राज्यसभा निवडणूकीतील मतदान करण्याच्या पध्दतीवरून भाजपा आणि महाविकास आघाडीने एकमेकांवर आक्षेप घेत त्याप्रश्नी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागितली. त्यानुसार शिवसेनेचे सुहास कांदे यांचे बाद ठरवित बाकीच्या आक्षेपांमध्ये तथ्य नसल्याचे मत सांगत आयोगाने निकाल दिला. त्यानंतर झालेल्या मतमोजणीत महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ असतानाही त्यांच्या संख्याबळाने दगा दिला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या चवथ्या …
Read More »राज्यसभा निवडणूक निकालः आयोगाचा निर्णय काही येईना, सर्वांचा जीव टांगणीला भाजपाच्या आक्षेपावर निर्णय घेण्यास ५ तास उलटून गेले तरी अंतिम निर्णय नाही
राज्यसभा निवडणूकीसाठी मतदान होवून ५ तास झाले तरी अद्याप मतमोजणीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने अद्याप परवानगी दिली नाही. त्यामुळे राज्यातील राज्यसभेच्या उमेदवारांच्या भवितव्याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर या निवडणूकीतील उमेदवारांबरोबरच राज्यातील जनतेला कोण विजयी होणार याबाबतची उस्तुकता लागून राहिली आहे. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कधी परवानगी मिळेल त्यानंतरच मतमोजणी होवून …
Read More »मुस्लिम समुदायाच्या मोर्चावर संजय राऊत म्हणाले, दंगलींचा डाव देशाचा इतका अपमान यापूर्वी कधीही झाला नव्हता
काही दिवसांपूर्वी भाजपाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांनी प्रेषित मोहम्मद पैंगबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह केलेल्या वक्तव्यावरून अरब राष्ट्रांनी भारताबाबत नाराजी व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो कचऱ्याच्या डब्यावर लावून निषेध केला. तसेच त्या वक्तव्यावरून भारताने माफी मागावी अशी मागणी केली. त्यानंतर भाजपाने नुपूर शर्मा यांना पदावरून काढून …
Read More »व्हॉट्सअॅपमध्ये आले नवे फिचर, ग्रुप सदस्य वाढविता येणार दुपटीने या गोष्टींचा समावेश नव्या फिचरमध्ये
फेसबुकने व्हॉट्सअॅप विकत घेतल्यापासून त्यामध्ये नवनव्या फिचरची भर टाकत ते अधिकाधिक लोकपयोगी बनविण्याचा प्रयत्न मेटा कंपनीकडून करण्यात येत आहे. मागील काही काळात एका ग्रुपवरील सदस्यांना एकाचवेळी ग्रुप कॉल करता येण्याचे फिचर अॅड केल्यानंतर व्हॉट्सअॅपद्वारे पैसे पाठविण्याची सुविधाही सुरु कऱण्यात आली. त्यानंतर आता व्हॉट्सअॅपच्या ग्रुप मधील सदस्यांची संख्या दुपटीने वाढविता येण्याची …
Read More »WHO शास्त्रज्ञ म्हणतात, छोट्या छोट्या लाटा येवू शकतात मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन
फेब्रुवारी २०२२ अखेर पर्यंत महाराष्ट्रासह देशात कोरोनाच्या तीन लाटा आलेल्या आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेच्या दरम्यान रूग्णालयात दाखल होणाऱ्यांचे प्रमाण आणि मृत्यूचे प्रमाण कमी होते. मात्र बाधित होण्याचे प्रमाण जास्त होते. त्यानुसार कोरोना संख्येत चांगलीच घट आल्यानंतर आता चार महिन्याच्या अंतरानंतर पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत …
Read More »वाढदिवसानिमित्त चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादीने पाठविल्या “या” खास वस्तू तेलाची बाटली, साबण, ब्रश, टूथपेस्ट आणि निधी भेट म्हणून पाठविल्या-रूपाली ठोंबरे-पाटील
राज्यात एकाबाजूला राज्यसभा निवडणूकीची गरमागरमी सुरु झालेली असून सहाव्या जागेवरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपाकडून निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. यावरून राजकीय दावे-प्रतिदावे होत असताना पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपामध्ये वेगळाच कलगीतुरा रंगताना दिसू लागले आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून खोचक शुभेच्छा देण्यात आल्या. …
Read More »नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याविरोधात मुस्लिम समुदायाकडून निदर्शने दिल्लीत जामा मस्जिदसह सोलापूर, औरंगाबादेत निदर्शने केली
भाजपा प्रवक्त्या नुपूर शर्मा हीने प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह व अवमानकारक वक्तव्याचे पडसाद देशासह महाराष्ट्रातील काही भागात उमटले. दिल्ली, सोलापूर, औरंगाबादेत निषेधाचे मोर्चे निघाले. तसेच नुपूर शर्मा हीच्या अटकेची मागणी करण्यात आली. दिल्लीतील जामा मशिदीबाहेर शुक्रवारी नमाज पठणानंतर मोठ्या प्रमाणात लोक एकत्र आले आणि त्यांनी आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी …
Read More »राज्यसभासाठीच्या ५७ पैकी ४१ जागी बिनविरोध निवडणूक; हे उमेदवार आले निवडूण कपिल सिब्बल, पी.चिदमबरम, राजीव शुक्ला आदी विजयी
राज्यसभेतून १५ राज्यांतील ५७ सदस्य निवृत्त झाल्याने त्यासाठी आज मतदान घेण्यात आले. एकूण ५७ जागांपैकी ११ राज्यांतील ४१ जागांवर बिनविरोध निवडणूक पार पडली आहे. तर उर्वरित जागांवर मतदान घेण्यात आले असून त्या ठिकाणची मतमोजणीला लवकरच पार पडणार आहे. रात्री उशीरा पर्यंत चार राज्यातील १६ जागांचे निकाल हाती येणार आहेत. त्याचवेळी …
Read More »एमआयएमचा पाठिंबा, त्यावर भाजपाची टीका तर भास्कर जाधवांचे प्रत्युत्तर भाजपाची बी टीम, सी टीम कोण अख्ख्या देशाने पाहिलंय
राज्यसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अखेर एमआयएमने आपल्या दोन आमदारांचा पाठिंबा अखेर काँग्रेसला जाहिर केला. तत्पूर्वी एमआयएमने आपला पाठिंबा महाविकास आघाडीला देण्याची तयारी दर्शविल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि एमआयएमचे खासदार इम्तियाझ जलिल यांच्यात चर्चा झाली. त्या चर्चेतील माहिती अद्याप बाहेर आलेली नाही. मात्र आज सकाळी मतदानाच्या दिवशीच असुदद्दीन ओवेसी यांनी …
Read More »भाजपाने घेतला या मंत्री आणि आमदाराच्या मतदानावर आक्षेप पण… निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने फेटाळला आक्षेप
राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. दुपारी तीन वाजेपर्यंत अखेरपर्यंत २८१ आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मात्र भाजपाने मतपत्रिका एकालाच दाखविण्याऐवजी अनेकांना दिसेल असे दाखविल्याचा आरोप करत महाविकास आघाडी सरकारच्या दोन मंत्र्यांवर आणि एका आमदारावर आक्षेप घेतला. महाराष्ट्र विधानसभेत आज राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान घेतलं जात होते. भाजपाकडून महाविकास आघाडीच्या …
Read More »
Marathi e-Batmya