Editor

माहिती लोकांपर्यंत प्रभावीरीत्या पोहोचविण्यासाठी डिजीटल माध्यम धोरण तयार करणार एआय तंत्राचाही वापर, नवमाध्यमांच्या प्रभावी वापरावर भर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शासनाच्या विविध योजना, उपक्रम, शासकीय निर्णय इत्यादी माहिती लोकांपर्यंत जलदगतीने आणि प्रभावीरीत्या पोहोचविण्यासाठी शासनाचे डिजीटल माध्यम धोरण लवकरच तयार करण्यात येईल. यासाठी यापुढील काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्राचा वापर करण्यात येईल. विविध नवमाध्यमांचा प्रभावी वापर करून शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राज्य शासनाच्या …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती,… निर्णय देताना नैसर्गिक पणा दाखविणे गरजेचे उच्च न्यायालय आणि ट्रायल कोर्टात निर्णयाचे नेहमीच आव्हान

सर्वोच्च न्यायालयाने अलिकडेच निकालाच्या आतच निकालामागील हेतू स्पष्टपणे सांगण्याची गरज अधोरेखित केली. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की प्रत्येक निर्णय हा संविधानाच्या कलम १४१ अंतर्गत बंधनकारक पूर्वग्रह म्हणून काम करत नाही. म्हणून, निर्णय हा पक्षांमधील विशिष्ट वाद सोडवण्यासाठी आहे की अनुच्छेद १४१ अंतर्गत पूर्वग्रह स्थापित करण्यासाठी आहे हे स्पष्ट करणे आवश्यक …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाने सायबर तक्रारीसंदर्भातील रिट पिटीशन फेटाळून लावली एकाच प्राधिकरणाकडे तक्रारी वर्ग करण्याची याचिका फेटाळली

सर्वोच्च न्यायालयाने आज (१० जानेवारी) सायबर फसवणुकीचा बळी असल्याचा दावा करणाऱ्या याचिकाकर्त्याविरुद्ध दाखल केलेल्या अनेक सायबर तक्रारी एकाच प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्याची मागणी करणारी रिट याचिका फेटाळून लावली. रिट याचिकेत, याचिकाकर्त्याने असा आरोप केला आहे की त्याच्याविरुद्ध एकाच कारणामुळे तीन सायबर तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे भारतीय संविधानाच्या कलम २१ …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पर्यटन पोलीस नेमणार आगामी शंभर दिवसात पर्यटन विभागाने करावयाच्या कामकाजाचा घेतला आढावा

पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी राज्यात पर्यटन पोलीस नेमण्यात येणार असून नाशिक येथील राम- काल पथ विकास, आणि सिंधुदुर्ग (मालवण) येथील समुद्रातील पर्यटन हे प्रकल्प वॉररूमशी जोडण्यात येतील, केंद्र व राज्य शासनाकडून राबविण्यात येणारे पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे. यासह राज्य लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत पर्यटन विभागाच्या १४ सेवा ‘आपले सरकार’ संकेतस्थळावर …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा सवाल,… मुंबईकरांच्या आरोग्यासाठी निधी नाही? मुंबईकरांच्या जीवाशी चाललेला खेळ थांबवून बीएमसी रुग्णालयातील औषध पुरवठा तातडीने पुर्ववत करा

बृहन्मुंबई महानगरपालिका रुग्णालयांना औषध पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांची १२० कोटी रुपयांची बिले सरकारने थकवल्याने औषध पुरवठा थांबवण्यात आल्याची घटना अत्यंत गंभीर आहे. बीएमसीकडे अथवा राज्य सरकारकडे पैसे नाहीत हे पटणारे नाही. जाहिरातबाजीवर उधळपट्टी करण्यासाठी सरकारकडे पैसा आहे मात्र मुंबईकरांच्या आरोग्यासाठी पैसा नाही का? असा संतप्त सवाल करत मुंबईकरांच्या जीवाशी चाललेला खेळ …

Read More »

ऐन हिवाळ्यात विक्रमी वीजेची मागणी महावितरणकडून २५,८०८ मेगावॅटचा पुरवठा

थंडीमुळे हिवाळ्यात विजेची मागणी कमी होत असली तरी यंदा शनिवारी ११ जानेवारी रोजी राज्यात २५,८०८ मेगावॅट इतकी आतापर्यंतच्या विक्रमी विजेची मागणी नोंदविली गेली व महावितरणने यापूर्वीच नियोजन केल्यानुसार कोणतीही अतिरिक्त वीजखरेदी न करता ही मागणी पूर्ण केली, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

मकर संक्रात आणि कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजार कोसळला निफ्टी २५० अंकानी तर बीएसई ८४० पेक्षा जास्त घसरला

आज आठवड्याचा पहिला दिवस असतानाही आणि मकरसंक्रातीच्या पार्श्वभूमीवर ४७ वर्षानंतर पहिल्यांदाच आलेल्या महाकुंभ मेळाव्याला आज सुरुवात झाली. मात्र शेअर बाजारावर आज दबाव असल्याचे दिसून आले. निफ्टी ५० १.१% किंवा २५० अंकांपेक्षा जास्त घसरून २३,१७२.७० वर पोहोचला. तर बीएसई सेन्सेक्स ८४० अंकांपेक्षा जास्त घसरून ७६,५३५.२४ वर पोहोचला. व्यापक बाजार निर्देशांक, निफ्टी …

Read More »

रोहित पवार यांची टीका, देशमुख कुटुंबियावर आंदोलनाची वेळ येणं हेच दुर्दैवी धनंजय देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांच्या आंदोलनावर व्यक्त केली भूमिका

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटत असतानाच आणि याप्रकरणी राज्यातील जनतेच्या भावना तीव्र असताना राज्य सरकारकडून राजकीय तडजोड करत या प्रकरणाचा तपास करत असल्याची चर्चा सर्वच क्षेत्रात आहे. त्याच या हत्या प्रकरणातील तपासाची माहिती पोलिसांकडून देशमुख कुटुंबियांना देण्यात येत नसल्याच्या मागणीवरून संतोष देशमुख यांचे बंधू …

Read More »

चार-सहा तासाच्या आंदोलनानंतर धनंजय देशमुख यांचे आंदोलन मागे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासाची माहिती द्यावी या मागणीसाठी आंदोलन

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांकडून सध्या सुरु असलेल्या तपासाची माहिती द्यावी या मागणीसाठी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पाठपुरावा करूनही अद्याप याप्रकरणाच्या तपासाची माहिती दिली नाही. उलट धनंजय देशमुख यांना धमकाविण्याचा प्रकार काहीजणांकडून होत आहे. त्यामुळे धनंजय देशमुख आणि गावकऱ्यांकडून पोलिस प्रशासनाच्या विरोधात पाण्याच्या टाकीवर …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारा पणन विभागाच्या १०० दिवसांच्या आराखड्याचा आढावा

दरवर्षी पणन विभागामार्फत सोयाबीनची खरेदी केली जाते. ही खरेदी कोणत्याही अडथळ्याशिवाय होण्यासाठी विभागाने कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे पणन विभागाकडून १०० दिवसात करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, समृद्धी महामार्गालगत उभारण्यात येणारे …

Read More »