादृष्टीने साखर उद्योग हा कृषी आणि ग्रामीण क्षेत्राच्यादृष्टीने महत्वाचा …
Read More »मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, अडचणीत असलं की शरद पवार फोन करतात अन्… वसंतदादा साखर इन्स्टिट्यूटमधील साखर परिषद-२०२२ चे उद्घाटन
साखर परिषद-२०२२ च्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मान्यवर आज उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले की, जेव्हाही संकट असते तेव्हा शरद पवार हे फोन करतात अन् विचारतात, काय चालले आहे, काय करताय …
Read More »अजित पवार म्हणाले, मारुती राया देखील म्हणत असतील माझा जन्म कुठं झाला पिंपरी-चिंचवड येथील राष्ट्रवादीच्या सभेत अजित पवारांची टोलेबाजी
सध्या भावनेला मारक निर्णय होऊ लागले आहेत. त्याला आपण विरोध करायला हवा. सध्याच्या वादानंतर मारुती राया देखील म्हणत असतील माझा जन्म कुठं झाला ते मला माहित आहे, तुम्ही का भांडताय? कोण म्हणतंय कर्नाटक, कोण म्हणतंय नाशिक, कोण म्हणतंय यूपीत…ठीक आहे, झाला असेल.. पण ते मारुती रायाच आहेत. कुठलंतरी वेगळं सांगून …
Read More »मुंबईसाठी पुढील दोन आठवडे महत्वाचे कोरोना चाचण्या वाढवा, आयुक्त चहल यांचे निर्देश
मुंबईत गेल्या काही दिवसांमध्ये कोविड विषाणू बाधितांची संख्या वाढली आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेला संभाव्य चौथ्या लाटेचा इशारा लक्षात घेता आणि पावसाळा सुरू होणार असल्याने जलजन्य आजारांची शक्यता पाहता आरोग्य यंत्रणेसह विभाग कार्यालये व सर्व संबंधित खात्यांनी सुसज्ज राहावे. त्याचप्रमाणे कोविड संसर्ग वेळीच रोखण्यासाठी बाधितांचा शोध घेता यावा म्हणून चाचण्यांची संख्या …
Read More »मंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सर्व महापालिकांना दिले “हे” आदेश आयुक्त, मुख्याधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करा
पूरजन्य परिस्थितीच्या तयारीचा आढावा प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन घ्या, तसेच पूरपरिस्थिती हाताळण्याचे नियोजन करताना स्थानिकांचा सहभाग वाढविण्याची सूचना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. पावसाळ्यातील संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी नालेसफाई, रस्त्यांवरील खड्डे बुजविणे आदी कामे प्राधान्याने करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त, मुख्याधिकाऱ्यांनी स्वतः यात लक्ष घालून ही कामे पूर्ण करावीत. नियंत्रण कक्ष, अग्निशमन …
Read More »पंकजा मुंडे यांचा इशारा, संकटानों तुम्हाला शरण यावं एवढी तुमची औकत नाही स्व.गोपीनाथ मुंडे पुण्यतिथीनिमित्त आयोजित सभेत विरोधकांची काढली आकौत
सत्तेसाठी नाही पण गोपीनाथ मुंडे सत्यासाठी लढला, वंचितांच्या हितासाठी भल्या-भल्यांना भिडला. निर्भिड होती वाणी आणि करारी होता बाणा. हिमालयाला टक्कर दिली पण वाकला नाही त्याचा कणा. अशा गोपीनाथ मुंडेंना आपण आपला नेता मानतो. माझ्या जीवनात एवढंच सांगेन, संकटांनो मी तुम्हाला शरण यावं एवढी तुमची औकात नाही. जीवनाच्या या रणांगणात पाय …
Read More »ग्रामीण युवकांना मिळणार कॅपजेमिनी कडून प्रशिक्षण आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती
राज्यातील ग्रामीण भागातील युवकांना रोजगारक्षम बनविण्यासाठी कॅपजेमिनी कंपनी डिजीटल अकॅडमीच्या माध्यमातून प्रशिक्षण देणार आहे. याबाबत राज्याचे कौशल्य विकास मंत्री राजेश टोपे यांच्या समोर कंपनीच्यावतीने सादरीकरण करण्यात आले. सह्याद्री अतिथी गृहात आज झालेल्या बैठकीत कॅपजेमिनी कंपनीचे डिजिटल इन्क्लुजन विभागाचे उपाध्यक्ष अनुराग प्रताप यांनी याबाबत सादरीकरण केले. राज्याच्या ग्रामीण भागातील युवकांना रोजगारक्षम …
Read More »राज्यसभा निवडणुकीसाठीची भाजपाने धुडकावली मविआची “ही” ऑफर चर्चे दरम्यान दिलेल्या प्रस्तावावर चर्चा झाली नाही
राज्यसभेची निवडणुकीत शिवसेनेने उभा केलेल्या सहाव्या उमेदवाराचा विजय निर्विघ्नपणे व्हावा या उद्देशाने आणि निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडीने भाजपाला ऑफर दिली. त्यावर महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या प्रस्तावावर भाजपाने मविआचा प्रस्ताव धुडकावून लावत भाजपाच्यावतीने नवा प्रस्ताव आघाडीसमोर ठेवला. त्यामुळे महाविकास आघाडीचा प्रस्ताव भाजपाने धुडकावून लावल्याचे स्पष्ट झाले. आमचा पक्ष राष्ट्रीय …
Read More »
Marathi e-Batmya