राज्यात जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका निवडणुका होत आहेत. या निवडणुका अत्यंत महत्वाच्या असून काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी विषयवार कामाची जबाबदारी घेतली पाहिजे. प्रभाग रचना, गट व गण तसेच मतदार याद्यांचा अभ्यास करा व काही हरकती असतील तर त्या नोंदवल्या पाहिजेत. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहण्याचा प्रयत्न करा त्यासाठी सोशल मीडिया हे प्रभावी अस्त्र आहे. ७१ …
Read More »शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार शासनाच्या ताब्यात सोमवारी, १८ ऑगस्टला तलवार मुंबईत दाखल होणार
नागपूरकर भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्त्वाचे सरदार रघुजी भोसले यांची महाराष्ट्र शासनाने लिलावात जिंकलेली तलवार आज लंडन येथे जाऊन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी ताब्यात घेतली. सोमवारी १८ ऑगस्ट २०२५ रोजी ही तलवार मुंबईत दाखल होणार आहे. ऐतिहासिक दस्तऐवज असलेली …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, रेल्वे बोगी कारखान्यात स्थानिकांना प्राधान्य द्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला रेल्वेची जागा देण्याबाबत तोडगा काढणार
लातूर जिल्ह्यात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी रेल्वे बोगी कारखान्याची उभारणी करण्यात आली आहे. या कारखान्यात लवकरच वंदे भारत रेल्वेच्या बोगींचे उत्पादन सुरू होणार असून, यामुळे सुमारे दहा हजार रोजगार निर्माण होतील. यामध्ये स्थानिक युवक-युवतींना प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या जिल्ह्यातील विकासकामांच्या आढावा बैठकीत ते बोलत …
Read More »राज्यातील निवृत्तीवेतनधारकांसाठी आनंदाची बातमी, महागाई भत्त्यात २ % वाढ शासनाशी संबधित सर्व संस्था आणि मंडळ, प्राधिकारणाच्या निवृत्तीधारकांना मिळणार लाभ
राज्यातील निवृत्तीवेतनधारकांसाठी आनंदाची बातमी, महागाई भत्त्यात २ % वाढ महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय, शासनाशी संबधित सर्व प्राधिकरण आणि संस्थांमधील निवृत्ती वेतनधारकांना मिळणार लाभ आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यातील निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय जाहीर केला आहे. शासनाच्या नव्या निर्णयानुसार, १ जानेवारी २०२५ पासून मूळ निवृत्तीवेतन आणि कुटुंब …
Read More »या जिल्ह्यात हे पालकमंत्री स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण करणार स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय समारंभ मंत्रालयात; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण
भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन येत्या शुक्रवार, १५ ऑगस्ट रोजी उत्साहात साजरा होणार आहे. राज्याचा मुख्य शासकीय समारंभ मंत्रालय, मुंबई येथे पार पडणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी ९.०५ वाजता राष्ट्रध्वजारोहण केले जाईल. पुण्यातील कार्यक्रमात राज्यपाल ध्वजारोहण करतील. जिल्हा मुख्यालयांवर मंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन …
Read More »उद्धव ठाकरे यांचा आरोप, मतांची चोरी ही लोकशाहीवरील दरोडा निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या मतदार यादीच्या आधारे लोकसभा निवडणूकीत झालेल्या मतांच्या चोरीचा पदार्फाश केला. तसेच बोगस नावे आणि दुबार नावांच्या आधारे अप्रत्यक्षरित्या निवडणूक आयोगाने कशा प्रकारे मदत केली. त्यावरही प्रकाशझोत टाकला. त्यानंतर इंडिया आघाडीच्यावतीने दिल्लीसह देशमभरात आंदोलन करण्यात आले. त्यानुसार शिवसेना उबाठाकडून मुंबईसह महाराष्ट्रात निवडणूक आयोग आणि केंद्र …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, भटक्या कुत्र्यांना पकडा दिल्ली आणि एनसीआरामधील भटके कुत्रे पकडून स्थलांतरित करण्याचे आदेश
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी प्रदेश (एनसीआर) मधील नागरी अधिकाऱ्यांना भटक्या कुत्र्यांना तात्काळ पकडून त्यांची निर्जंतुकीकरण करून त्यांना कायमचे आश्रयस्थानांमध्ये स्थलांतरित करण्याचे निर्देश दिले. कडक निर्देशात न्यायालयाने म्हटले आहे की, या आदेशाची तडजोड न करता अंमलबजावणी करावी. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की जर कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेने या …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला, काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात भाजपाच काँग्रेसयुक्त झाला खडकवासला येथे काँग्रेसच्या दोन दिवसीय कार्यशाळेचा शुभारंभ; कार्यशाळेत आगामी काळातील कार्यक्रमांची रुपरेषा व कृती कार्यक्रमांची आखणी.
काँग्रेस पक्ष हा देशातील सर्वात जुना व अनुभवी पक्ष असून काँग्रेस विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. काँग्रेसकडे सक्षम व समर्थ नेतृत्व व कार्यकर्ते आहेत. तर भाजपा दुसऱ्या पक्षातील कार्यकर्ते खाणारी चेटकीण आहे. मुख्यमंत्र्याच्या आजूबाजूला व मंत्रीमंडळाकडे पाहिले तर काँग्रेसचेच लोक दिसतात. एक कोटी सदस्य व मोदींसारखे नेतृत्व आहे म्हणतात, पण ते …
Read More »पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी अवस्त्रावरून धमकावले, रणधीर जयस्वाल यांचे प्रत्युत्तर अण्वस्त्र ब्लॅकमेलिंगला घाबरणार नाही
पाकिस्तानचे लष्करप्रमुख आणि फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी भारताविरुद्ध केलेल्या ताज्या टीकानंतर, नवी दिल्लीने सोमवारी स्पष्ट केले की, ते अणु ब्लॅकमेलला बळी पडणार नाही. अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या असीम मुनीर यांनी सांगितले की, जर भारताने सिंधू नदीवर धरण बांधण्याचे काम सुरू ठेवले तर इस्लामाबाद “कोणत्याही किंमतीवर” आपल्या पाण्याच्या हक्कांचे रक्षण करेल. …
Read More »मतचोरीच्या विरोधात इंडिया आघाडीची निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोर निदर्शने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील मोर्चा पोलिसांनी रोखला, राहुल गांधी यांना अटक मोर्चेकरी स्थानबद्ध
सोमवारी राष्ट्रीय राजधानीत प्रचंड नाट्यमय घडामोडी घडल्या इंडिया आघाडीच्या सुमारे ३०० विरोधी खासदारांनी ‘मत चोरी’च्या आरोपावरून निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे कूच केली आणि निवडणूक आयोगावर भाजपाशी संगनमत करून त्यांच्या निवडणूक उद्दिष्टांना साध्य करण्याचा आरोप केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा पोलिसांनी मध्यभागी रोखला, ज्यामुळे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव …
Read More »
Marathi e-Batmya