राज्यातील लोकप्रिय मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना लाभ मिळविण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. जर त्यांनी दोन महिन्यांच्या आत ई-केवायसी पूर्ण केले नाही तर त्यांना लाभ मिळू शकणार नसल्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. गुरुवारी, महिला आणि बालविकास विभागाने या संदर्भात एक परिपत्रक जारी केले. मंत्रिमंडळाच्या …
Read More »छगन भुजबळ यांची मागणी, हैदराबाद गॅझेट जीआर रद्द करा किंवा त्यात आवश्यक त्या सुधारणा करा मराठा समाजाला ज्या प्रमाणात निधी दिला जातोय त्याच प्रमाणात इतरानाही द्या
हैदराबाद गॅझेट जीआरविरोधातील याचिका कोर्टाने फेटाळल्याच्या बातम्या येत आहेत.परंतु ती जनहित याचिका होती,कोर्टाने रिट याचिका दाखल करण्यास सांगितले आहे. आपण अभ्यासपूर्वक रिट याचिका दाखल केलेल्या असून तिथे आपल्याला नक्की यश मिळणार आहे. त्यामुळे कुणीही गैरसमज पसरवू नवे असे आवाहन त्यांनी केले. हा काढलेला जीआर रद्द करा किवा आवश्यक त्या सुधारणा …
Read More »दिल्ली न्यायालयाच्या युट्युबर पत्रकारांच्या विरोधातील आदेशाला स्थगिती अदानीच्या विरोधातील व्हिडीओज हटविण्याचा निर्णय दिला होता
दिल्लीच्या एका न्यायालयाने गुरुवारी (१८ सप्टेंबर २०२५) पत्रकार रवी नायर, अबीर दासगुप्ता, अयास्कांत दास आणि आयुष जोशी यांना गौतम अदानीच्या अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड (एईएल) बद्दल कथित बदनामीकारक सामग्री प्रकाशित करण्यापासून प्रतिबंधित करणाऱ्या पूर्वपक्षाच्या मनाईला स्थगिती दिली. रोहिणी न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश आशिष अग्रवाल यांनी पत्रकारांना सुनावणीची संधी न देता ६ सप्टेंबरचा …
Read More »दिल्ली न्यायालयानंतर सेबीनेही दिली गौतम अदानीला दिली क्लीन चीट सेबीने हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेने केलेल्या आरोपप्रकरणी निर्दोष मुक्तता
नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिना निमित्त संपूर्ण भाजपाकडून आणि भाजपा समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा केला. तसेच अनेक भाजपा समर्थक उद्योजकांनीही पंतप्रधान मोदी यांचे अभिष्टचिंतन केले. या पार्श्वभूमीवर अदानी कंपनीच्यावतीने दिल्ली न्यायालयात दाखल केलेल्या एका प्रकरणात अदानी कंपनीच्या विरोधात जे काही वृत्त अथवा व्हिडीओच्या माध्यमातून युटुब्यर पत्रकारांनी प्रकाशित केलेल्या …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, ‘केंब्रिज’सोबत सामंजस्य करार जागतिक दर्जाच्या शिक्षणाचा नवा टप्पा शालेय शिक्षण विभाग आणि केंब्रिज युनिव्हरसिटी सोबत करार
महाराष्ट्रात विद्यार्थी आणि शिक्षकांची संख्या मोठी असून केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट इंडिया कडे कौशल्य आहे. दोघांमधील सामंजस्य करार हा राज्यातील शालेय शिक्षणाला जागतिक दर्जा प्राप्त होण्यासाठीचा नवा टप्पा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत शालेय शिक्षण विभाग आणि केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट …
Read More »हसन मुश्रीफ यांची माहिती, होमिओपॅथी डॉक्टर्सना आधुनिक औषधशास्त्र नोंदणीला परवानगी रुग्णसेवेचा विचार करून डॉक्टरनी संप मागे घ्या
रुग्णसेवेवर होणाऱ्या परिणामांचा विचार करून डॉक्टरांनी संप मागे घेण्याचे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. रुग्णहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची वैद्यकीय संघटनेची परंपरा पुढे चालू ठेवावी अशी अपेक्षा ही मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केली आहे. हसन मुश्रीफ म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (Certificate Course in …
Read More »भरत गोगावले म्हणाले, बांबू लागवडीमुळे पर्यावरण विकासासह ग्रामीण व हरित महाराष्ट्राला चालना जागतिक बांबू दिनानिमित्त येथे परिषद
पर्यावरणाचे संतुलन राखायचे असेल, पृथ्वीचा ऱ्हास टाळायचा असेल तर वृक्ष लागवडीबरोबर बांबू लागवड हाच मुख्य पर्याय आहे. बांबू लागवड ही शाश्वत पर्यावरण विकासासह शेतकऱ्यांसाठी नफा देणारी आणि ग्रामीण भागासाठी रोजगार निर्मिती करणारी ठरणार आहे. राज्य शासन हरित महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी २१ लाख हेक्टरवर बांबू लागवड करण्यास कटिबद्ध असल्याचे रोजगार हमी …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश महायुतीला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, फडणवीसांनी तात्काळ राजानीमा द्यावा
भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करुन सत्ता हस्तगत केली आहे. हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पुराव्यासह उघड केले. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघात ६८५० मत चोरी झाल्याचे पुराव्याने सिद्ध झाले असून मतचोरी झाली नाही असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते डोळे उघडे करुन पहावे. फडणवीस यांच्याच पोलिसांनी …
Read More »राहुल गांधी यांच्या आरोपाला केंद्रीय निवडणूक आयोगाचे डिजीटली उत्तर आरोपच चुकीचे असल्याचा निवडणूक आयोगाचे उत्तर
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत कर्नाटकातील आळंद मतदारसंघात आणि महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघातील मतदारांची नावे डिलीट आणि समाविष्ट करण्याच्या कामात कशा पद्धतीने हलगर्जीपणा झाला त्यातून मतचोरीचे प्रकार कशा पद्धतीने घडले याचा पर्दाफाश केला. तसेच राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या गलथान आणि चमडी बचाव कामकाज पद्धतीवर टीका …
Read More »केशव उपाध्ये यांचा आरोप, राहुल गांधी हे मतचोरीचे बादशाह मतचोरीच्या खोट्या आरोपांबद्दल राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी
उठसूठ मतचोरीचा डांगोरा पिटणारे राहुल गांधी हे मतचोरीचे बादशाह आहेत. गवगवा करून पत्रकार परिषदा घ्यायच्या, व्हिडिओ सादरीकरण करायचे, काँग्रेसच्या इको सिस्टिमने मतचोरीचा खोटा मुद्दा उचलून धरायचा आणि कोणताही पुरावा सादर न करता केवळ हवा निर्माण करायची हा सध्या काँग्रेसचा धंदा झाला आहे. मतचोरीचा खोटा आरोप करण्याबद्दल राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी. …
Read More »
Marathi e-Batmya