मुंबई : प्रतिनिधी राज्यात गेल्या २० दिवसात कोरोनाचे ८४ हजार ११८ रुग्ण बरे झाले आहेत. याकाळात दिवसाला सरासरी ४२०० रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आज ५४६० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.९२ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ७५ हजार २९ …
Read More »सावधान ! मॅट्रीमॉनिअल संकेतस्थळावरून फसवणूकीची शक्यता सावधगिरी बाळगण्याचे सायबर विभागाचे आवाहन
मुंबई : प्रतिनिधी मॅट्रीमॉनिअल संकेतस्थळावर सायबर भामट्यांकडून लोकांची आर्थिक फसवणूक होऊ शकते. त्यापासून सावधगिरी बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबरतर्फे करण्यात येत आहे. सध्याच्या काळात बऱ्याच उपवर मुलं /मुलींचे पालक आपल्या पाल्याच्या लग्नासाठी योग्य जोडीदार निवडीसाठी अनेक मॅट्रीमॉनिअल संकेतस्थळावर नोंदणी करतात, तसेच विवाह जमविणाऱ्या बऱ्याच संस्थांनीही स्वतःचे संकेतस्थळ सुरु केले आहे. यावर उपवर मुले-मुलींच्या पालकांना …
Read More »‘डिजीटल स्त्री शक्ती’ : ५००० तरुणी होणार ‘सायबर सखी’ राज्य महिला आयोगाचा उपक्रम- ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते होणार शुभारंभ
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि रिस्पॉन्सिबल नेटिझम यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डिजीटल स्त्री शक्ती’ उपक्रम राबविण्यात येत असून याचा शुभारंभ उद्या २१ जुलै रोजी राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे. या उपक्रमांतर्गत मुंबईसह राज्यभरातील १० शहरातील ५०००महाविद्यालयीन तरुणींना सायबर सुरक्षेचे मार्गदर्शन तसेच प्रशिक्षण वेबिनारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. …
Read More »नव्या १२ हजार ५३८ पोलिस भरतीसह २०१९ च्या अर्जदारांचीही भरती होणार गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील पोलिस दलामध्ये विविध पदांवर जवळपास १२ हजार ५३८ पदांच्या भरती साठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना विभागाला देण्यात आल्या असून डिसेंबर अखेर ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. या संदर्भातील एक बैठक नुकतीच मंत्रालयात संपन्न झाली. या बैठकीस गृह विभागाचे अपर मुख्य सचिव …
Read More »कोरोना-राज्यात सव्वा सात लाख लोकं होम क्वारंटाईन कोरोनाच्या १ लाख २० हजार ४८० रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू- आरोग्यमंत्री टोपे
मुंबई : प्रतिनिधी राज्यात आज २२१७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.८१ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ६० हजार ३५७ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ८३०८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख २० हजार ४८० रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. …
Read More »पगाराला पैसे नाहीत मात्र न्यायाधीश-कुटुंबियांच्या चष्म्यासाठी सरकारकडे पैसे विधी व न्याय विभागाकडून प्रस्ताव मंजूर
मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यात कोरोनाचा वाढता प्रसारामुळे अनेक जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्याची पाळी राज्य सरकारवर आली. त्यामुळे थांबलेल्या अर्थव्यवस्थेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारीसाठी पैश्याची चणचण भासत असल्याने दर महिन्याला कर्ज काढत आहे. मात्र राज्यातील मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि त्यांच्या कुटुंबियांना लागणाऱ्या चष्म्यासाठी तब्बल ५० हजार रूपये देण्याचा निर्णय …
Read More »३० जुलैपासून क्यु आर कोडचा पास असेल तरच लोकलमध्ये प्रवेश अर्ज करून पास काढून घेण्याचे राज्याच्या मुख्य सचिव संजय कुमार यांचे आवाहन
मुंबई : प्रतिनिधी अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या अधिकारी/ कर्मचारी वर्गातील प्रवाशांना ये – जा करण्यासाठी ठराविक लोकल रेल्वे सेवा सुरु करण्यात आली आहे. यापुढे मात्र अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकडे ‘क्यु-आर’ कोडचा ई-पास (ईलेक्ट्रॉनिक) असणे आवश्यक आहे. असे ई-पास देण्यासाठी संबंधित कार्यालये, आस्थापनांनी आपल्या कर्मचाऱ्यांची माहिती एकत्रितरीत्या कार्यालय प्रमुखाकडे सादर करावी. संबंधित …
Read More »आशा स्वयंसेविकांना वाढीव मोबदला १ जुलैपासून मिळणार आरोग्य विभागाचा शासन निर्णय जाहीर
मुंबई : प्रतिनिधी ग्रामीण भागातील आरोग्य विभागाचा कणा ओळखल्या जाणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय काही दिवसांपूर्वी घेण्यात आला होता. त्यासंदर्भात आज आरोग्य विभागाने शासन निर्णय जाहीर केला आहे. हा वाढीव मोबदला दि. १ जुलैपासून मिळणार असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. आशा स्वयंसेविकांच्या मानधनात …
Read More »मनिषा म्हैसकर यांच्याकडे पर्यावरण विभागाचा पदभार राज्य सरकारकडून तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई: प्रतिनिधी काही महिन्यांपूर्वी नगरविकास विभागातून राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव पदी नियुक्ती करण्यात आलेल्या सनदी अधिकारी मनिषा म्हैसकर यांच्याकडे आता पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव पदी नियुक्ती करण्यात आली. त्यासह अन्य दोन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या सह आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आलेले आशुतोष सलिल यांची पर्यटन विभागाच्या …
Read More »कोविड-19 औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांची तक्रार या नंबरवर: ही पर्यायी औषधे वापरा अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे आवाहन
मुंबई: प्रतिनिधी कोविड-19 या कोरोना विषाणूच्या आजाराच्या उपचारासाठी लागणारी औषधे मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावी त्यांचा तुटवडा भासू नये या साठी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे विशेष लक्ष ठेऊन आहेत. सातत्याने अधिकाऱ्याच्या, पुरवठादारांच्या बैठका घेऊन ते आढावा घेत आहेत. तर रुग्णालय, फार्मसी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन …
Read More »
Marathi e-Batmya