राजकारण

मुकुल वासनिक यांची टीका, ज्ञानेशकुमार हे मोदींचे प्यादे, माजी पंतप्रधानांवर केस चालते पण निवडणूक आयुक्तांवर नाही लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी देशात परिवर्तनाची गरज, परिवर्तनाची सुरुवात महाराष्ट्रातून होईल: डॉ. सिरिवेल्ला प्रसाद

देशाची लोकशाही व संविधान संपवण्याची प्रक्रिया मागील काही वर्षापासून सुरु आहे. स्वायत्त संस्थांचे स्वातंत्र्य संपुष्टात आणले आहे, निवडणूक आयोगाला भाजपाचे एजंट बनवले आहे, देशात चोरांचे राज्य आहे. मतचोरी, सीटचोरी, आमदार खासदारांची चोरी, देशाची संपत्ती चोरी, तरुणांच्या नोकऱ्यांची चोरी, विद्यार्थ्यांच्या परीक्षा चोरी केल्या जात आहेत. जे देशात होत आहे तेच महाराष्ट्रातही …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय, विनाआधार दस्तनोंदणी अशक्य दस्तनोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता, फसवणूक टळणार

कोणत्याही दस्त नोंदणीसाठी आता आधार ओळखपत्र महसूल विभागाने अनिवार्य करण्यात आले आहे. आधार नसेल तर दस्तनोंदणी होणारच नाही, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. मालमत्ता खरेदी विक्रीतील फसवणूक टाळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून हा निर्णय घेण्यात आल्याचे महसूलमंत्री बावनकुळे यांनी सांगितले. यासंदर्भातील राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले असून, एक …

Read More »

गरजू बालकांच्या संगोपनासाठी दरमहा २,२५० रुपयांचे आर्थिक सहाय्य क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेत ० ते १८ वर्षे वयोगटातील पात्र बालकांना लाभ

अनाथ, बेघर, एकल पालक असलेली तसेच गंभीर परिस्थितीत सापडलेली ० ते १८ वर्षे वयोगटातील पात्र बालके व त्यांच्या संगोपनकर्त्यांना महिला व बालविकास विभागाअंतर्गत ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजने’च्या माध्यमातून दरमहा २,२५० रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते. पात्र बालकांच्या पालनपोषणासाठी ही रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (डीबीटी) लाभार्थी किंवा संगोपनकर्त्याच्या बँक खात्यात …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची आशा, तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल स्टार्टअपची संख्या आणि क्रियान्वयनमध्ये महाराष्ट्र देशाची राजधान

वित्त, उद्योग, उद्योजकता आणि तंत्रज्ञान क्षेत्रात देशाला नेतृत्व देणारा महाराष्ट्र आता स्टार्टअपची संख्या आणि  त्याच्या क्रियान्वयन  या दोन्ही बाबतींत भारताची स्टार्टअप राजधानी ठरला आहे. हे सामर्थ्य आणि तरुणांचे  संशोधन महाराष्ट्राला नक्कीच भविष्यात  जगाचे इनोवेशन हब बनवेल,  असा आशावाद  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. एनसीपीए येथील जमशेद भाभा सभागृहात गेट्स …

Read More »

गुलाबराव पाटील यांचे आदेश, पाणीटंचाई निवारणासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करा टँकर हा अंतिम पर्याय; जलस्रोत बळकटीकरण, नाला खोलीकरण, 75 टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण योजना तातडीने कार्यान्वित करा

संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन, जलस्रोतांचे बळकटीकरण, नाला खोलीकरण व जलसंधारणाची कामे वेगाने पूर्ण करणे, 75 टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करणे आणि टँकरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यावर भर द्यावा. तसेच सर्व जिल्ह्यांचे टंचाई आराखडे 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करून अनधिकृत पाणी उपसा …

Read More »

सचिन सावंत यांचा आरोप, अँटिलिया प्रकरणी NIA तोंडावर आपटली, NIA ने लावलेल्या UAPA च्या वैधतेवर न्यायालयाकडून प्रश्नचिन्ह अँटिलियाचे काही आरोपी समोर येऊ नये यासाठीच भाजपाकडून कुभांड रचले,

अँटिलिया बॉम्ब प्रकरणी न्यायालयाने UAPA लावण्याच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने NIA च्या तपासावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणाचा तपास ATS कडे सोपवला होता, ते आरोपी ताब्यात घेणार हे पाहताच मोदी सरकारच्या आदेशानुसार NIA ने हे प्रकरण हाती घेतले. या प्रकरणाचा दहशतवादाशी संबंध जोडून आपला हेतू साध्य करण्याचा डाव होता …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे घेण्यात आले महत्वाचे निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पडली पार

आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाचा आकृतीबंध मंजूर, सूर्या प्रकल्पग्रस्तांना ५६ वर्षानंतर मिळणार न्याय, नागपूर-म्हाडाला परवडणाऱ्या घरांसाठी मौजे बेला येथील शासकीय जमीन, वांद्रे येथील नॅशनल सोसायटी फॉर क्लिन सिटीजच्या जमीन भाडेपट्टयाच्या नुतनीकरणास मान्यता, कोल्हापूर सर्किट बेंचकरिता ४५९ पदांच्या निर्मितीस मान्यता, वाळूज येथे दिवाणी न्यायालय, १६ पदांच्या …

Read More »

महाराष्ट्र कारागृहे सुधारसेवा अधिनियम, २०२५ मध्ये सुधारणा प्रत्येक कारागृहात आता अभ्यागत मंडळ होणार

महाराष्ट्र कारागृहे सुधारसेवा अधिनियम-२०२५ मध्ये सुधारणा करून प्रत्येक कारागृहात अभ्यागत मंडळ (Board of Visitors) ची निर्मिती करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठीकत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येक कारागृहात अभ्यागत मंडळाची स्थापना करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या अभ्यागत मंडळाची स्थापना करण्यात येणार आहे. जिल्ह्याचे …

Read More »

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र वैरण विकास धोरण जाहीर दुग्धव्यवसाय, पशुपालन व्यवसायाला उद्योगाचे स्वरूप, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

दुग्धव्यवसाय आणि पशुपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र वैरण विकास धोरण लागू करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या धोरणामुळे राज्यातील पशुधनासाठी आवश्यक चाऱ्याची उपलब्धता निश्चित होणार आहे. अशारितीने राज्यात प्रथमच वैरण विकास धोरण लागू करण्यात येत आहे. या धोरणामध्ये जिल्हानिहाय चारा उत्पादन, …

Read More »

नाना पटोले यांची टीका, भाजपा मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला, ज्ञानेश कुमारांना विचारलेल्या प्रश्नांना भाजपचे मंत्री उत्तर का देतात भाजपा व ज्ञानेशकुमारांची अभद्र युती लोकशाही व संविधान संपवणारी, मोदींच्या इशाऱ्यावर ज्ञानेशकुमारांचे काम

निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे पण मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी तो भाजपाच्या दावणीला बांधला आहे. नरेंद्र मोदींच्या इशाऱ्यावर ज्ञानेशकुमार काम करत असून लोकशाही व संविधान संपवण्याचे पाप ते करत आहेत. ज्ञानेशकुमार व भाजपा यांची अभद्र युती आहे म्हणूनच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगातील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर …

Read More »