Breaking News

अटक केली पाकिस्तानी नागरिक म्हणून निघाला दहशतवाद्यांचा मार्गदर्शक लष्करा नियंत्रण रेषेवर केली अटक

जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ आणि राजौरी या सीमावर्ती जिल्ह्यांजवळील नियंत्रण रेषेवर (एलओसी) भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करताना अटक करण्यात आलेला एक पाकिस्तानी नागरिक हा दहशतवादी मार्गदर्शक आहे, असे अधिकाऱ्यांनी सोमवारी (३० जून २०२५) सांगितले. मोहम्मद आरिफ हा जैश-ए-मोहम्मद (जेईएम) च्या चार दहशतवाद्यांच्या गटाचे नेतृत्व करत होता, तेव्हा रविवारी (२९ जून) …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा इशारा, भाजपा सरकारने पुन्हा सक्तीचे उद्योग करू नये लढा फक्त एका जीआरपुरता नव्हे तर मराठीच्या मान-सन्मानचा ; महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळू नका महागात पडेल...

राज्यातील महाराष्ट्रद्रोही मराठी विरोधी सरकारला अखेर इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचा निर्णय मागे घ्यावा लागला. याविरोधात उभा महाराष्ट्र पेटून उठला होता. मराठी माणूस एकवटल्याने सरकारला माघार घ्यावी लागली. महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान व ओळख मराठी आहे आणि मराठीच राहील. कोणत्याही परिस्थितीत मराठीचा आवाज दाबता येत नाही आणि येणारही नाही, असा इशारा मुंबई काँग्रेस …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, आरएसएसचा अजेंडा राबविण्यासाठीची हिंदीबाबत जनमत चाचणी मुख्यमंत्र्यांचे ‘एकला चलो रे’ दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना हिंदी सक्तीची माहितीच नव्हती

हिंदी-हिंदू-हिंदूराष्ट्र हा राष्ट्रीयस्वयंसेवक संघाचा अजेंडा राबविण्यासाठी महाराष्ट्रातील महायुती सरकार कार्यरत आहे. पहिल्यापासून हिंदी भाषेची सक्ती या अजेंडयाचाच भाग आहे. सरकारने हिंदी सक्तीचा शासनआदेश काढून याबाबत जनमत काय आहे हे तपासून पाहिले. महाराष्ट्र या विरोधात ठामपणे उभा राहिला म्हणून त्यांनी हा निर्णय मागे घेतला आहे. अधिवेशनाच्या तोंडावर या माध्यमातून सरकारचा नाकर्तेपणा …

Read More »

अंदाज समितीनंतर आता विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातून अशोक चक्र राजमुद्रा गायब अधिवेशनाच्या प्रवेश आणि गॅलरी पासवरून अशोक चक्राची राजमुद्रा गायब

मागील अनेक वर्षापासून भारतीय लोकशाहीतील कामकाजाचे राष्ट्रचिन्ह म्हणून अशोक चक्रधारीत राजमुद्रेचा वापर करण्यात येत आहे. इतकेच केंद्र सरकारबरोबरच आरबीआय बँकेकडून छपाई करण्यात येणाऱ्या नोटेच्या चलनावरही अशोक चक्र आधारीत राजमुद्रेचा वापर करण्यात येतो. मात्र काही दिवसांपूर्वी अर्थात २५ जून रोजी आयोजित दोन दिवसीय अंदाज समितीच्या रौप्य महोत्सवी वर्ष महाराष्ट्राच्या विधिमंडळात साजरा …

Read More »

राज ठाकरे यांची स्पष्टोक्ती, हिंदी नाही हे नक्की, ५ जुलैच्या विजयी मेळाव्याचा तपशील लवकरच तमाम मराठी जणांचे अभिनंदन, मेळाव्यात कोणाचा झेंडा नसेल

राज्य सरकारने पहिलीपासून तीन भाषा शिकवण्यासंदर्भात शासन निर्णय जारी केला. तसेच शालेय विद्यार्थ्यांना हिंदी भाषेची प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या सक्ती करण्यात आली. राज्य सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत राज्य सरकारच्या विरोधात ५ जुलै रोजी जाहिर मोर्चा काढण्याची घोषणा केली. मात्र आगामी …

Read More »

जयंत पाटील यांचा आरोप, राज्यावरील आर्थिक बोजा वाढला, आर्थिक संतुलन ढासळलं पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्यांवरून सरकारला धरले धारेवर

राज्याचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले. आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी ५७ हजार ५०९ कोटीच्या पुरवणी मागण्या मांडल्या आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी सरकारला पहिल्या दिवशी धारेवर धरले आहे. राज्यावरील आर्थिक बोजा वाढला आहे, सरकारचे आर्थिक संतुलन ढासळलं आहे त्यामुळे राज्यातील गरिबांवर, …

Read More »

प्रताप सरनाईक यांची घोषणा, आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये मिळणार सूट एसटी प्रवाशांसाठी योजना १ जुलै पासून सुरू

एसटीच्या लांब व मध्यम पल्ल्याच्या (१५० कि.मी.पेक्षा जास्त) प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या पुर्ण तिकीट धारी (सवलतधारक प्रवासी वगळून)  प्रवाशांना तिकीट दरात १५ टक्के सवलत दिली जाणार आहे. ही योजना दिवाळी व उन्हाळी सुट्टीचा गर्दीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू राहणार आहे. या योजनेची सुरुवात १ जुलैपासून करण्यात येत आहे. तरी प्रवाशांनी …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा महायुती सरकारला पुन्हा इशारा, शिक्षणाचा विषय आहे अशी थट्टा करू नका याप्रश्नी आता अर्थतज्ञांच्या अध्यक्षतेखाली नविन समिती

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवार आजपासून सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळ कामकाजात सहभाग नोंदविला. पहिल्या दिवसाचे कामकाजा पहिल्या तास भरातच संपल्यानंतर विधिमंडळाच्या आवारात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या मुद्यावरून राज्य सरकारवर टिकेची झोड उठवली. उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले की, राज्य …

Read More »

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजित पवार यांनी सादर केल्या ५७ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या कुंभमेळा, रस्ते, मेट्रो, सिंचनासारख्या पायाभूत प्रकल्पांची निर्मिती, मागास घटक विकासासाठी मागण्या सादर

विधिमंडळाच्या जून २०२५ च्या पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी आज ५७ हजार ५०९ कोटी ७१ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधीमंडळात सादर केल्या.  हा निधी प्रामुख्याने राज्यात रस्ते, मेट्रो, सिंचन योजनांसारख्या पायाभूत प्रकल्पांसाठी, सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन व अंमलबजावणी, महात्मा ज्योतीराव फुले आरोग्य योजना, संजय गांधी …

Read More »

आता रेल्वेची बुकिंग क्षमता पाच पटीने वाढणार ३२००० हजारावरून १,५०,००० तिकट बुकींग एकाचवेळी होणार

भारतीय रेल्वे त्यांच्या प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS) मध्ये सुधारणा करत आहे ज्यामुळे तिकीट बुकिंग क्षमता पाच पटीने वाढेल आणि तिकिटांशी संबंधित चौकशी सुलभतेने हाताळता येईल. डिसेंबर २०२५ मध्ये सुरू होणाऱ्या अपग्रेड केलेल्या प्रणाली अंतर्गत, रेल्वे सध्याच्या प्रणालीमध्ये ३२,००० बुकिंगवरून प्रति मिनिट १५०,००० तिकीट बुकिंग प्रक्रिया करू शकेल. त्याचप्रमाणे, नवीन पीआरएस …

Read More »