मुंबई-अचलपूरः प्रतिनिधी हिंगणघाट येथील दरोडा गावातील एका प्राध्यापिकेवर एकतर्फी प्रेमातून झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या पीडीतेचा आज अखेर मृत्यू झाला. या पीडीतेच्या मृत्यूने संबध महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत असून तिच्या नातेवाईकांना १० लाख रूपयांची मदत राज्य सरकारच्यावतीने मंजूर करण्यात आल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली. …
Read More »सत्ताधारी म्हणाले जलदगतीने न्याय देणार तर विरोधकांकडून कठोर न्यायाची मागणी पीडीत जखमी तरूणीने घेतला सकाळी ६.५५ मिनिटांनी अखेरचा श्वास
मुंबईः प्रतिनिधी हिंगणघाट तालुक्यातील एका प्राध्यापिकेवर एकतर्फी प्रेमातून हल्ला करत तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न माथेफिरूने केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या पीडीत प्राध्यापिकेची अखेर मृत्यूशी झुंज संपल्याने याप्रकरणातील हल्लेखोराला कठोरात कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली. तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्र्यांनी सदर प्रकरणात जलदगतीने …
Read More »महिला अत्याचाराविरोधात सरकारची परस्परविरोधी भूमिका हिंगणघाट जळीत प्रकरणी तातडीने हालचाली तर डॉ.तडवीप्रकरणी विरोधी भूमिका
मुंबईः प्रतिनिधी राज्यात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. मात्र महिला अत्याचाराचाच भाग असलेल्या हिंगणघाट येथील महिला जळीत प्रकरण आणि मुंबईतील नायर हॉस्पीटलमधील आदिवासी एका डॉक्टर विद्यार्थींनीच्या आत्महत्या प्रकरणात राज्य सरकारने परस्पर विरोधी भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. हिंगणघाट येथील काँलेजमध्ये प्राध्यापिकेला एकतर्फी प्रेमातून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. …
Read More »भाजपाच्या संबित पात्राला काँग्रेस शिकविणार कायदेशीर धडा काँग्रेस नेते नसीम खान यांचा इशारा
मुंबईः प्रतिनिधी भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी सोशल मीडियावर खोटा व्हिडिओ शेअर करुन आपली तसेच काँग्रेस पक्षाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी त्यांना कायदेशीर धडा शिकवणार असल्याचा इशारा काँग्रेस नेते नसीम खान यांनी देत त्यांच्या विरोधात मुंबई पोलीस आयुक्त, साकीनामा पोलीस स्टेशन, निवडणूक आयोगाकडेही यासंदर्भात तक्रार दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. …
Read More »वीज ग्राहकांना कमी दरात वीज देण्यासाठी जनसुनावण्या घेणार ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांचे आश्वासन
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील जनतेला कमीत कमी दरात वीज उपलब्ध व्हावी या अनुषंगाने वीजदरा संदर्भात एमईआरसीकडे प्रस्ताव आला आहे. या वीज दरासाठी जनसुनावण्या घेण्यात येतील असे आश्वासन राज्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी देत महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेला देखील आपले म्हणणे मांडता येणार असून त्यानंतर एमईआरसीने घेतलेला निर्णय शासनाकडे येईल आणि …
Read More »महिला व बालकांच्या सुरक्षिततेत हयगय करणाऱ्यांची गय नाही गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे मुख्यमंत्री ठाकरेंचे आदेश
मुंबई: प्रतिनिधी महिला व बालकांची सुरक्षितता हा शासनाच्या सर्वोच्च प्राधान्याचा विषय असून यात हयगय करणाऱ्यांना माफी नाही असे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की, पोलीस यंत्रणेतील कोणतीही व्यक्ती, मग ती अधिकारी असेल किंवा कर्मचारी जे या कामात टाळाटाळ करतील किंवा विलंब लावतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच संबधित गुन्हेगारांवर …
Read More »देशाबाहेर काढणारा कायदा नसल्याचे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता जाहीर समर्थन करावे भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांचे आवाहन
मुंबईः प्रतिनिधी नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात सीएएबदद्ल गैरसमज आहेत. हा कोणालाही देशाबाहेर काढण्याचा कायदा नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच म्हणाले. त्यामुळे त्यांनी आता सीएएच्या समर्थनाची उघड आणि स्पष्ट भूमिका जाहीर करावी, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी केले. मुख्यमंत्री ठाकरे यांची बुधवारच्या मुलाखतीतील …
Read More »भाजपाच देशद्रोही अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची टीका
मुंबईः प्रतिनिधी दिल्ली विधानसभा निवडणुकीत जनता भाजपा हीच देशद्रोही आहे हे मतदान करुन सिद्ध करेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला. दिल्ली विधानसभा निवडणुकीत मोदींनी जनतेला देशद्रोहींच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन केले आहे. मोदींच्या या आवाहनावर बोलताना नवाब मलिक यांनी मोदींवर निशाणा …
Read More »हेगडेंच्या त्या वक्तव्यप्रकरणी भाजपा नेत्यांनीच माफी मागावी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची मागणी
मुंबईः प्रतिनिधी भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेले वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह आहे. भाजपा व संघ परिवाराकडून महात्मा गांधींबद्दल वारंवार अशी अपमानजनक वक्तवे केली जात असताना त्यांना भाजपचे शिर्षस्थ नेतृत्व पाठीशीच घालत असल्याचे दिसते. हेगडेंचे आजचे वक्तव्यही संतापजनक आणि निषेधार्ह आहे. या वक्तव्यप्रकरणी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनीच माफी …
Read More »राजकिय नेत्यांचे फोन टॅपिंग प्रकरण ६ आठवड्यात तपासणार गृहमंत्री अनिल देशमुख यांची ग्वाही
मुंबईः प्रतिनिधी राजकिय फायद्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांचे फोन टॅप करण्याचे काम तत्कालीन सरकारने केले. यासंदर्भातच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी तक्रारी केल्यानंतरच चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ६ आठवड्यात याची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. मंत्रालयातील विधिमंडळ व मंत्रालय वार्ताहर संघात आयोजित …
Read More »
Marathi e-Batmya