राजकारण

एसआयआर प्रक्रियेविरोधात ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत रॅली, ठाकरे बंधूंचे आवाहन, विरोधी पक्षांना निमंत्रण

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (यूबीटी) नेते उद्धव ठाकरे (ठाकरे बंधू) यांनी शनिवारी महाराष्ट्रातील जनतेला संयुक्त आवाहन केले. त्यांनी भारतीय निवडणूक आयोगाला लक्ष्य करत ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत एका भव्य जाहीर सभेची घोषणा केली. शिवसेना (यूबीटी) आणि मनसेने निवडणूक आयोगावर मतदारांची फसवणूक केल्याचा आणि …

Read More »

एसआयआरचा एकमेव उद्देश बंगाल काबीज करणे हा होता: ममता बॅनर्जी

कोलकाता : पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी Mamata Banerjee यांनी शनिवारी आरोप केला की, निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरावलोकनामागे (एसआयआर) भाजपला बंगालमध्ये सत्ता काबीज करण्यास सक्षम करणे हाच एकमेव उद्देश होता. हुगळी जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना ममता म्हणाल्या की, एसआयआरच्या अगदी सुरुवातीपासूनच त्या सांगत आल्या …

Read More »

सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून आपले वेद वदवतायंत- राज ठाकरे

ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवले होते. आता सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून आपले वेद (?) वदवतायंत. असो, गेले २ दिवस ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) हे गप्प झालेत आणि त्यांना बोलतं करणारे पण कुठेच दिसत नाहीयेत. ज्ञानेश कुमार यांच्यासारख्याना हाताशी धरून आपण कसे सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलोत हे भारतीय जनता पक्ष सांगत होतं …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, राज्यात ४७ नवीन अपर तहसीलदार, चार अपर जिल्हाधिकारी कार्यालये ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना महसुली सेवा अधिक सुलभतेने मिळणार

राज्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना महसुली सेवा अधिक सुलभ, गतिमान आणि त्यांच्या परिसरातच उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात ४७ नवीन अपर तहसीलदार कार्यालये आणि चार नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार स्थापन होत असलेल्या या नवीन कार्यालयांमुळे सामान्य जनतेचा वेळ आणि …

Read More »

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पीक परिस्थितीची पाहणी शेतकऱ्यांना भरपाई देण्याच्या घोषणेचा केला पुनरुच्चार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाशिम जिल्ह्यातील म्हसला (ता. कारंजा) मोहगव्हाण (ता. मंगरुळपीर) आणि जऊळका (ता. मालेगाव) येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळसदृष्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पीक व पाणी परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांना भरपाई देण्याच्या घोषणेचा पुनरुच्चार करून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल अशी ग्वाही दिली. दुष्काळसदृष्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम विदर्भातील म्हणजे अमरावती विभागातील …

Read More »

उदय भानू चिब यांची मागणी, IIT मुंबईचा विद्यार्थी साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्रा. सुर्यनारायण दुल्लांना तत्काळ अटक करा राहुल गांधी यांचा साहिलच्या पालकांशी फोनवरून संवाद, काँग्रेस साहिलच्या कुटुंबियांसोबत, साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा सुरुच राहिल.

आयआयटी IIT मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे याला संस्थेतील प्राध्यापकांनी जातीवाचक व मानसिक छळ केल्यामुळेच आत्महत्या करावी लागली. साहिलवर बिनबुडाचे आरोप करण्यात आले, यातूनच साहिलला टोकाचे पाऊल उचलावे लागले. साहिलच्या आत्महत्येस प्रा. सत्यनारायण दुल्ला हेच जबाबदार असून त्यांना तात्काळ अटक करावी व सर्व प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे …

Read More »

राज ठाकरे यांचा सवाल, याला जबाबदार कोण? निवडणूक आयोगाकडून मतचोरी आणि भाजपाला मदत होईल अशा कामकाजावरून केला सवाल

इंडियन एक्स्प्रेस वर्तमानपत्राच्या कालच्या मुख्य पानावरच्या या मथळ्याखालच्या ’14 times in 10 months, two Election Commissioners objected on record to poll panel steps बातमीने देशांत खळबळ उडवून दिली आहे. २०२५ च्या अखेरीस, महापालिका निवडणुकांच्या आधी जेंव्हा महाराष्ट्रातील विरोधी पक्षांचे नेते आम्ही राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना भेटायचो तेंव्हाच …

Read More »

संभाव्य टंचाईग्रस्त गावांसाठी टप्पानिहाय कृती आराखडे तयार करा पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पिण्याचे पाणी तसेच पशुधनासाठी आवश्यक पाणी उपलब्ध करून देण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे. टंचाईग्रस्त गावांसाठी उपलब्ध जलस्रोतांचा प्रभावी वापर, पर्यायी स्रोतांची उपलब्धता आणि आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा याबाबत टप्पानिहाय कृती आराखडे तयार करून आवश्यक प्रशासकीय व तांत्रिक कार्यवाही पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री …

Read More »

पीक परिस्थितीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर पिकांचे सरसकट नुकसान; मदतही सरसकट देणार, लातूर जिल्ह्यातील जाऊ आणि खरोसा येथे पिकांची पाहणी; शेतकऱ्यांशी संवाद, संकटकाळात शेतकऱ्यांना एकटे सोडणार नाही; शासन पूर्ण ताकदीने पाठीशी उभे राहणार

मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत यावर्षी अतिशय कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. लातूर जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजेच केवळ ५० टक्के पाऊस झाला असून, येथील नदी-नाले व विहिरी कोरड्या पडल्या आहेत. पावसाअभावी पिकांचे सरसकट नुकसान झाल्याचे दिसत असून, राज्य शासनही शेतकऱ्यांना सरसकट मदत करेल. या …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल, ७/१२ कोरा करण्याच्या आश्वासनाचे काय झाले? मुख्यमंत्री फडणवीसांनी शेतकऱ्यांनाच सांगावे १९७२ च्या भीषण दुष्काळानंतर काँग्रेस सरकारने ‘मनरेगा’ आणली; फलोद्यान योजना आणली, फूड प्रोसेसिंगमध्ये मोठी क्रांती घडवली, तुम्ही काय केले?

राज्यात कोरड्या दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. १९७२ च्या दुष्काळापेक्षाही गंभीर दुष्काळ असल्याचे चित्र आहे. शेतकरी मोठ्या संकटात आहे, तो सरकारकडे मदतीची आस लावून बसला आहे, पण भाजपाचे फडणवीस सरकार अजून अभ्यास करण्यातच मग्न आहे. शेतकऱ्यांचा संताप लक्षात आल्याने शेवटी मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आहेत पण त्याचा उपयोग काय? …

Read More »