Editor

अनंत गाडगीळ यांचा सवाल, मोदी सरकारमध्ये नव्या पाणबुड्यांना अजूनही मंजुरी का नाही ? १५ पाणबुड्यांचे आयुष्य ७ ते ८ वर्षापर्यतचेच

धक्कादायक बाब म्हणजे भारतीय नौदलाकडे असलेल्या एकूण पाणबुड्यांपैकी जवळपास १५ पाणबुड्यांचे आयुष्य हे आता केवळ ७ ते ८ वर्षापर्यंतच मर्यादित आहे. याशिवाय ३ ते ४ पाणबुड्या पुढील ५ वर्षात निवृत्त कराव्या लागतील अशा अवस्थेपर्यंत पोहोचल्या आहेत. मोदी सरकारने सत्तेवर आल्यापासून एकही पाणबुडी निर्मिती वा खरेदीचा निर्णय घेतलेला नाही, हे खरे आहे का? याचा …

Read More »

भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मोजणीदारांचे काम बंद आंदोलन मागे

राज्य शासन गतिमान आणि पारदर्शकपणे काम करीत आहे. यामध्ये महसूल विभागाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. भूमी अभिलेख विभागातील मोजणीदारांच्या विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोजणीदार संघटनांसमवेत झालेल्या बैठकीत सांगितले. या बैठकीनंतर संघटनांच्या प्रतिनिधींनी तत्काळ कामावर रुजू होत …

Read More »

चिन्नास्वामी स्टेडियमवरील चेंगराचेंगरीच्या घटनेची उच्च न्यायालयाकडून सु-मोटो दखल पुढील सुनावणी १० जून रोजी घेणार

रॉयल चॅलेंजर्सच्या विजयानिमित्त बेंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आयोजित कार्यक्रमानंतर चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर काल झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला. या घटनेची कर्नाटकच्या उच्च न्यायालये सु-मोटो दखल घेत याप्रकरणी खटला दाखल करून घेतला. तसेच या प्रकरणी आज सुनावणी घेतल्यानंतर याप्रकरणाची पुढील सुनावणी १० जून घेण्याचा निर्णय घेतला. कर्नाटक उच्च न्यायालयाचे …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, ५५ हजार कोटींचा समृद्धी महामार्ग ७० हजार कोटींचा कसा झाला? समृद्धी भ्रष्ट महामार्गाची श्वेतपत्रिका काढा, १५ हजार कोटींचा भ्रष्टाचार उघड होईल

देवेंद्र फडणवीस सरकार समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन करून स्वतःची वाहवा करून घेत आहे परंतु हा महामार्ग भ्रष्टाचाराचे कुरण ठरला आहे. ५५  हजार कोटी रुपयांचा हा महामार्ग शेवटी ७० हजार कोटी रुपयांवर गेला. १५ हजार कोटी रुपयांनी प्रकल्पाचा खर्च फुगवला यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे दिसत आहे, त्यामुळे सरकारमध्ये नैतिकता शिल्लक असेल …

Read More »

आमदार रईस शेख यांची माहिती, पशुवधाच्या तपासणी शुल्कात निम्मी कपात मांस ग्राहकांना निर्णयाचा लाभ होणार असल्याचा आमदार शेख यांचा दावा

‘बकरी ईद’ सणाच्या तोंडावर ‘राज्य गोसेवा आयोगा’ने जनावरांचे बाजार बंद पाडून मुस्लीम धर्मियांच्या ‘कुर्बानी’ची कोंडी केली होती. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कत्तलीसाठी पशु तपासणीच्या दोनशे रुपयांच्या शुल्कात मोठी कपात करत पशुपालक व मुस्लीम समाजाला दिलासा दिला आहे. शुल्क कपातीसाठी समाजवादी पक्षाचे ‘भिवंडी पूर्व’चे …

Read More »

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे आवाहन, एकल प्लास्टिकचा वापर टाळा प्लास्टिक निर्मूलन स्वच्छता मोहिम

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत गिरगाव चौपाटी येथे एकल प्लास्टिक निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. वसुंधरेच्या संरक्षणासाठी पर्यावरण विभागाने पाऊले उचलली असून नागरिकांनी एकल वापराच्या प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी केले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र प्रदूषण …

Read More »

आयकर आणि आयकर परतावा सादर करण्यासाठी विंडो केली ओपन आयटीआर १ ते आयटीआर ४ पर्यंतच्या कर दात्यांसाठी केली विंडो

आयकर विभागाने अलीकडेच २०२५-२६ या कर निर्धारण वर्षासाठी आयटीआर-१ आणि आयटीआर-४ फॉर्म वापरून आयकर रिटर्न (आयटीआर) साठी ऑनलाइन फाइलिंग विंडो उघडली आहे. करदाते आता अधिकृत ई-फायलिंग पोर्टलद्वारे प्री-फिलिंग डेटासह त्यांचे रिटर्न सोयीस्करपणे दाखल करू शकतात, ज्यामुळे प्रक्रिया सोपी आणि कमी त्रुटी-प्रवण होते. गेल्या पाच दिवसांत एक लाखाहून अधिक आयटीआर दाखल …

Read More »

जागतिक स्तरावरील अनिश्चिततेमुळे आरबीआय रेपो रेट कमी करण्याची शक्यता घडामोडींकडे दुर्लक्ष करू शकणार नाही

भारतीय रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षात रेपो दरात कपात करण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी जागतिक स्तरावरील अनिश्चितता कारणीभूत ठरू शकते, असे आयसीआरएचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि वित्तीय क्षेत्र रेटिंग्जचे गट प्रमुख कार्तिक श्रीनिवासन म्हणाले. “आरबीआयचा निर्णय मुख्यत्वे देशांतर्गत घटकांवर अवलंबून असेल, परंतु जागतिक स्तरावर काय घडत आहे ते तुम्ही पूर्णपणे दुर्लक्ष करू …

Read More »

भारताचा आशियाई विकास बँकेच्याकडून पाकिस्तानला निधी देण्यास विरोध $८०० दशलक्ष मदत पॅकेजवर गंभीर आक्षेप

भारताने आशियाई विकास बँकेच्या-आशियाई डेव्हलपमेंट बँक (ADB) पाकिस्तानसाठी $८०० दशलक्ष मदत पॅकेजवर गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. एडीबी अर्थात आशियाई विकास बँक-एडिबी ADB ने मंगळवारी पाकिस्तानमध्ये आर्थिक शाश्वतता मजबूत करण्यासाठी आणि सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन वाढविण्यासाठी $८०० दशलक्ष मदत कार्यक्रमाला मान्यता दिली. भारताने सीमापार दहशतवादाला पाकिस्तानच्या पुढील आर्थिक आणि सुरक्षा परिस्थितीसाठी मोठा …

Read More »

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे आदेश ऑक्सीजन, आयसोलेनशन बेड, व्हेंटीलेटर आदी गोष्टींचे नियोजन करा

भारतात एकाच दिवसात ८६४ कोविड रुग्णांची वाढ झाल्याने एकूण सक्रिय रुग्णसंख्या ४,३०२ वर पोहोचली आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी एका वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे. “राज्यांना ऑक्सिजन, आयसोलेशन बेड, व्हेंटिलेटर आणि आवश्यक औषधांची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत,” असे एका अधिकाऱ्याने एजन्सीला सांगितले. आरोग्य सेवा महासंचालक (डीजीएचएस) डॉ. …

Read More »