Breaking News

दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचे मंत्री व आमदार सायकलवरून विधानभवनात प्रदेश काँग्रेसची माहिती

मुंबईः प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती निचांकी पातळीवर असताना देशात मात्र इंधनाचे दर उच्चांकी पातळीवर आहेत. केंद्र सरकारने लावलेल्या अन्यायकारक करांमुळे इंधनाचे दर गगनाला भिडले असून महागाई प्रचंड वाढली आहे. याचा निषेध म्हणून अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोमवारी १ मार्च रोजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेस पक्षाचे मंत्री …

Read More »

भाजपाच्या वाघीणीमुळे पूजा चव्हाणप्रकरणी अखेर वनमंत्री राठोड यांचा राजीनामा निष्पक्ष चौकशीसाठी राजीनामा दिल्याची संजय राठोज यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी बीडच्या पूजा चव्हाण या तरूणीने केलेल्या आत्महत्याप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सुपुर्द केला. चव्हाण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी याकरीता आपण राजीनामा दिल्याचे स्पष्टीकरण राठोड यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले. यावेळी त्यांच्यासोबत सांसदीय कार्यमंत्री अनिल परब, शिवसेनेचे सचिव अनिल देसाई …

Read More »

केंद्रातील भाजपा सरकारला फडणवीसांनी दिला घरचा आहेर लॉकडाऊनमुळे लोकांचे कामधंदे बंद झाल्याची कबुली

मुंबईः विशेष प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊनमध्ये अनेक नागरीकांचे काम-धंदे रोजगार गेले आहेत. त्यामुळे त्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत असल्याची स्पष्ट कबुली राज्यातील भाजपाचे नेते विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य जनतेला आर्थिक फटका बसत असल्याचे किंवा अनेकांचे रोजगार गेल्याने नागरीकांसाठी कोणत्याही पध्दतीचे पॅकेज देण्यास एकाबाजूला …

Read More »

भिलारगावच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात एक पुस्तकाचे गाव मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मराठी भाषा विभागाचे विविध पुरस्कार प्रदान

मुंबई : प्रतिनिधी मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर व्हावा. मराठी भाषेचा जागर व्हावा यासाठी पुस्तकाचं गाव उपक्रम सुरू केला आहे. त्यामध्ये राज्यात एकच पुस्तकाचं गाव का असावे? असे नमूद करून तळा गाळातील मराठी भाषा, तिच्या वैशिष्ट्यांसह सर्वांपर्यंत पोहचावी यासाठी प्रयत्न करतो. मग मराठी भाषेचा विकास तिथपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न केले जातील. त्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात …

Read More »

कोरोना : नागपूर- मुंबईत थोडासा फरक तर मृतकांची संख्या ५२ हजाराच्या पार ८ हजार ६२३ नवे बाधित, ३ हजार ६४८ बरे झाले तर ५१ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी मागील सलग चार दिवसांपासून राज्यात बाधित रूग्ण आढळून येण्याचे प्रमाण सतत ८ हजाराहून अधिक संख्येने कायम राहिले आहे. तर मुंबईतील कोरोना बाधित आढळून येण्याचे प्रमाणही सातत्याने वाढत आहे. दिवसभरात आज ९८७ बाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर मुंबईसह ठाणे मंडळातील १२ महानगरपालिका, नगरपालिकांमध्ये सर्वाधिक १८२३ बाधित रूग्ण …

Read More »

“त्या” नापास झालेल्या विद्यार्थ्यांची जबाबदारी महाविद्यालयाने घेतली तांत्रिक कारणामुळे नापास झालेल्यांची सर्व माहिती पाठविणार असल्याचा खुलासा

मुंबई: प्रतिनिधी ऑनलाईन परिक्षा देवूनही काही तांत्रिक कारणामुळे गैरहजर असल्याची नोंद गुणपत्रिकेवर नापास ठरलेल्या त्या ३४ विद्यार्थ्यांची जबाबदारी महाविद्यालयाने स्विकारली आहे. यासंदर्भात लवकरच तक्रारदार विद्यार्थ्यांची सर्व माहिती मुंबई विद्यापीठाला कळविण्यात येणार असल्याचे सिध्दार्थ महाविद्यालयाचे अॅड.पंकज मेढे यांनी मराठी ई-बातम्या.कॉम संकेतस्थळाच्या प्रतिनिधीला फोनवरून दिली. मुंबई विद्यापीठाकडून एलएलबीच्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन परिक्षा घेण्यात …

Read More »

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर बनल्या शासनाच्या समन्वयक उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली नेमणूक

मुंबई: प्रतिनिधी रूपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटविल्यानंतर आता राजकारणात आपले अस्तित्व निर्माण करत असलेल्या शिवसेनेच्या संभावित आमदार तथा चित्रपट अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांची वर्णी आता शासनाच्या एका समितीवर समन्वयक म्हणून नुकतीच करण्यात आली. तसेच यासंबधीचे आदेशही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विभागाच्या मार्फत काढले असून त्याची माहितीही …

Read More »

वर्षात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषा गौरव दिनानिमित्त - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी मराठी भाषेला लाभलेले सांस्कृतिक वैभवाचे संवर्धन करण्याची आपली जबाबदारी असून  पुढच्या मराठी भाषा गौरव दिनापर्यंत (वर्षभरात) मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन आणि मराठी भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दूरदृश्य …

Read More »

कदरू आघाडी सरकारचा गोरगरीबांच्या विरोधातील खरा चेहरा पुन्हा एकदा उघड भाजपा आमदार अतुल भातखळकर यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी फुले-शाहू-आंबेडकर यांच्या नावाने राजकारण करणाऱ्या आणि राज्यातील अनुसूचित जाती, भटक्या जाती व विमुक्त जमातीतील लोकांच्या उद्धाराचे आश्वासन देऊन निर्माण झालेल्या महाविकास आघाडी सरकारने राज्यातील अनुसूचित जाती, भटक्या जाती व विमुक्त जमातीतील दारिद्य रेषेखालील सुमारे अडीच लाख विद्यार्थिनींचा उपस्थिती भत्ता बंद केला आहे, दिवसाला केवळ १ रुपया दिला जाणारा …

Read More »

आदिवासी विभागाच्या वसतीगृहात व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याना प्रवेश आदीवासी मंत्री ॲड. के.सी. पाडवी यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या ८ वी ते १२ वी तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना कोरोना संसर्गाबाबत परिस्थिती पाहून आदिवासी विकास विभागाच्या वसतीगृहांमध्ये प्रवेश देण्यास मंजुरी देण्यात आली असल्याचे आदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी. पाडवी यांनी सांगितले. कोवीड 19 विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनामार्फत टप्प्याटप्प्याने शाळा तसेच …

Read More »