राजकारण

दिपावलीचा सण पुढच्या आठवड्यापासून, पण सरकारचे हे नियम पाळायचेत राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : प्रतिनिधी पारंपारीक दिवाळी सण पुढच्या आठवड्यापासून सुरु होत असून या सणामध्ये जनतेने एकत्रित येवून हा सण साजरा करण्याचे टाळावे असे आवाहन करत फटाके विरहीत सण साजरा करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. तसेच दिवाळीच्या कार्यकाळात पहाट गाणी सारखे कार्यक्रम आयोजित न करण्याचे आवाहनही राज्य सरकारने नुकतेच एका निर्देशाद्वारे सर्वांना …

Read More »

पोलिसांच्या ‘फोर्स वन’ ला या तीन पध्दतीने प्रोत्साहन भत्ता मिळणार त्यांच्या आयुष्याची काळजी घेऊ - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी विघातक हल्ल्यांना परतवून लावण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पोलिसांच्या ‘फोर्स वन’ मधील शूर जवान, अधिकारी, कर्मचारी यांना सहाव्या वेतन आयोग काळातील दरानेच प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. बैठकीस गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री ॲड अनिल परब उपस्थित होते. वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीस मुख्य …

Read More »

कोविड काळात परदेशी विद्यापीठात या पध्दतीने शिक्षण घेणाऱ्यांना मिळणार शिष्यवृत्ती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी जागतिक पातळीवर १ ते ३०० रँकिंगच्या विद्यापीठात उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या परदेश शिष्यवृत्तीचा लाभ आता ऑनलाईन किंवा कॅम्पस पद्धतीने शिक्षण घेत असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे हित …

Read More »

२३ नोव्हेंबर नंतर नववी – बारावीचे वर्ग सुरू मात्र उद्यापासून दिवाळी सुट्टी शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाने अनलॉकनंतर वाहतुक, प्रवास व्यवस्था, नाट्यगृहे, सिनेमागृह, बाजारपेठा सुरळीतपणे सुरू केलेल्या आहेत. याच पार्श्‍वभूमीवर माध्यमिक शाळेतील नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा मानस असल्याचे शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचे शाळेत जाणे बंद असले तरी शिक्षण ऑनलाईन सुरु आहे. राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहूनच २३ नोव्हेंबर …

Read More »

पाच हजार कोटी रुपये द्यावी लागण्याची फडणवीसांची माहिती खोटी भाजपाच्या दाव्याची काँग्रेसकडून पोलखोल

मुंबईः प्रतिनिधी भाजपा आणि फडणवीस सरकारने मेट्रोच्या आरे कार डेपो संदर्भात मंबईकरांची घोर फसवणूक केली आहे. ज्या पद्धतीने जाणीवपूर्वक फडणवीस सरकार मुंबईकरांशी खोटे बोलत राहिले तो प्रकार भयंकर आणि अत्यंत घृणास्पद आहे. मेट्रोचा कार शेड कांजूरमार्गला करण्याचा प्लॅन फडणवीस सरकारचाच होता. ही जागा राज्य सरकारचीच असून त्या जागेवरून कोणताही वाद …

Read More »

आशिष शेलारांनी दिले पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना खुल्या चर्चेचे आव्हान मेट्रो कारशेडबाबत खूल्या चर्चेला या!

मुंबई : प्रतिनिधी मेट्रो कारशेडच्या प्रस्तावामुळे सॉल्ट पॅनच्या लँडबाबत अप्रत्यक्षरीत्या उद्या होणाऱ्या 50 हजार कोटीच्या जागांच्या हस्तांतरणाच्या घोटाळ्याची पायाभरणी काँग्रेस सोबत करताय की काय? असा सवाल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना भाजपचे नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी केला आहे तसेच आपण लपूनछपून मुलाखती देण्यापेक्षा मेट्रोच्या विषयावर थेट चर्चेला या! आम्ही …

Read More »

विधीमंडळाच्‍या लोकलेखा समितीच्‍या अध्‍यक्षपदी सुधीर मुनगंटीवार यांची नियुक्‍ती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेकांचा सदस्य म्हणून समावेश

मुंबईः प्रतिनिधी महाराष्‍ट्र विधीमंडळाच्‍या लोकलेखा समितीच्‍या अध्‍यक्षपदी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या अध्‍यक्षतेखाली गठीत या लोकलेखा समितीच्‍या सदस्‍यपदी माजी मुख्‍यमंत्री आ. पृथ्‍वीराज चव्‍हाण, विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते तथा माजी कृषीमंत्री आ. राधाकृष्‍ण विखे पाटील, माजी शालेय शिक्षण मंत्री अॅड. आ. आशिष …

Read More »

न दिलेल्यांसाठी दिवाळीनंतर परिक्षाः नापास झालेल्यांसाठी महिनाभरात पुन्हा उच्च व तत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी विद्यापीठ अनुदान आयोग व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परिक्षा घेण्यात आल्या. मात्र ज्या विद्यार्थ्यांना कंटोन्मेट झोनमध्ये रहात असल्याने, स्वतः बाधित किंवा कुटुंबिय बाधित झाले असल्याने किंवा अन्य कारणामुळे परिक्षा देता न आलेल्यांसाठी दिवाळी नंतर पुन्हा परिक्षा घेण्यात येणार असून दुर्दैवाने या परिक्षेतही विद्यार्थी नापास झालेला असेल तर …

Read More »

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना उद्यापासून मदत : मुंबई लोकलवरून केंद्राचे राजकारण मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी मदत देण्यात येणार आहे. त्यादृष्टीने या शेतकऱ्यांना उद्यापासून मदतीचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. हि मदत उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळीत काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर …

Read More »

फडणवीसांचा सल्ला, अनावश्यक बाबींकडे लक्ष देण्यापेक्षा शेतकऱ्यांना तातडीने मदत करा मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना लिगिले पत्र

मुंबई: प्रतिनिधी अतिवृष्टी-बोंडअळीमुळे कापूस-सोयाबीनचे प्रचंड नुकसान झालेले असताना सुद्धा विदर्भातील शेतकर्‍यांना कुठलीही मदत नाही. शेतमाल खरेदी सुद्धा अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे अन्य अनावश्यक बाबींकडे लक्ष देण्यापेक्षा राज्य सरकारने शेतकर्‍यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी करणारे पत्र माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना …

Read More »