Editor

शरद पवारांनी जागवल्या गणपतराव देशमुखांच्या आठवणी म्हणाले… देशमुख यांच्या कुटुंबियाची भेट घेत केले सांत्वन

सांगोला-सोलापूर : प्रतिनिधी सतत ११ वेळा निवडूण येत सांगोला विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा शेतकरी कामगार पक्षाचे नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शोक प्रकट करत गणपतरावांसारखा स्वच्छ चारित्र्यसंपन्न नेता मिळणे हे महाराष्ट्राचे भाग्य असल्याची भावना व्यक्त केली. गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबियांची सांगोला येथे जावून …

Read More »

अजित पवारांनी केली मोठी घोषणा : पुण्यात लेव्हल ३ चे निर्बंध आणखी शिथिल आढावा बैठकीनंतर केली दिली माहिती

पुणे : प्रतिनिधी पुणेसह ११ जिल्ह्यात लेव्हल ३ चे निर्बंध लागू केल्याने नाराज झालेल्या व्यापाऱ्यांकडून राज्य सरकारच्या विरोधात आंदोलने करण्यात करत दुकाने उघडी ठेवण्याच्या वेळेत वाढ करण्याची मागणी करण्यात येत होती. यापार्श्वभूमीवर आज अखेर पुणे जिल्ह्याचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लेव्हल ३ चे निर्बंध शिथिल करत पुणे शहरातील …

Read More »

‘मिठी’ होणार गटारमुक्त पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी गाळ काढणे, तरंगता कचरा वेगळा करणे तसेच आजूबाजूने येणारे घाण पाणी रोखणे या तीन टप्प्यांमध्ये काम करून ‘मिठी’ ला नदीचे मूळ स्वरूप प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. याकामी सर्वांचे सहकार्य गरजेचे असल्याचे प्रतिपादन पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. मिठी नदी स्वच्छतेच्या पायलट प्रकल्पाचे …

Read More »

कोट्यावधीच्या मोकळ्या जागेचे आरक्षण बदलून भूखंड बिल्डरांच्या घशात भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भाजपाचे आंदोलन

मुंबई: प्रतिनिधी एकिकडे निसर्गाच्या प्रकोपाला मुंबईकरांना दरवर्षी पावसाळ्यात सामोरे जावे लागत असताना मुंबईतील उरलेल्या सुरल्या मोकळ्या जागांची आरक्षणे बदलून बिल्डरांच्या घशात घातल्या जात आहेत. वांद्रे पश्चिम येथील अशाच २२ भूखंडाचे आरक्षण बदलल्याचा निषेध करीत महापालिका आणि राज्य सरकारच्या विरोधात भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भाजपा कार्यकर्त्यांनी आज …

Read More »

१२१ वर्षानंतर नीरजच्या रूपाने अॅथेलिटीक्समध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक यंदाच्या टोक्यो ऑलिंपिकमध्ये भारताच्या मुकूटात पहिले गोल्ड

टोक्यो-वृत्तसंस्था: प्रतिनिधी स्वतंत्र भारताच्या इतिहासात अॅथलेटीक्समधील भालाफेक क्रिडा खेळात पहिल्यांदाच सुवर्ण पदक मिळविले असून खेळाडू नीरज चोप्राच्या निमित्ताने ही गोष्ट होवू शकली आहे.तसेच आतापर्यत भारताच्या नावावर ७ पदके जिंकल्याची नोंद झालेली आहे. विशेष म्हणजे १२१ वर्षानंतर या क्रिडा प्रकारात भारताने सुवर्ण पदक जिंकले आहे. १९०० मध्ये झालेल्या पॅरिस ऑलिंपिक मध्ये …

Read More »

जाती जनगणना झाली नाही तर आरक्षण टिकणार नाही ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी जाती जनगणना झाली नाही तर कोणतंच आरक्षण टिकणार नाही. मंडलला कमंडलचा विरोध आहे हे लक्षात घेऊन एक व्हा असं आवाहन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज केलं. ओबीसी आरक्षण दिनानिमित्त आयोजित वेबिनारमध्ये ते बोलत होते. मंडल आयोगाच्या अमंलबजावणीची घोषणा याच दिवशी तत्कालीन पंतप्रधान व्ही. …

Read More »

राज्याच्या जीएसटी विभागाचा अजब कारभार: २०० कोटींचा चुना लावणाऱ्यांची बदली आधीची कामगिरी, सीआर न तपासताच बदलीसाठी शिफारस

मुंबई: विशेष प्रतिनिधी मागील दिड वर्षापासून कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठी एकाबाजूला राज्य सरकारची तिजोरी रिकामी होत असून महसूली उत्पन्नाची वाणवा भेडसावत आहे. त्यातच राज्याच्या जीएसटी विभागातील एकाने चक्क तीन वर्षात २०० कोटी रूपयांचा सरकारलाच चुना लावण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नाची बक्षिसी म्हणून चक्क जीएसटी विभागाने या संबधित इन्फोर्समेंट ऑफिसर अर्थात …

Read More »

…. तर मग अहमदाबादच्या क्रिकेट स्टेडियमलाही खेळाडूचेच नाव द्या केवळ गांधी द्वेषातूनच ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराच्या नावात बदल !: नाना पटोले

 मुंबई: प्रतिनिधी केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नेहरु-गांधी नावाचा प्रचंड तिरस्कार आहे. या तिरस्काराच्या मानसिकतेतूनच त्यांच्या नावाने असलेल्या योजना, प्रकल्पाची नावे बदलण्याचे काम मोदी सरकार करत आहे. देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेल्या ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराचे नाव बदलण्याची कृतीसुद्धा त्याच गांधी नावाच्या द्वेषातूनच आलेली आहे. मोदी …

Read More »

हॉटेल, रेस्टाँरंटच्या वेळा वाढणार ? पहिल्या टप्प्यातील निर्बंध शिथिलतेचा आढावा घेणार-मुख्यमंत्री

मुंबई : प्रतिनिधी राज्यात काही जिल्ह्यात पहिल्या टप्पा म्हणून काही निर्बंध शिथिल केले आहेत. त्याबाबतच्या परिणामांचा आणि अजूनही गंभीर परिस्थिती असलेल्या जिल्ह्यांचा आढावा घेऊन, हॉटेल आणि रेस्टाँरंट व्यावसायिकांना वेळ वाढवून देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. यादरम्यान आपल्याला कोरोनाची तिसरी लाट टाळायची आहे. त्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियम कठोरपणे पाळावे लागतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी …

Read More »

मुंबई महापालिका निवडणूकीच्या प्रचारासाठी सोनिया गांधी, राहुल गांधी शिवाजी पार्कवर होणार मेळावा !: एच. के. पाटील

मुंबई: प्रतिनिधी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने तयारी सुरु केली आहे. काँग्रेस स्थापना दिनाचे औचित्य साधत २८ डिसेंबर रोजी शिवाजी पार्कवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तसेच राहुल गांधी यांच्या उपस्थितीत भव्य मेळावा घेतला जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी दिली. टिळक भवन येथे मुंबई काँग्रेसच्या छाननी …

Read More »