महाराष्ट्र सरकारने राज्यातील सरकारी शाळा सीबीएसई CBSE पॅटर्नवर पुढील शैक्षणिक वर्षापासून आणण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपा युती सरकारचा हा निर्णय राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व बालभारतीच्या अस्तित्वावर गदा आणणारा आहे. सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी माजी शालेय शिक्षण मंत्री खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे. …
Read More »शिवसेना उबाठाचे भास्कर जाधव आणि शिवसेनाओएफसी निलेश राणे यांच्यात चकमक लक्षवेधी सूचनांवरून उडाली चकमक
विधानसभेच्या कामकाजात दाखवण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनांच्या संख्येवरून शुक्रवारी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार नीलेश राणे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. या दोघांमधील वाद इतका वाढला की दोघांनी एकमेकांचा एकेरी उल्लेख केला. या गोंधळामुळे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अध्यक्षांच्या आसनासमोर जाऊ लागले. तेव्हा तालिका अध्यक्ष योगेश सागर …
Read More »महसूल सुनावण्या डिजिटल होणार! महसूल विभागाचे महत्वाकांक्षी पाऊल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात 'प्रत्यय' ऑनलाइन प्रणालीची अंमलबजावणी
राज्यभरातील महसूल प्रकरणांवरील सुनावण्या डिजिटल स्वरूपात होणार असून, त्यादिशेने आज प्रत्यय ही पेपरलेस रिव्हिजन व अपील प्रणाली सुरू महसूल विभागाने आज महत्वाकांक्षी पाऊल टाकले. प्रत्यय प्रणालीमुळे फेरफार, तक्रारी, अपील, पुनर्विलकन अर्ज आदी विषय ऑनलाईन पद्धतीने हाताळता येतील. यामुळे नागरिकांना मुंबई किंवा इतर ठिकाणी प्रत्यक्ष हजर राहण्याची गरज भासणार नाही. असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, उद्भव योजनांचे बळकटीकरण करण्याचे निर्देश तिसऱ्या योजनेसाठी पर्यायांचा अभ्यास करावा
इचलकरंजी शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी पंचगंगा नदी स्त्रोत, कृष्णानदीवरील मजरेवाडी उद्वभव या अस्तित्वातील योजनांचे बळकीटकरण करावे. त्याबरोबरच तिसरी योजना तयार करण्यासाठी पर्यायांचा अभ्यास करावा. पूरस्थितीतील पाणी साठवून त्याचा वापर करण्यासंदर्भातही विचार करून अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. इचलकरंजी शहराच्या पाणीपुरवठ्यासंदर्भात विधानभवनातील समिती कक्षात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली …
Read More »मुंबईतील रस्त्यांवरून भाजपा आमदारांकडून उपमुख्यमंत्र्यांचा नगरविकास विभाग लक्ष्य उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेणार असल्याची उदय सामंत यांची माहिती
मुंबईतील रस्त्यांचे वेगाने काँक्रिटीकरण करणे हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महत्त्वाकांक्षी संकल्प आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी पुढील आठवड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. या बैठकीत मुंबईतील सर्व आमदारांच्या मागण्या जाणून घेतल्या जातील आणि त्या लवकरच …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, देवस्थान इनाम जमिनीबाबत कायदा करणार गोपीचंद पडळकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना दिली माहिती
देवस्थान जमिनी या इनाम वर्ग ३ च्या जमिनी असून त्या अहस्तांतरणीय आहेत. या जमिनीच्या प्रश्नासंदर्भात सर्वसमावेशक निर्णय घेण्यासाठी प्रधान सचिव, महसूल यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अहवालानंतर यासंदर्भात कायदा करण्याचे शासनाचे धोरण असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. देवस्थान इनाम जमीन संदर्भात सदस्य गोपीचंद पडळकर …
Read More »पंकजा मुंडे यांचे आश्वासन, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उद्योग घटकावर कारवाई करणार सना मलिक यांच्या प्रश्नाला उत्तर देताना दिले आश्वासन
औद्योगिक प्रकल्पांनी पर्यावरणीय व सुरक्षा नियमांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. जे उद्योग घटक नियमांचे उल्लंघन करतील त्या उद्योग घटकांवर कारवाई केली जाईल, असे पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी सदस्य सना मलिक यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या लक्षवेधीच्या उत्तराच्या वेळी सांगितले. मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले की, आरएनसी प्लांटच्या संदर्भातही …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, सोमनाथ सुर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार पोलिसांना बडतर्फ कधी करणार? परभणी प्रकरणी पोलीसांना कोंबिंग ऑपरेशन व लाठीहल्ल्याचे आदेश कोणी दिले? गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कोणाला वाचवत आहेत ?
परभणीतील आंबेडकरी विचारांचा सुशिक्षित तरुण सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू पोलीसांच्या मारहाणीमुळे झाला असताना त्याची आकस्कित मृत्यू अशी नोंद करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. हा मृत्यू कोठडीत असताना पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला असा शवविच्छेदन अहवाल असतानाही सरकारने ते गांभिर्याने घेतले नाही. आता न्यायदंडाधिकारी यांच्या अहवालातही सोमनाथ सुर्यंवंशी यांचा मृत्यू मारहणीमुळेच झाल्याचे उघड …
Read More »नितेश राणे यांची सूचना, मुंबईत पर्यावरणपूरक वॉटर टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट सुरू करा देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणारः स्विडनची कँडेला कंपनी पायलट प्रोजेक्ट राबविणार
मुंबईकरांची ई-वॉटर टॅक्सीबाबतची उत्सुकता संपणार असून देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार आहे. स्वीडनची कँडेला कंपनी पर्यावरणपूरक वॉटर टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट राबवून ही सेवा त्वरित सुरू करण्याच्या सूचना मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी स्वीडनचे महावाणिज्य दूत स्वेन ओस्टबर्ग यांना बैठकीदरम्यान केल्या. मंत्रालयात आज मत्स्य व्यवसाय व बंदरे …
Read More »टीव्ही अँकर सुधीर चौधरी यांना एका शो साठी प्रसार भारती १५ कोटी देणार दरवर्षाकाठी १० टक्के वाढीने १५ कोटी रूपयांची रक्कम देणार
केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेली प्रसार भारती दूरदर्शनवर आठवड्याच्या एका दिवशी प्रसारित होणाऱ्या एका तासाच्या कार्यक्रमासाठी न्यूज अँकर सुधीर चौधरी यांच्याशी दरवर्षी १५ कोटी रुपयांचा करार करणार आहे, असे वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले. “हा करार निश्चितच विचाराधीन आहे आणि लवकरच त्यावर स्वाक्षरी केली जाईल,” असे नाव न सांगण्याच्या अटीवर एका …
Read More »
Marathi e-Batmya