सरकारला सर्कस बोलणार्‍या राजनाथसिंह यांचे ‘अनुभवाचे बोल’ राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांचे प्रतित्तुर

मुंबई: प्रतिनिधी
लोकशाही मार्गाने चालणार्‍या सरकारला सर्कस बोलणार्‍या राजनाथसिंह यांचे ‘अनुभवाचे बोल’ असल्याचे प्रतित्तुर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना दिले.
केंद्रीय मंत्री राजनाथसिंह यांनी रिंगमास्टरच्या चाबूकने महाविकास आघाडी सरकार चालवले जात असल्याचे वक्तव्य केले होते.
महाराष्ट्रामध्ये लोकशाही मार्गाने सरकारचे काम सुरू आहे. कोरोना काळात सरकारने केलेल्या कामाचे ICMR ने मुंबई मॉडेलची चांगली स्तुती केली. मात्र असे असताना केंद्रीयमंत्री राजनाथसिंह रिंग मास्टरच्या चाबूकने चालवले जाणारे सरकार असे वक्तव्य करत असल्याचे ते म्हणाले.

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांचा सवाल, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग कधी पूर्ण होणार? मुंबईला देशातील प्रमुख शहरांशी जोडणाऱ्या सर्व राष्ट्रीय महामार्गांच्या कामांना विलंब का ?

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु होऊन १५ वर्षे झाली तरी अद्याप हा महामार्ग पूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *