राजकारण

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, मतदार यादीतील हरकती व दावे दाखल करण्यास दोन महिन्यांची मुदतवाढ द्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांना पत्राद्वारे मागणी

राज्यात सध्या सुरु असलेल्या एसआयआर मोहिमेअंतर्गत मतदार यादीमधील नावासंदर्भात दावे व हरकती दाखल करण्यासाठी निवडणूक आयोगाने १२ ऑक्टोबर पर्यंतची मुदत दिलेली आहे, ही मुदत अत्यंत अपुरी आहे. सध्या येत असलेल्या तांत्रीक अडचणी व मोठ्या प्रमाणावरील हरकतींची संख्या पाहता हा वेळ पुरेसा नाही. १२ ऑक्टोबरची मुदत आणखी दोन महिन्यांनी वाढवून द्या, …

Read More »

प्रताप सरनाईक यांची माहिती, २०३७ पर्यंत एसटीची ‘ई-लालपरी’; १०० टक्के इलेक्ट्रिक ताफ्याचे लक्ष्य ५ हजार नवीन डिझेल बसेस ठरणार शेवटच्या

महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाचा ताफा सन २०३७ पर्यंत १०० टक्के इलेक्ट्रिक करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. एसटीच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या सुमारे ५ हजार डिझेल बसेस या शेवटच्या डिझेल बसेस ठरणार असून, त्यानंतर टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक बसेसची संख्या वाढविण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष …

Read More »

शरद पवार यांचा अजित पवार गटाला अल्टीमेटम, आम्ही जाणार नाही, यायच असेल तर आमच्यासोबत या जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर रस्त्यावर उतरून संघर्ष करु

आम्ही अडीच तास एकत्र बसलो आहोत. मला अनेक वेगवेगळ्या मागण्या दुष्काळाचा निमित्ताने ऐकायला मिळाल्या. प्रांताध्यक्ष यांनी सूचना दिल्यानुसार आपण काय निवेदन आंदोलन करताना द्यायच्या आहेत, हे सांगितलं आहे. रविवारी कोअर कमिटी बैठक आम्ही घेतली. राज्य सरकारने काय काय देणे अपेक्षित आहे त्याचे निवेदन दिलं आहे. आम्ही दोन चार दिवसांत सरकारकडे …

Read More »

भ्रष्ट मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार विरोधात काँग्रेस आक्रमक, राज्यभर तीव्र निषेध मोर्चे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार लोकशाहीला लागलेला मोठा कलंक, पदावरून तत्काळ बडतर्फ करून अटक करा

मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या करणारे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयांवर काँग्रेस पक्षाने मोर्चे काढून निषेध व्यक्त केला. अमरावती येथे ज्ञानेशकुमार यांच्या पुतळ्याची गाढवावरून धिंड काढण्यात आली. ठाण्यात ज्ञानेशकुमार यांच्या पुतळ्याला उठाबशा काढायला लावल्या. पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, नागपूरसह …

Read More »

रोहित पवार यांची टीका, भरलेल्या हप्त्याएवढे सुद्धा पैसे परत आले नाहीत पावसाची तूट आणि ७७ हजार कोटींचे नुकसान, शेतकऱ्यांना अद्याप मदत जाहिर नाही

राज्यातील शेतकरी आणि दुष्काळी परिस्थितीवरून आदरणीय शरद पवार साहेब यांनी आमच्यासोबत आणि कार्यकर्त्यांसोबत बैठका घेऊन माहिती घेतली आहे. त्यांनी संपूर्ण राज्यभरात आढावा घेण्याचे निर्देश दिले होते,राज्य सरकारने राज्यात दुष्काळ जाहीर केला असला तरी अद्याप शेतकऱ्यांना कोणतीही मदत जाहीर केलेली नाही मदत किती मिळणार याचा आकडाही दिलेला नाही. त्यामुळे दुष्काळ जाहीर …

Read More »

संजय राऊत यांचा आरोप, तुकाराम मुंढे यांच्या एफडीएकडून खंडणी उखळण्याचे काम आधी १० हजार रूपयांची खंडणी होती तर आता २ लाख रुपयांची खंडणी उकळण्यात येते: पत्र लिहित केला आरोप

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी सोमवारी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) अधिकाऱ्यांवर हॉटेल आणि ‘क्विक-कॉमर्स’ (त्वरित वस्तूंची डिलिव्हरी करणाऱ्या) व्यवसायांना परवाना रद्द करण्याची धमकी देऊन खंडणी उकळत असल्याचा आरोप केला. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढें यांना लिहिलेल्या पत्रात, राज्यसभेच्या या खासदाराने या आरोपांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी …

Read More »

मंत्र्यांचे दुष्काळी दौरे सुरू; पण दुष्काळ निवारणाच्या पैशाचे काय? शेतकऱ्यांच्या हातात मदतीचा पैसा आणणार कुठून? महसुली तूट ४०,५५२ कोटी,

राज्यात दुष्काळाचे संकट गडद होत असताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांचे दुष्काळी दौरे सुरू झाले आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी, पंचनाम्यांचे आदेश आणि मदतीची आश्वासने दिली जात आहेत. मात्र या दौऱ्यांनंतर प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करण्यासाठी पैसा आणणार कुठून, हा खरा प्रश्न आता सरकारसमोर उभा ठाकला आहे. दुष्काळग्रस्त भागात …

Read More »

निवडणूक आयोगाच्या कामकाजाची चौकशी करून मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवावे : पृथ्वीराज चव्हाण

मुंबई : निवडणूक आयोगाच्या (ECI) कामकाजाबाबत ‘द इंडियन एक्सप्रेस’ दैनिकाने प्रसिद्ध केलेला अहवाल धक्कादायक असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटविण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील आपल्या पोस्टमध्ये पृथ्वीराज …

Read More »

लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणुकीत तब्बल 71 लाख मतदान अधिक एका महिन्यात साडेसहा लाख मतदार कसे वाढले? महाराष्ट्रात एकूण 9.78 कोटी मतदार आहेत आणि आता 2.6 कोटी नावे वगळण्यात आली, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार तथा नेते रोहित पवार

मुंबई : लोकसभेला 6 महिन्यात 6.5 लाख मतदार वाढले आणि लोकसभेचा निकाल पाहता विधानसभेला केवळ एका महिन्यात 6.5 लाख मतदार वाढविण्यात आले, हे मतदार कुठून आले आणि कसे आले?,लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणुकीत तब्बल 71 लाख मतदान अधिक झाले असून या संपूर्ण प्रकारात ईव्हीएम मॅनेज केले जात असल्याची चर्चा संपूर्ण राज्यात सुरू …

Read More »

SIR Controversy : निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकावर काँग्रेसचा पलटवार ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी

नवी दिल्ली : एका वृत्तपत्राने एसआयआर वर केलेल्या गौप्यस्फोटाच्या आणि देशव्यापी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेस पक्षाने २६ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकावर जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेसचे महासचिव (संपर्क) जयराम रमेश यांनी शनिवारी एक निवेदन जारी केले, ज्यात म्हटले आहे की, आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकात या वृत्ताचे थेट खंडनही केलेले नाही …

Read More »