मुंबई : प्रतिनिधी शहरातील विविध भागात असलेल्या केंद्र सरकारच्या मालकीच्या जमिनीवर वसलेल्या झोपडपट्ट्यांच्या पुर्नवसन प्रकल्पाबाबत आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीत कोणताही निर्णय घेतला नाही. मात्र राज्य सरकारच्या मालकीच्या अर्थात महसूली आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मालकीच्या जमिनीवरील झोपडपट्टी पुर्नवसन प्रकल्पांबाबत मात्र गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सादर केलेल्या प्रस्तावातील सूचनांना मुख्यमंत्र्यानी …
Read More »विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम राबविणारः शिक्षकांना मिळणार खास प्रशिक्षण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत
मुंबई: प्रतिनिधी कोविडच्या पार्श्वभूमीवर मागील अनेक दिवस महाविद्यालये ऑनलाईन पद्धतीने सुरू होती, आता ऑफलाइन पद्धतीने महाविद्यालये सुरू करण्यात येत आहेत. कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेले विद्यार्थी ऑफलाईन उपस्थित राहू शकणार आहेत. त्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी व्यापक मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत …
Read More »मुख्यमंत्र्यांचे निर्देश, “कोणाच्याही दबावात न येता अनधिकृत बांधकामे रोखा” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबई महानगरपालिकेस स्पष्ट निर्देश
मुंबई : प्रतिनिधी अनधिकृत बांधकामांवर मुंबई पालिकेने युद्ध पातळीवर तातडीने कारवाई करावी, यामध्ये कोणाचाही दबाव सहन करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या बैठकीत सूचना दिल्या. पूर्व आणि पश्चिम महामार्गालगत देखील मोठ्या प्रमाणावर डेब्रिज टाकल्या जातात असे निदर्शनास आले आहे, याठिकाणी कॅमेरे …
Read More »भाजपा, एनसीबी आणि काही गुन्हेगार मिळून या मुंबईत दहशत माजवतायत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांचा आरोप
मुंबईः प्रतिनिधी भाजपा, एनसीबी आणि काही गुन्हेगार मिळून या मुंबईत दहशत माजवत असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला. दरम्यान महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी याचा वापर कसा केला जातोय याचे पुरावे पुढच्या आठवड्यात देणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. इलेक्ट्रॉनिक पुराव्यावर …
Read More »एनसीबी म्हणते आर्यन खान प्रभावशाली, न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला उच्च न्यायालयात दाद मागणार
मुंबईः प्रतिनिधी बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान हा प्रभावशाली असल्याने त्याचा जामिन अर्ज मंजूर करू नका अशी मागणी एनसीबीच्यावतीने विशेष न्यायालयात युक्तीवाद करण्यात आला. त्यामुळे विशेष दिवाणी न्यायालयाने आर्यन खान याची जामिन अर्ज याचिका फेटाळून लावत असल्याचा निकाल दिला. आर्यन खान याला अटक केल्यानंतर त्याला एनसीबीने किल्ला …
Read More »विमान प्रवाशांची संख्या वाढतेय, गतवर्षीच्या तुलनेत ७९ टक्क्याने वाढ सप्टेंबरमध्ये देशात ७०.६६ लाख प्रवाशांचा हवाई प्रवास
मुंबईः प्रतिनिधी कोरोनाचा उद्रेक कमी होताच विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. सप्टेंबरमध्ये देशात सुमारे ७०.६६ लाख प्रवाशांनी हवाई प्रवास केला. सप्टेंबर २०२० च्या तुलनेत ही आकडेवारी ७९ टक्के अधिक आहे. मागील वर्षीच्या सप्टेंबरमध्ये ३९.४३ लोकांनी हवाई प्रवास केला होता. नागरी उड्डान महासंचालनालयाने (डीजीसीए) ही आकडेवारी जाहीर केली …
Read More »गुंतवणूकदारांना कमाईची संधी, आयपीओसाठी सेबीकडून ६ कंपन्यांना परवानगी १९ हजार कोटींच्या उभारणीसाठी बाजारात
मुंबई: प्रतिनिधी गुंतवणूकदारांना आता शेअर बाजारात आणखी कमावण्याची संधी मिळणार आहे. काही दिवसातच अनेक कंपन्या आपला आयपीओ आणणार आहेत. शेअर बाजार नियामक सेबीने ६ कंपन्यांना आयपीओ आणण्यास मान्यता दिली आहे. आयपीओद्वारे या कंपन्या १९ हजार कोटी रुपये उभारणार आहेत. यासह आणखी ५२ कंपन्या आयपीओ आणण्याच्या तयारीत आहेत. आयपीओ आणण्यास सेबीने …
Read More »या उपसंचालकांच्या निरीक्षणाखाली होणार आरोग्य विभागाची लेखी परीक्षा उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती-संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी जारी केले आदेश
मुंबई: प्रतिनिधी राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गट ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील पद भरतीसाठी २४ आणि ३१ ऑक्टोबर, २०२१ रोजी परीक्षा होणार आहे. परीक्षा अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने व्हाव्यात यासाठी राज्यस्तरीय निरीक्षक म्हणून उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांची आठ परिमंडळासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी संबंधित परिमंडळासाठी संपर्क अधिकारी म्हणून काम करतील. आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी …
Read More »इयत्ता दहावी व बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सप्टेंबर-ऑक्टोबर २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवार, २० ऑक्टोबर, २०२१ रोजी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली. हा निकाल www.mahresult.nic.in या …
Read More »कृषी व संलग्न महाविद्यालये २० ऑक्टोबर पासून सुरु करण्यास मान्यता स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहिम राबविण्याची सूचना- कृषीमंत्री दादाजी भुसे यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील सर्व कृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित शासकीय व खाजगी विनाअनुदानित विद्यालये व महाविद्यालयातील नियमित वर्ग २० ऑक्टोबर, २०२१ पासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील इयत्ता १२ वी पर्यंतचे वर्ग ४ ऑक्टोबर, २०२१ पासून सुरु …
Read More »
Marathi e-Batmya