राज्यातच नाही तर संपूर्ण देशभरात मस्जिदीवरील भोंग्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला असून हे सर्व भोंगे काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. मग या आदेशाची अंमलबजावणी राज्याच्या गृह विभागाने करायला नको का असा सवाल करत जसे आपण रस्ते घाण झाले की आपण स्वच्छ करतो मग कानाला त्रास व्हायला तर भोंगे काढायला नको …
Read More »राज ठाकरे म्हणाले, पवारांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर धाडी ठाण्यातील मनसेच्या उत्तर सभेत टीका करांना दिले उत्तर
मनसेची पाडवा सभा झाल्यानंतर अनेकांनी माझ्या भूमिकेवर संशय व्यक्त करत त्यावर टीका केली. त्या सगळ्यांनी संपलेल्यांबद्दल बोलत नाही म्हणत सगळेच संपलेल्या पक्षाबद्दल बोलत राहीले. मनसे हा संपलेला पक्ष नाही तर दुसऱ्यांना विझविणारा पक्ष असल्याची टीका करत पवारांना ईडीची नोटीस येणार असल्याची कुणकुण लागताच काय नाटक केलं. अजित पवारांच्या बहिणीच्या घरावर …
Read More »उष्माघात टाळण्यासाठी उपाययोजना करा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आदेश
मागील काही दिवसांपासून कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणावर नियंत्रणात आल्यानंतर आता राज्यात सातत्याने तापमानात वाढ होत आहे. आपार्श्वभूमीवर या वाढत्या तापमानाचा परिणाम नागरीकांच्या आरोग्यावर होवू नये या उद्देशाने आणि संरक्षण होण्याच्या अनुषंगाने त्याचबरोबर या वाढत्या तापमानामुळे उष्माघातास सामोरे जावे लागल्यास नागरीकांना मिळावयाच्या वैद्यकीय सुविधांच्या अनुषंगाने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य …
Read More »मंत्री देसाईंचे आदेश, एफएम रेडिओवरील कार्यक्रमात मराठी भाषेचा वापर वाढवा मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांचे आवाहन
आकाशवाणी, दूरदर्शनसह सर्व खासगी रेडिओ वाहिन्यांनी प्राइम टाइममध्ये (महत्वाच्या वेळेत) मराठी भाषेतील कार्यक्रमांना प्राधान्याने स्थान द्यावे, मुंबईतील रेडिओवरील कार्यक्रमात मराठी भाषेचा वापर वाढवावा, अशा सूचना मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी दिल्या. दृक श्राव्य माध्यमातील प्रतिनिधींची बैठक आज मंत्रालयात मंत्री देसाई यांच्या दालनात घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी …
Read More »कुचिक प्रकरणातील पिडीतेच्या आरोपांवर चित्रा वाघ म्हणाल्या, जरूर चौकशी करा भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांचे आव्हान
बलात्कार पीडितेने आपल्यावर केलेल्या आरोपांची राज्य सरकारने जरूर चौकशी करावी, कोणत्याही चौकशीला आपण तयार आहोत असे आव्हान भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिले. शिवसेना पदाधिकारी रघुनाथ कुचिकप्रकरणातील पीडीतीने आज भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यावरच आरोप करत मला सुसाईड नोट लिहिण्यास चित्रा वाघ यांनीच दबाव …
Read More »एसटी कामगारांकडून घेतलेल्या पैशाप्रकरणी खोत व पडळकरांचीही चौकशी करा काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांची मागणी
एसटी कामगारांच्या पाच महिन्यातील आंदोलनादरम्यान त्यांच्याकडून प्रत्येकी ५५० रुपये घेतल्याचे उघड झाले असून जवळपास ७० ते ७५ हजार एस. टी. कामगार या आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनाचे नेतृत्व भाजपाचे माजी राज्यमंत्री आ. सदाभाऊ खोत व भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले होते. या दोघांना या वसुलीतील किती हिस्सा मिळाला? …
Read More »अजित पवारांचे आदेश, शिक्षक-शिक्षतेकर कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी यंत्रणा सुधारा जिल्हा परिषदेच्या तसेच खासगी शाळेतील शिक्षकांच्या वेतनावरील प्रश्नी बैठकीत निर्देश
मुंबईसह राज्यातील शिक्षक, शिक्षकेतरांचे पगार उशीर होत असल्याची तक्रार आज आमदार कपिल पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली. आता कोविडची स्थिती पूर्ववत झाल्यामुळे निदान यापुढील काळात तरी पगार वेळेवर करण्याबाबत अजितदादांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश शिक्षण व वित्त विभागास दिले. राज्यातील शिक्षकांच्या वेतनप्रश्नांसदर्भात उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक झाली. राज्यातील जिल्हा …
Read More »मुख्यमंत्र्यांचे निर्देश, प्रत्येक घरी नळाने पाणी पोहोचवा जलजीवन मिशन आढावा बैठक
पाणी हे जीवन आहे, प्रत्येक घरी नळाने पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेला प्राधान्य देऊन येत्या दोन वर्षात अधिक वेगाने ही योजना पूर्ण करावी आणि खेड्या पाड्यातील जनतेला दिलासा द्यावा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. राज्यात ग्रामीण कुटुंबांना नळाने पाणी पुरविण्याचे ७१ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली. वर्षा …
Read More »गृहमंत्री वळसेंचा टोला, केंद्राला विचारू तुमचे झेड सिक्युरीटीवाले कुठेयत? स्वतःवर आरोप झाले की सामोरं जायचं नाही हे शूरपणाचे लक्षण नाही
आरोप करणं सोपं असतं आणि मग स्वतःवर आरोप झाले की सामोरं जायचं नाही हे शूरपणाचे लक्षण नाही असा जोरदार टोला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी किरीट सोमय्या यांना लगावत केंद्राला तुमचे झेड सिक्युरीटी असलेले कुठे आहेत याचीही विचारणा करू असा खोचक टीका त्यांनी केली. सेव्ह विक्रांत अभियानाच्या नावाखाली सर्वसामान्य नागरीकांकडून …
Read More »ही तर ग्राहकांना लुबाडण्यासाठी कृत्रिम वीजटंचाई आघाडी सरकारला जाब विचारण्याचे- भाजपाचे वीज नियामक आयोगाला आवाहन
सामान्य ग्राहकाच्या खिशात हात घालून खाजगी क्षेत्राला लाभ मिळवून देण्यासाठी कोळशाची कृत्रिम टंचाई निर्माण करून वीज समस्या भासविण्याचा कट आघाडी सरकारने आखला आहे, असा थेट आरोप भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला. सरकारच्या या स्वार्थीपणामुळे सामान्य वीजग्राहकावर भारनियमनाचे संकट ओढवले आहे. शिस्तबद्ध पद्धतीने टंचाई निर्माण …
Read More »
Marathi e-Batmya