मुंबईः प्रतिनिधी आर्थिक तोट्यात असलेल्या बेस्ट उपक्रमाची बिल्डरकडे गेले १३ वर्षे असलेल्या थकबाकी आणि त्यात होत असलेल्या विलंबाबाबत एसआयटी मार्फत चौकशी करा अशी आग्रही मागणी भाजपा आमदारांनी विधानसभेत आज केली. बेस्ट उपक्रमाच्या डेपोंचा व्यावसायिक वापर करण्यासाठी विकासकांना देण्यात आले. यावेळी झालेल्या करारानुसार बेस्टला देय्य असलेल्या रकमेपैकी ३२० कोटी बिल्डरकडे थकित असल्याचे तारांकित …
Read More »अजित पवारांचे आदेश, कृषीपंप व ग्राहकांची वीजजोडणी तोडू नका विरोधकांच्या प्रश्नावर अजित पवार यांची ग्वाही
मुंबईः प्रतिनिधी सकाळी विधानसभेचे कामकाज सुरु होताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वीज मंडळाकडून वीज ग्राहक आणि कृषीपंपधारक शेतकऱ्यांना वीज जोडणी तोडण्यासंदर्भात बजाविण्यात आलेल्या नोटीशीचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोपर्यत निर्णय होत नाही तोपर्यत ग्राहकांची वीज तोडू नका असे आदेश वीज मंडळाच्या विभागाला दिले. शेतकऱ्यांचे कृषीपंप …
Read More »वैधानिक महामंडळावरून अजित पवार विरुध्द फडणवीस-मुनगंटीवार आमने सामने विरोधकांची अजित पवारांवर टीकेची झोड
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यापालांच्या अभिभाषणानंतर विधानसभेचे कामकाज सुरु होताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वैधानिक विकास महामंडळाची स्थापना आणि निधीबाबतचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपालांनी ती १२ आमदारांची यादी मंजूर केल्यानंतर लगेच संध्याकाळी ५ वाजेपर्यंत वैधानिक महामंडळाची स्थापना करण्यात येणार असल्याचे उत्तर देताच संतापलेल्या फडणवीसांनी बघु …
Read More »राज्यपाल म्हणाले, महसूली जमा कमी.. केंद्राकडे जीएसटीची थकबाकी आर्थिक परिस्थितीविषयी पहिल्यांदाच राज्यपाल आणि राज्य सरकारचे एकमत
मुंबईः विशेष प्रतिनिधी जीएसटी करापोटी केंद्र सरकारकडून नुकसान भरपाई पोटी मिळावयाची रक्कम येणे बाकी असल्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज दिली. तसेच राज्याच्या हिश्शाची ४६ हजार ९५० कोटी रूपयांपैकी फक्त ६ हजार १४० कोटी रूपये फक्त राज्याला मिळाले असून ११ हजार ५२० कोटी रूपय नुकसानभरपाई पोटी कर्ज म्हणून दिले आहेत. …
Read More »मुख्यमंत्री ठाकरेंनी दिला खा.डेलकर आत्महत्याप्रकरणी भाजपाला इशारा राठोडांवर गुन्हा दाखल मग खा.डेलकर आत्महत्या प्रकरणी का विचारत नाही?
मुंबईः प्रतिनिधी पुण्यात झालेल्या आत्महत्या प्रकरणात कोणतीही सुसाईड नोट नव्हती. तसेच त्याविषयीची तक्रारही कोणाची नाही. चव्हाणच्या आई-वडीलांनी राज्य सरकार आणि पोलिसांवर प्रशासनावर विश्वास दाखविला असतानाही विरोधकांकडून संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. या आत्महत्येबद्दल मागणी करत असताना मात्र मुंबईत सातवेळा निवडूण आलेल्या खासदाराने भाजपातील उच्च पदस्थांची …
Read More »दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचे मंत्री व आमदार सायकलवरून विधानभवनात प्रदेश काँग्रेसची माहिती
मुंबईः प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती निचांकी पातळीवर असताना देशात मात्र इंधनाचे दर उच्चांकी पातळीवर आहेत. केंद्र सरकारने लावलेल्या अन्यायकारक करांमुळे इंधनाचे दर गगनाला भिडले असून महागाई प्रचंड वाढली आहे. याचा निषेध म्हणून अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोमवारी १ मार्च रोजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेस पक्षाचे मंत्री …
Read More »भाजपाच्या वाघीणीमुळे पूजा चव्हाणप्रकरणी अखेर वनमंत्री राठोड यांचा राजीनामा निष्पक्ष चौकशीसाठी राजीनामा दिल्याची संजय राठोज यांची माहिती
मुंबईः प्रतिनिधी बीडच्या पूजा चव्हाण या तरूणीने केलेल्या आत्महत्याप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सुपुर्द केला. चव्हाण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी याकरीता आपण राजीनामा दिल्याचे स्पष्टीकरण राठोड यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले. यावेळी त्यांच्यासोबत सांसदीय कार्यमंत्री अनिल परब, शिवसेनेचे सचिव अनिल देसाई …
Read More »भिलारगावच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात एक पुस्तकाचे गाव मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मराठी भाषा विभागाचे विविध पुरस्कार प्रदान
मुंबई : प्रतिनिधी मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर व्हावा. मराठी भाषेचा जागर व्हावा यासाठी पुस्तकाचं गाव उपक्रम सुरू केला आहे. त्यामध्ये राज्यात एकच पुस्तकाचं गाव का असावे? असे नमूद करून तळा गाळातील मराठी भाषा, तिच्या वैशिष्ट्यांसह सर्वांपर्यंत पोहचावी यासाठी प्रयत्न करतो. मग मराठी भाषेचा विकास तिथपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न केले जातील. त्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात …
Read More »वर्षात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषा गौरव दिनानिमित्त - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आश्वासन
मुंबई : प्रतिनिधी मराठी भाषेला लाभलेले सांस्कृतिक वैभवाचे संवर्धन करण्याची आपली जबाबदारी असून पुढच्या मराठी भाषा गौरव दिनापर्यंत (वर्षभरात) मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन आणि मराठी भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दूरदृश्य …
Read More »कदरू आघाडी सरकारचा गोरगरीबांच्या विरोधातील खरा चेहरा पुन्हा एकदा उघड भाजपा आमदार अतुल भातखळकर यांची टीका
मुंबईः प्रतिनिधी फुले-शाहू-आंबेडकर यांच्या नावाने राजकारण करणाऱ्या आणि राज्यातील अनुसूचित जाती, भटक्या जाती व विमुक्त जमातीतील लोकांच्या उद्धाराचे आश्वासन देऊन निर्माण झालेल्या महाविकास आघाडी सरकारने राज्यातील अनुसूचित जाती, भटक्या जाती व विमुक्त जमातीतील दारिद्य रेषेखालील सुमारे अडीच लाख विद्यार्थिनींचा उपस्थिती भत्ता बंद केला आहे, दिवसाला केवळ १ रुपया दिला जाणारा …
Read More »
Marathi e-Batmya