Breaking News

राजकारण

अजित पवार यांची वाचाळवीरांना तंबी, योजनेसाठी महायुतीलाच मतदान करा सुखासमाधानाचे दिवस आणण्यासाठी हात आखडता घेणार नाही- मुख्यमंत्री शिंदे

राज्यातील शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि भाजपाचे खासदार अनिल बोंडे यांच्या राहुल गांधी यांच्याबाबतच्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून आज काँग्रेस पक्षाकडून सत्तातारी भाजपा आणि महायुतीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचा धागा पकडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीतील वाचाळवीरांना थेट तंबी दिली. तसेच आवाहन केले की, हा महाराष्ट्र फुले शाहु आंबेडकरांचा …

Read More »

राहुल गांधींना धमक्या देणाऱ्या तालिबानीवृत्तीच्या विरोधात काँग्रेसचे राज्यभर आंदोलन वाचाळवीरांना भाजपा युतीने लगाम घालावा

विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांना जीवघेण्या धमक्या देणाऱ्या सताधारी भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या बेताल नेत्यांविरोधात काँग्रेसने राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन केले. खासदार राहुल गांधी यांना धमक्या देणाऱ्यांना भाजपा-शिवसेनेने आवर घालावा व त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. मीरा भाईंदर येथे प्रभारी रमेश चेन्नीथला व प्रदेशाध्यक्ष …

Read More »

जयंत पाटील याची टीका, डॉ. आंबेडकर यांनी घालून दिलेली लोकशाही चौकट समूळ नष्ट… वन नेशन वन इलेक्शन म्हणजे भारतात अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणण्याचा डाव

आपल्या देशात संघराज्य पद्धत आहे मात्र देशात वन नेशन वन इलेक्शन आणून अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणणे हा भाजपाचा डाव आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेली लोकशाही चौकट समूळ नष्ट करण्याचे पहिले पाऊल आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. काल केंद्रीय मंत्रिमंडळाने …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती, सेमी कंडक्टर उद्योगात ४०० जणांना रोजगार आरआरपी कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक्स सेमिकंडक्टर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

एक मराठी माणूस इलेक्ट्रॉनिक्स सेमिकंडक्टर प्रकल्प OSAT (Outsourced Semiconductor Assembly and Testing) उभा करण्याची क्रांती करतो, याचा मला अभिमान आहे. हे शासन उद्योगांना सर्वोतोपरी मदत करीत आहे आणि यापुढेही करीत राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महापे एमआयडीसी येथे केले. ठाणे जिल्हातील महापे एमआयडीसी येथे मे.आर.आर.पी कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक्स …

Read More »

राहुल गांधी यांच्यानंतर पंतप्रधान मोदी यांचे आश्वासन, जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा श्रीनगर येथील प्रचारसभेत पंतप्रधान मोदी यांची ग्वाही

श्रीनगरमध्ये एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना जम्मू आणि काश्मीरचा राज्याचा दर्जा बहाल करण्याच्या सरकारच्या वचनाचा पुनरुच्चार करत लोकांना आश्वासन दिले की भाजपा ही वचनबद्धता पूर्ण करेल. जम्मू-काश्मीरला दहशतवादमुक्त करण्याच्या भाजपाच्या वचनबद्धतेवर भर देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील बंपर मतदानाने दगडफेक आणि दहशतवादाबद्दल सहानुभूती …

Read More »

रमेश चेन्नीथला यांची टिका,… घाबरलेल्या भाजपाकडून राहुल गांधींना धमक्या राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी, ‘ईंट का जवाब पत्थर से देंगे’: नाना पटोले.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सत्ताधारी पक्षाचा खासदार, एक आमदार व एका केंद्रीय मंत्र्यांने दिलेल्या धमक्या धमक्या गंभीरपणे घेतल्या पाहिजेत. राहुल गांधी यांचा देश-विदेशात नावलौकिक व विश्वासार्हता प्रचंड वाढली आहे. नरेंद्र मोदी व आरएसएस विरोधात लढणारे देशातील ते एकमेव नेते असून राहुल गांधी भाजपासमोर मोठे आव्हान बनले आहेत त्यामुळेच …

Read More »

जे पी नड्डा यांची टीका म्हणे, राहुल गांधी अयशस्वी ठरलेले उत्पादन मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहित केली काँग्रेसवर टिका

काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी हे अमेरिका दौऱ्यावर गेले होते. तेथील एका विद्यापीठात घेण्यात आलेल्या मुलाखती दरम्यान देशाच्या मालमत्तेत कोणत्या जात समूहाची भागीदारी किती या मुद्याचे विश्लेषण करताना आरक्षणाच्या मुद्यावर भाष्य केले. मात्र राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा विपर्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी करत राहुल गांधी यांच्यावर टीका केली. …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, एक राष्ट्र एक निवडणूक भारताला हुकूमशाही… निवडणूकीबाबत डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या वक्तव्याचा दिला दाखला

देशात एक देश एक निवडणूक प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजूरी दिली. केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या या प्रस्तावावरून सर्वच प्रमुख विरोधी पक्षांकडून टीकेची झोड उठविण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान सभेतील भाषणाचा संदर्भ देत भाजपाने हुकूमशाहीच्या दृष्टीने टाकलेल्या अनेक पायऱ्यांपैकी …

Read More »

राज ठाकरे यांचा खोचक टोला, निवडणूकाचं महत्व इतकंच वाटतय तर… निवडणूकांवरून लगावली सणसणीत चपराक

भाजपाच्या अंजेड्यावरील असलेल्या वन नेशन वन इलेक्शन या बहुचर्चित प्रस्तावाला आज केंद्रातील एनडीए सरकारने मंजूरी दिली. तसेच आगामी हिवाळी अधिवेनात हा प्रस्ताव मांडून त्यास संसदेची मंजूरी घेण्याची रणनीती केंद्र सरकारने ठरविली आहे. यापार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपले परखड मत व्यक्त करत निवडणूकाचं महत्वच इतकंच वाटत असेल तर आधी …

Read More »

जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभेच्या २४ जागांसाठी ५८ टक्के मतदान निवडणूक आयोगाने दिली माहिती

जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी बुधवारी ९० पैकी २४ विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान सुरू असल्याने सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५८.१९ टक्के मतदान झाले. २३ लाखांहून अधिक मतदार ९० अपक्षांसह २१९ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले …

Read More »