Editor

शेअर्स मार्केटमध्ये महिन्यात कमावला ९०० कोटींचा नफा, माहित आहे का? कोण अवघ्या एका महिन्यात राकेश झुनझुनवालाला यांनी कमावले ९०० कोटी कमावले

मुंबई: प्रतिनिधी भारतीय शेअर बाजारात बिग बुल म्हणून प्रसिद्ध असलेल्या राकेश झुनझुनवाला यांना दोन कंपन्यांच्या शेअर्समधून तब्बल ९०० कोटी रुपयांची कमाई झाली आहे. ही कमाई अवघ्या एका महिन्यात झाली आहे. टाटा मोटर्स आणि टायटन या दोन टाटा कंपन्यांच्या शेअर्समधून राकेश झुनझुनवाला यांनी ९०० कोटी रुपये कमावले आहेत. गेल्या एका महिन्यात …

Read More »

प्रविण दरेकरांनी ठोकला हजार कोटींचा दावा मुंबै बँकेची बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल

मुंबई: प्रतिनिधी मुंबै जिल्हा मध्यवर्ती बँक ही राज्यातील प्रगत आणि उत्तम बँक आहे. कारण मुंबै बँक आम्ही बाराशे कोटीच्या टप्प्यावरून दहा हजार कोटीवर मेहनतीने आणली. मुंबईच्या सहकाराचे हे वैभव आहे. या लौकिकास काळीमा फासण्याचे काम दुदैर्वाने काही जणांकडून झाले आहे. त्यामुळे बॅंकेच्या संदर्भात कोणीही उठसूट वाटेल ते स्टेटमेंट देईल हे …

Read More »

या बँकांचे चेकबुक १ ऑक्टोबरपासून अवैध, असं मिळवा नवीन चेकबुक जुनी चेकबुक द्या नवे घेवून जा

मुंबई: प्रतिनिधी अलाहाबाद बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (ओबीसी) आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया (यूबीआय) ची जुनी चेकबुक १ ऑक्टोबरपासून निरुपयोगी होतील. त्यामुळे या बँकेच्या ग्राहकांनी नवीन चेकबुक घेणे आवश्यक आहे. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाचे पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) विलीनीकरण झाले आहे. आता ग्राहकापासून दोन्ही …

Read More »

हि शहरे हाय स्पीड रेल्वेने जोडा, मविआचे पूर्ण सहकार्य मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र

मुंबई : प्रतिनिधी मुंबई –नाशिक- नागपूर हाय स्पीड रेल्वेच्या कामाला गती देताना राज्य सरकार पूर्ण सहकार्य करेल मात्र याच जोडीने जालना आणि नांदेड मार्गे मुंबई ते हैद्राबाद तसेच पुणे ते औरंगाबाद देखील हाय स्पीड रेल्वेने जोडावेत अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे. मुख्यमंत्री आपल्या पत्रात …

Read More »

देशातील जीएसटी प्रणालीची धुरा आता अर्थमंत्री अजित पवारांच्या हाती ‘जीएसटी’ सोपी, दोषविरहीत करण्यासाठी अर्थमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रस्तरीय मंत्रीगट स्थापन

मुंबई: प्रतिनिधी वस्तू व सेवा करप्रणालीतील (जीएसटी) त्रूटी दूर करुन ती सहज, सोपी करण्यासंदर्भात सुधारणा सुचविण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विविध राज्यांच्या उपमुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांचा मंत्रीगट स्थापन करण्यात आला आहे. मंत्रीगटाने शिफारस केलेल्या आणि जीएसटी परीषदेने मंजूर केलेल्या सुधारणांच्या अंमलबजावणीवर देखील हाच मंत्रीगट देखरेख ठेवणार आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने त्यासंदर्भातील …

Read More »

आरोग्य विभागाच्या भरती परिक्षांच्या नव्या तारखा जाहिर, “त्या” क्लिपची चौकशी ९ दिवस पूर्वी परिक्षार्थींना मिळणार हॉल तिकीट-सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी परीक्षा आयोजनातील प्रचंड गोंधळामुळे पुढे ढकलाव्या लागलेल्या आरोग्य विभागाच्या परिक्षांच्या नव्या तारखा सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी जाहीर केल्या. गट क संवर्गासाठी येत्या २४ ऑक्टोबरला तर गट ड संवर्गासाठी ३१ ऑक्टोबरला परीक्षा होणार आहेत. परंतु या परिक्षांच्या नव्याे तारखा जाहिर करण्यात आलेल्या असल्या तरी संपूर्ण …

Read More »

शेतकरी-कामगारांना गुलाम बनविण्याचे काम मोदी सरकारने केले शेतकरी संघटना, डाव्या पक्षांनी पुकारलेल्या ‘भारतबंद’ मध्ये काँग्रेसचा सक्रीय सहभाग

अकोला: प्रतिनिधी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देश रसातळाला गेला असून शेतकरी, कामगार, कष्टकरी, सामान्य माणसांचे जगणे कठीण झाले आहे. मोदी सरकारचे शेतकरीविरोधी धोरण, कामगारविरोधी धोरण, बेरोजगारांच्या विरोधातील धोरण, गरिबांच्याविरोधातील धोरणांना विरोध करण्यासाठी ही लढाई आहे. सामान्य जनतेला न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरुच राहिल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे …

Read More »

अजित पवार म्हणाले, आम्हाला कळायचंच नाही हे काय चाललंय… पर्यटन विभागाच्या बजेटचा सांगितला किस्सा

मुंबईः प्रतिनिधी अनेकजण देश-विदेशात फिरुन आलेले आहेत. परंतु अनेकांनी महाराष्ट्र अजून नीट बघितलेला नाही. जग फिरण्याआधी पहिल्यांदा आपला महाराष्ट्र फिरला पाहीजे. आपली पर्यटन स्थळ बघितली पाहीजे. त्यानंतर जग बघायला बाहेर पडा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. पर्यटन दिनाचे औचित्य साधत सह्याद्री अतिथीगृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी …

Read More »

दुकानदारांनोः खाद्यपदार्थ पॅकेट, बिलावर FSSAI रजिस्ट्रेशन नंबर अनिवार्य अन्यथा होणार कारवाई १ ऑक्टोबरपासून नियम लागू

मुंबईः प्रतिनिधी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणने (एफएसएसएआय – FSSAI) खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या सर्व दुकानदारांना १ ऑक्टोबरपर्यंत आपली नोंदणी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच १ ऑक्टोबरपासून खाद्यपदार्थांशी संबंधित दुकानदारांना मालाच्या बिलावर FSSAI नोंदणी क्रमांक लिहिणे अनिवार्य आहे. याशिवाय डिस्प्लेमध्ये दुकानापासून ते रेस्टॉरंटपर्यंत सर्वांना ते कोणते खाद्यपदार्थ वापरत आहेत ते …

Read More »

वरळीत थ्रीडी मॅपिंगचा ढोल आणि मुंबईच्या रस्त्यांवर खड्ड्यात झोल मुंबईतील ९२७ खड्डे बुजवायला ४८ कोटी?-भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार

मुंबई: प्रतिनिधी मुंबईतील सुमारे २ हजार किमी च्या रस्त्यावर केवळ ९२७ खड्डे आहेत असे महापालिका सांगते आहे. मग खड्डे भरण्यासाठी जे ४८ कोटींची तरतूद केली ती याच ९२७ खड्यांसाठी का? असा उपरोधिक सवाल करीत भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी वरळीत थ्रीडी मॅपिंगचा ढोल आणि मुंबईच्या रस्त्यावर खड्ड्यात झोल …

Read More »