मुंबई

राज्य सरकारच्या अन्न विश्लेषण प्रयोगशाळा विभागात नोकरीच्या संधी ५६ पदांसाठीची जाहिरात प्रसिद्ध-मंत्री धर्मरावबाब आत्राम यांची माहिती

अन्न व औषध विभागामार्फत ५६ पदांची भरती प्रक्रिया (टिसीएस) टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमार्फत राबविण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात येणार असून कोणीही दलाल व मध्यस्थांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले आहे. धर्मरावबाबा आत्राम पुढे बोलताना म्हणाले की, अन्न विश्लेषण प्रयोगशाळा …

Read More »

बौद्ध भंतेजींसाठी वर्षा निवासस्थानी चिवरदान, धम्मदान व भोजनदान सोहळा जगाला युद्ध नको बुद्ध हवाय- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

जगात आज अनेक ठिकाणी संघर्ष आणि युद्धाची परिस्थिती असताना जगाला युद्ध नको बुद्ध हवाय, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षावर आज रविवारी वर्षावास या पवित्र महिन्यानिमित्त भंतेजींसाठी चिवरदान, धम्मदान व भोजनदान सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे पुढे बोलताना म्हणाले …

Read More »

मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रस्तावित नवीन संकुलाच्या कोनशिलेचे सरन्यायाधीशांकडून अनावरण सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री शिंदे याच्या उपस्थित पार पडणार

मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन संकुल हे वांद्रे पूर्व, मुंबई येथे बांधण्यात येणार असून सोमवार, २३ सप्टेंबर २०२४ रोजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती डॉ.धनंजय वाय चंद्रचूड यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रस्तावित जागेवर बसविण्यात आलेल्या कोनशिलेचे अनावरण केले जाणार आहे. कोनशिला अनावरण सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती …

Read More »

मंगलप्रभात लोढा यांचा इशारा, धारावीमध्ये कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई सीसीटीव्ही फुटेज बघुन कारवाई करणार

आज मुंबई महापालिकेद्वारे सायन धारावी परिसरातील एका प्रार्थनास्थळाचा अनधिकृत भाग तोडण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली होती. सकाळी महापालिकेच्या जी नॉर्थ प्रभागाचे अधिकारी या रस्त्यावर पोहोचले. यावेळी काही कट्टरपंथीयांनी प्रशासनाच्या कामात अडथळा आणण्यास सुरुवात केली. पोलीस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर दगडफेक सुद्धा करण्यात आली. यामध्ये महापालिकेच्या बसेसचे नुकसान देखील झाले. सदर तणावपूर्ण …

Read More »

धारावीत मस्जिदीचे वाढीव बांधकाम पाडण्यावरून तणाव परंतु मस्जिदीच्या ट्रस्टींनी स्वतः वाढीव बांधकाम पाडण्याचे आश्वासन दिल्यानंतर शांतता

मागील काही वर्षांमध्ये धारावीतील मुंबई महापालिकेच्या मालकीच्या जमिनीवर अनेक ठिकाणी बांधकामे करण्यात आलेली आहे. इतकेच नव्हे तर पाण्याच्या पाईपलाईन करणाऱ्या जागेवरही येथील अनेकांनी अनधिकृतपणे घरे बांधली. त्याबाबत तेथील काही स्थानिक कार्यकर्त्यांनी मुंबई महापालिकेकडे तक्रारी दाखल केल्या, इतकेच काय एमआरटीपी कायद्याखाली पोलिसात तक्रार देण्यासाठी पुढाकारही घेतला. मात्र मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धारावीतील …

Read More »

जुहू किनाऱ्यावर राज्यपाल राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री शिंदे यांची स्वच्छता मोहीम आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिनानिमित्त जुहू किनाऱ्यावर स्वच्छता अभियान

प्रत्येक मोठ्या कार्याची सुरुवात लहान लहान बाबींनी होत असते. सागरी किनारा स्वच्छतेसाठी आज जनजागृतीचा दिवस असून किनारा स्वच्छतेची ही सुरुवात मोठे रूप धारण करून ‘स्वच्छ भारत, महान भारत’ संकल्पनेला आकार देईल, असे प्रतिपादन राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी केले. तर, समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. …

Read More »

विधानसभा निवडणुकीसाठी बृहन्मुंबई क्षेत्रात १० हजार १११ मतदान केंद्रे प्रत्येक केंद्रावर सरासरी १२०० मतदार

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-२०२४ च्या पार्श्वभूमीवर, भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे, या दृष्ट‍िकोनातून बृहन्मुंबई क्षेत्रातील (मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हे) मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. या सुसूत्रीकरण कार्यक्रमामुळे बृहन्मुंबई क्षेत्रातील मतदान केंद्रांची संख्या १० हजार १११ झाली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या तुलनेत मतदान …

Read More »

मुंबईतील मेट्रो-३ चे उद्घाटन, पंतप्रधान मोदी येणार मेट्रोच्या उद्घाटनानंतर विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता

मुंबईतील आतुरतेने वाट पाहण्यात येत असलेल्या भूमिगत मेट्रो ३ चे कॉरिडॉर बीकेसी BKC आणि आरे दरम्यानच्या आंशिक मार्गाचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती पुढे येत आहे. या मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑक्टोंबर महिन्याच्या सुरुवातीलाच करण्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून त्यानंतर विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता राज्यात लागू होईल …

Read More »

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत प्रवेश केला

काही दिवसांपूर्वी आगामी विधानसभा निवडणूकीत उभा राहणार असल्याची घोषणा माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी केली होती. तसेच त्यासाठी एखादा राजकिय पक्ष स्थापन करण्याची तयारी सुरु असल्याचे सांगितले. मात्र आज मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मुंबईच्या काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. संजय …

Read More »

‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते राज्यस्तरीय शुभारंभ सफाई कर्मचारी हा मुंबईचा खरा हिरो

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरू करून एक चळवळ उभी केली. त्याचे फलित म्हणजे आज देशभरात हे अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. स्वच्छता हा आरोग्याचा मंत्र असून मुंबईमध्ये ‘डीप क्लिन ड्राईव्ह’च्या माध्यमातून रस्ते साफ करणे, रस्ते झाडणे, पाण्याने रस्ते धुणे हे काम सुरू आहे. यामुळे …

Read More »