राज्यातील १२ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत १२५ पंचायत समित्यांमध्ये शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये राज्यातील तसेच राज्याच्या सीमेलगतच्या सर्व मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कामगार कर्मचाऱ्यांना या दिवशी सुट्टी किंवा सवलत देणे बंधनकारक आहे, असे परिपत्रक उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने जारी केले आहे. यानुसार, निवडणूक होणाऱ्या …
Read More »शरद पवार यांचा तटकरे, पटेल यांना टोला, बैठकीत नसणाऱ्यांना काय माहित असणार दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणाच्या प्रश्नावर शरद पवार यांच्या टोला
अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकारण पूर्णपणे बदलले आहे. त्यांच्या चितेची राख थंड होत नाही तोच अस्थिविसर्जनापुर्वीच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या दरम्यानच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलिनीकरणाबाबत मोठे दावे प्रतिदावे केले जात आहेत. मात्र या संदर्भात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी बैठकीत …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा आरोप, दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येऊ नये त्यासाठी हा कट शिजला सुनेत्रा पवार यांनी तेरावा होण्यापूर्वीच शपथविधीचा कार्यक्रम उरकून घेतला
दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊ नये म्हणून कुठेतरी कट शिजला आणि त्यातून ही ठिंगणी पडली असे मला वाटते, खरंतर आपल्या संस्कृतीला आणि आपल्या हिंदू परंपरेला धारून हा शपथविधीचा कार्यक्रम झाला असं कोणीच मानायला तयार नाही. हा निर्णय सुनेत्रा पवार यांनी एवढ्या घाईने का घेतला असं लोकांचं मत आहे, कदाचित भाजपाच्या …
Read More »सोनम वांगचुक यांच्या स्थानबध्दतेचे केंद्राकडून सर्वोच्च न्यायालयात समर्थन वांगचूक यांच्याकडूनच फुटीरता वादी चिथावणीखोर भाषणे
केंद्र सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या प्रतिबंधात्मक अटकेचे समर्थन केले. त्यांचे सार्वजनिक भाषणे चिथावणीखोर, फुटीरतावादी संदेश देणारी आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक होती, विशेषतः एका सामरिकदृष्ट्या संवेदनशील सीमावर्ती प्रदेशात, असा युक्तिवाद सरकारने केला. केंद्र सरकारतर्फे हजर झालेले सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचा जात निहाय जणगणना विषय़क याचिकेवर सुनावणी घेण्यास दिला नकार प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेण्यास दिला नकार
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (२ फेब्रुवारी, २०२६) २०२७ च्या सार्वत्रिक जनगणनेत नागरिकांच्या जातीच्या माहितीची नोंदणी, वर्गीकरण आणि पडताळणी करण्यासाठी अवलंबल्या जाणाऱ्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त यांच्या कार्यालयाला या मुद्द्यावर जनहित याचिकाकर्ते, शिक्षणतज्ञ आकाश …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, कर्नाटक, तामीळनाडू वादप्रकरणी केंद्राने लवाद नेमावा पेन्नैयार नदी पाणी वाटपावरून न्यायालयाचे आदेश
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केंद्र सरकारला आंतरराज्यीय पेन्नैयार/दक्षिणा पिनाकिनी नदीच्या पाण्यावाटपावरून तामिळनाडू आणि कर्नाटक यांच्यातील वाद मिटवण्यासाठी न्यायाधिकरण स्थापन करण्याची अधिसूचना जारी करण्याचे आदेश दिले [तामिळनाडू राज्य विरुद्ध कर्नाटक राज्य आणि इतर]. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि एन.व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने असेही म्हटले आहे की, ही पावले एका महिन्याच्या आत …
Read More »मुख्यमंत्री ममता बँनर्जी, नावे डिलीट झालेले मतदारांनी निवडणूक आयोगात धडक मुख्य निवडणूक आयुक्तांची घेतली भेट
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी राज्यात सुरू असलेल्या विशेष सघन पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेच्या संदर्भात दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची भेट घेतली, तर तृणमूल काँग्रेसचे नेते आणि पीडित कुटुंबांनी काळे कपडे घालून प्रतिकात्मक निषेध नोंदवला. तृणमूलच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, बैठकीसाठी १५ सदस्यीय शिष्टमंडळ भारताच्या निवडणूक आयोगाच्या (ECI) मुख्यालयात गेले …
Read More »चीनच्या घुसखोरीचा मुद्या राहुल गांधी यांनी उपस्थित करताच संसद दिवसभरासाठी बंद माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकातील संदर्भ दिला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकातील काही उतारे वाचण्याचा प्रयत्न करून खळबळ उडवून दिली. त्यामुळे राहुल गांधी यांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि अखेरीस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अडवले. राहुल गांधी …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला मिळणार सुमारे १ लाख कोटी विकसित भारताकडे दमदार पाऊल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकसित भारताकडे दमदार वाटचाल करणारा आहे. केंद्रीय करातून महाराष्ट्राला मिळणारा वाटा हा ९८,३०६ कोटी रुपये इतका असणार आहे. याशिवाय अर्थसंकल्पाचे प्राथमिक आकलन करता, १२,३५५ कोटी विविध प्रकल्पांसाठी आहेत. त्यामुळे सुमारे १ लाख कोटी महाराष्ट्राला मिळतील, असा विश्वास …
Read More »दत्तात्रय भरणे यांची माहिती, अर्थसंकल्पात कृषी एआयला केंद्रस्थान; अजितदादांचे स्वप्नं होणार पुर्ण शेती व संलग्न क्षेत्रांसाठी भरीव तरतुदी; शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीला चालना
आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या २०२६-२७ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात शेती आणि शेतकरी हे केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहेत. केंद्र सरकारतर्फे मांडण्यात आलेला हा अर्थसंकल्प शेती व शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवणारा ठरेल, असा विश्वास वाटतो. कृषी बजेट वाढवून सुमारे १.५ लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे संकेत देण्यात आले असून …
Read More »
Marathi e-Batmya