देशाच्या केंद्रीय सत्तेत येवून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला आठ वर्षे झाली. परंतु, या आठ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकाबाजूला देशात भाजपाच्या राजकिय यशाची कमान बरीच चढत्या स्वरूपात ठेवली आहे. त्यामुळे भाजपाला अपयशाचा सामना करावा लागत नाही. मात्र दुसऱ्याबाजूला भारतातील लोकशाहीवादी आणि सामाजिक स्वातंत्र्य व आंतररारष्ट्रीय आर्थिक संकटातून वर …
Read More »२००० ची नोट गेली कुठे? रिझर्व्ह बँक म्हणते गायब झाल्या तब्बल १२.६० टक्के नोटा झाल्या गायब
देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ साली देशात नोटबंदी जाहीर केली. तसेच चलनातून एक हजार आणि पाचशेच्या नोटा बाद केल्या. या नोटबंदीत ५०० ची आणि २००० रूपयांची नवी नोट रिझर्व्ह बँकेने नव्या नोटा आणल्या. नोटबंदीचा फटका अनेक सर्वसामान्य व्यक्तींना बसला. परंतु तरीही नागरीकांनी नव्या नोटेचे स्वागत …
Read More »मुंबई महापालिकेचे आयुक्त चहल यांना केंद्राने घेतले स्वत:च्या अखत्यारीत ऐन महापालिका निवडणूकीच्या तोंडावर तडकाफडकी बदली
मुंबईसह राज्यातील १४ महापालिकेच्या निवडणूकीच्या हालचाली सुरू झालेल्या असताना मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांची तडकाफडकी केंद्र सरकारने बदली करत केंद्र सरकारच्या एका विभागात सचिव पदी वर्णी लावण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे कोरोना काळात आयुक्त चहल यांनी केलेल्या कामाचे कौतुक देशभरासह आंतरराष्ट्रीयस्तरावरही झाले होते. त्यामुळे त्यांची अशा …
Read More »वडिलांच्या वक्तव्यावर संभाजी राजेंनी दिली “ही” प्रतिक्रिया ट्विट करत म्हणाले मी काही भाष्य करणार नाही
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजी राजे यांनी शिवसेनेशी सुरू असलेली चर्चा फिस्कटल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरविला असा आरोप केला. तसेच आपण आता स्वराज्य संघटनेची बांधणी करणार असल्याची घोषणा केली. यावरून राज्यात भाजपाने शिवसेनेवर टीका सुरु केल्यानंतर या प्रकरणी दस्तुरखुद्द संभाजी राजे यांचे वडील श्रीमंत शाहु महाराज यांनीच भाष्य करत संभाजी राजे यांना …
Read More »महिलांसाठी खास योजना; रूपयात १० सॅनिटरी नॅपकिन मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
मासिक पाळी स्वच्छता दिनी महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दारिद्र्यरेषेखालील महिला तसेच बचत गटाच्या महिलांसाठी एक रुपयांमध्ये १० सॅनिटरी नॅपकिन देण्यात येणार आहेत. यामुळे राज्यातील ६० लाख महिलांना आरोग्याच्या दृष्टीने फायदा होणार आहे. ही योजना १५ ऑगस्ट २०२२ पासून सुरू होणार असल्याची माहिती ग्रामविकास …
Read More »संभाजी राजेंच्या उमेदवारी प्रश्नी श्रीमंत शाहु महाराज म्हणाले, त्यांचे कुठे छापून आले नाही काय सल्ला हे माहित नाही पण ते वक्तव्य चुकीचे
राज्यसभा निवडणूकीतील उमेदवारीवरून संभाजी राजे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शब्द फिरवल्याचा आरोप केला. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर टीकेची झोड उठविली. त्यातच आज कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या शिवसेनेचे प्रकक्ते संजय राऊत यांनीही भाजपावर टीकेची झोड उठविली. त्यामुळे …
Read More »भाजपाचा पलटवार, शेंबडं पोर तरी विश्वास ठेवेल का? संजय राऊतांच्या टीकेला चंद्रकांत पाटील यांचे उत्तर
राज्यसभा निवडणूकीकरीता संभाजी राजे आणि शिवसेनेतील बोलणी फिस्कटल्यानंतर आणि त्यानंतर संभाजी राजे यांनी मुख्यमंत्र्यावर आरोप केल्यानंतर भाजपाकडून शिवसेनेवर टीकेची झोड उठविली. या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी संभाजी राजे आणि आमच्या पक्षातील हा विषय इसून इतरांनी चोंबडेपणा करू नये असा खरमरीत टोला लगावला. तसेच चंद्रकांत पाटील हे शिवाजी महाराजांचे …
Read More »नवनीत राणा म्हणाल्या, उद्धव ठाकरेंना दुसरं काम राहिलेलं नाही का? हा शनी… महिन्यानंतर महाराष्ट्रात परतल्यानंतर पुन्हा मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा
काही दिवसांपूर्वी हनुमान चालिसा प्रकरणी तुरूंगात १४ दिवस घालविल्यानंतर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा हे काही दिवस मुंबईत थांबून पुन्हा नवी दिल्लीला गेले होते. तेथे जवळपास काही दिवस राहिल्यानंतर तब्बल ३६ दिवसानंतर पुन्हा नागपूरात परतल्यानंतर राणा दाम्पत्याने येथील शनीच्या मंदिरात जावून पुजा-अर्जा केली. तसेच हनुमान चालिसाचे पठणही केले. …
Read More »संजय राऊतांचा फडणवीस-पाटील यांना टोला, चोंबडेपणा करू नये तर संभाजी राजेंचा विषय आमच्यासाठी संपलाय
राज्यसभा निवडणूक उमेदवारीवरून संभाजी राजे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर शब्द फिरविल्याचा आरोप केला. त्यातच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही शिवसेनेवर शरसंधान साधला. त्यास उत्तर देताना सध्या कोल्हापूर दौऱ्यावर असलेले शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस आणि संभाजी राजेंना प्रत्युत्तर दिले. वाचा …
Read More »मुख्यमंत्र्यांच्या “त्या” आवाहनानंतर मंत्री अस्लम शेख यांचा निर्बंधाबाबत मोठा इशारा पुन्हा निर्बंध येण्याची शक्यता वर्तविली
कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर नियमात शिथिलता आणत निर्बंधमुक्त केले. त्यास आता जवळपास दोन-तीन महिन्याचा कालावधी लोटला असतानाच आता राज्यात पुन्हा एकदा कोरोनाची संख्या वाढताना दिसत आहे. यापार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नागरीकांनी मास्क वापरण्याचे आवाहन केले. आता त्यापाठोपाठ मुंबईचे पालकमंत्री तथा …
Read More »
Marathi e-Batmya