Editor

सारे लक्ष फेडरल ओपन मार्केट कमिटीच्या बैठकीकडे, व्याज दर वाढणार की कमी होणार व्याज दराबाबत आज निर्णय होणे अपेक्षित

यूएस फेडरल रिझर्व्हच्या फेडरल ओपन मार्केट कमिटी (FOMC) ची बैठक या दोन दिवसांत होत आहे. जागतिक गुंतवणूकदार जूनच्या FOMC बैठकीतून उद्भवणाऱ्या तीन गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. पहिला म्हणजे यूएस फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढवणार की कमी करणार; दुसरी गोष्ट म्हणजे फेड चेअर पॉवेल हे चकचकीत राहतील किंवा अधिक धूर्त स्वरात …

Read More »

बाजारातील महागाई दर १२ महिन्याच्या सर्वात निच्चांकी पातळीवर महागाईचा दर ५ टक्क्याच्या खालीच

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, मे २०२४ मध्ये ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) महागाई किंवा किरकोळ चलनवाढ ४.७५ टक्क्यांच्या १२ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. एप्रिल २०२४ मध्ये भारतातील किरकोळ महागाई ४.८३ टक्के होती. मार्च २०२४ पासून लागोपाठ तीन महिने दर ५ टक्क्यांच्या खाली आहे. “अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक …

Read More »

बचतीच्या विम्यावर विमा कर्ज बंधनकारकः आयआरडीएआयकडून परिपत्रक नव्या परिपत्रकातील काही ठराविक मुद्दे

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण आयआरडीएआय (IRDAI) ने बुधवारी सांगितले की पॉलिसी कर्जाची सुविधा आता सर्व जीवन विमा बचत उत्पादनांसाठी अनिवार्य आहे, पॉलिसीधारकांना तरलतेच्या गरजा पूर्ण करण्यास सक्षम करण्याकरीता हा निर्णय घेण्यात आला आहे. आयआरडीएआय IRDAI ने जाहीर केले की पॉलिसीधारकांना अटी आणि शर्तींचे पुनरावलोकन करण्याची मुभा देणारा फ्री …

Read More »

दृष्टिबाधितांच्या सक्षमीकरणासाठी व्हिजन डॉक्युमेंट राज्यपालांच्या हस्ते अत्याधुनिक ब्रेल प्रिंटिंग मशीनचे उद्घाटन

नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड – ‘नॅब’ – संस्थेने ब्रेल पुस्तक छपाईसाठी खरेदी केलेल्या अत्याधुनिक ‘ब्रेलो 300’ या प्रिंटिंग मशीनचे उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते संस्थेच्या वरळी येथील मुख्यालयात करण्यात आले. राज्यपालांनी दिलेल्या स्वेच्छा निधीतून खरेदी केलेल्या या छपाई मशीनमुळे दृष्टिबाधित व्यक्तींसाठी क्रमिक पुस्तके, धार्मिक पुस्तके, पत्रिका व अवांतर …

Read More »

शरद पवार यांचा थेट इशारा, मला सरकार बदलायचय, चार-सहा महिने थांबा इंदापूर आणि पुरंदरमध्ये शेतकऱ्यांशी बोलताना दिला इशारा

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत अपराजित म्हणून असलेल्या भाजपाला बहुमताच्या जवळपास फिरकू न देण्याचे आव्हान देशभरातील विरोधकांनी केले. इंडिया आघाडीने भाजपा आणि भाजपा प्रणित आघाडीला २९० जागांवर रोखले. तर काँग्रेसला ९९ जागांवर तर इंडिया आघाडीला २३५ जागांवर रोखले. तर त्यातच महाराष्ट्रात ४८ जागांपैकी भाजपा प्रणित महायुती सरकारला तर १७ जागांवर रोखत …

Read More »

विधान परिषदेच्या निवडणूकीत शिवसेना उबाठा+ काँग्रेस विरूध्द भाजपा लढत शिंदे गटाच्या शिवसेनेचे दीपक सावंत यांच्यासह अनेकांची माघारः २६ जून रोजी मतदान

विधान परिषदेच्या चार जागेसाठी ८८ उमेदवारांनी दाखल केलेले अर्ज वैध ठरले. मात्र यातील शिंदे गटाच्या शिवसेनेच्या उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अर्ज माघार घेतल्याने मुंबईतील ८ जण रिंगणात आहेत. तर कोकणात मनसे पाठोपाठ शिवसेना उबाठा गटाच्या किशोर जैन आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतली. तर …

Read More »

शाहु महाराज योजनेतंर्गत परदेशी शिक्षणाच्या संधी: १२ जुलैपर्यंत अर्ज करा सामाजिक न्याय विभागाचे अर्ज करण्याचे आवाहन

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रती वर्षी अनुसूचित जाती प्रवर्गातील ७५ विद्यार्थ्यांना (मुले-मुली) परदेशांमध्ये अध्ययन अर्थात शिक्षण घेण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी परदेश शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी १२ जुलै २०२४ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन समाजकल्याण …

Read More »

अजित पवार यांचे निर्देश, आवश्यकता असल्यास अतिरिक्त खतांचा साठा मंजूर करा कृषी अधिकाऱ्यांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

राज्यात काही ठिकाणी चांगला पाऊस पडला असून शेतकऱ्यांनी पेरणीच्या पूर्वतयारीला सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्यात बी-बियाणे आणि खतांच्या मागणीत वाढ होत आहे. शेतकऱ्यांना युरिया आणि डीएपी खतांचा पुरेसा पुरवठा केला जात असला तरी येणाऱ्या काळात खतांचा तुटवडा जाणवू नये यासाठी राज्य शासनातर्फे खतांचा संरक्षित साठा (बफर स्टॉक) करण्यात येतो. पणन …

Read More »

ओरिसाचे मुख्यमंत्री म्हणून मोहन माझी यांनी घेतली शपथ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शपथग्रहण सोहळा

मोहन माझी यांच्या नेतृत्वाखाली ओडिशातील पहिल्या भाजपा सरकारचा शपथविधी सोहळा आज (१२ जून) भुवनेश्वर येथे पार पडला. भुवनेश्वर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अनेक केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या समारंभात चार वेळा आमदार आणि आदिवासी नेते मोहन चरण माझी यांनी ओडिशाचे पहिले भाजपा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. भाजपाचे ज्येष्ठ नेते …

Read More »

एनडीए नेत्यांच्या उपस्थित टीडीपीचे चंद्राबाबू नायडू यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित

तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) राष्ट्रीय अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, वैद्यकीय आणि आरोग्य मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी आणि बंदी संजय, भारताचे माजी सरन्यायाधीश …

Read More »