स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन अशा सांगली तालुक्यातील शिराळा येथील स्मृतीस्थळ विकास आराखड्यास राज्य शासनाच्या शिखर समितीची मान्यता मिळाली असून उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या नियोजन विभागाने त्यासाठी १३ कोटी ४६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यासंबंधीचा शासन निर्णय नियोजन विभागाने निर्गमित केला आहे. …
Read More »शाळा परिसरातील बार व मद्य विक्रीवर कारवाई करा
पनवेल, कल्याण, डोंबिवली या शहरांत काही ठिकाणी शाळा परिसरात बार व मद्य विक्री सुरू असल्यास संबंधीत ठिकाणी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिले. मंत्रालयातील दालनात राज्य उत्पादन शुल्क मंत्री देसाई यांनी ठाणे, डोंबिवली, कल्याण व पनवेलसह रायगड येथील स्थितीचा आढावा घेतला. या बैठकीस …
Read More »राज्य उत्पादन शुल्क विभागाचे स्वतंत्र पहिले अद्ययावत प्रशिक्षण केंद्र
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मौजे वाटोळे येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाकरीता स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. हे विभागाचे राज्यातील पहिलेच प्रशिक्षण केंद्र आहे. यामध्ये अद्ययावत अशा सर्व सुविधा असणार आहे. विभागातील अधिकारी, जवान, कर्मचारी यांच्या क्षमता वृध्दीसाठी प्रशिक्षण केंद्र उपयोगी ठरणार आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचा सवाल, घड्याळ चिन्ह आणि शरद पवारांचा फोटो का वापरता?
सत्तेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडत राज्यातील शरद पवार आणि अजित पवार अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विभागणी झाली. मात्र अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाने १४ मार्च रोजी खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आणि निवडणूक चिन्ह म्हणून मान्यता दिली आहे असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने आज अजित …
Read More »जयराम रमेश यांचा हल्लाबोल, मोदी सरकारची एकच निती ‘चंदादात्याचा सन्मान व अन्नदात्याचा अपमान’
मोदी सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे तीन काळे कायदे २७ सप्टेंबर २०२० रोजी आणले होते, परंतु शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनापुढे त्यांना झुकावे लागले आणि अखेर ते तीन काळे कायदे वापस घ्यावे लागले. यासाठी १५ महिन्यांचे आंदोलन व ७०० शेतकऱ्यांना बलिदान द्यावे लागले आणि १९ नोव्हेंबर २०२१ रोजी हरित क्रांतीच्या प्रणेत्या दिवंगत पंतप्रधान …
Read More »वन नेशन, वन इलेक्शनचा अहवाल रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपतींना केला सुपुर्द
साधारणतः २०१९ साली देशात भाजपाच्या बहुमताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकार स्थानापन्न झाल्यानंतर वन नेशन वन इलेक्शन पध्दती लागू करण्याची योजना मोदी यांनी गुजरातमध्ये पहिल्यांदा जाहिर केली. त्यानंतर जून्या संसदेतील शेवटच्या अधिवेशनाच्या कालावधीत माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली वन नेशन वन इलेक्शन संकल्पना देशात राबविण्यासाठी समितीची स्थापनाही …
Read More »संजय राऊत यांचा खोचक टोला, मोदी तो गयो…
देशातील काहीजण जनतेच्या मनातील बात ऐकण्यापेक्षा फक्त स्वताच्याच मनातील बात ऐकवत आहेत असा उपरोधिक टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता अप्रत्यक्ष लगावला. ज्यांना देशातील जनतेच्या मनातील ऐकण्याची इच्छा होत नाही अशा मोदी तो गयो असा स्पष्ट इशाराही यावेळी संजय राऊत यांनी केला. पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, …
Read More »राहुल गांधी यांचे आश्वासन, शेतकऱ्यांना जीएसटीमधून वगळणार, पीक विमा योजनेची…
शेतकरी आपल्या मागण्यांसाठी दिल्लीच्या सीमेवर व रामलीला मैदानावर आंदोलन करत आहेत. हमी भावाचा कायदा करावा ही शेतकऱ्यांची मागणी आहे पण मोदी सरकार त्यांची दखल घेत नाही. मोदी सरकारने २२ अरबपतींचे १६ लाख कोटींचे कर्ज माफ केले परंतु शेतकऱ्यांचे एक रुपयाचेही कर्ज माफ केले नाही. ज्यांना शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव नाही, त्यांचे …
Read More »शरद पवार म्हणाले, शेतकरी वर्गात सरकारविरोधात प्रचंड नाराजी
राज्यात विशेषतः शेतकरी वर्ग हा सत्ताधारी पक्षावर नाराज असून राज्यातील वातावरण हे महाविकास आघाडीला अनुकूल असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिक मध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. शरद पवार म्हणाले की, नाशिक, धुळे, सातारा, पुणे आदी कांदा उत्पादक जिल्ह्यामध्ये सरकारच्या विरोधात मोठी नाराजी …
Read More »आता अहमदनगर आणि मुंबईतील या रेल्वे स्थानकांच्या नामकरणाला मान्यता
आगामी लोकसभा निवडणूक राज्यातील सत्ताधारी तिन्ही पक्षांचे खासदार पराभवाच्या छायेत आल्याने मराठी भाषा आणि मराठी नावे पुन्हा एकदा चर्चेत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बहुप्रतिक्षित अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यादेवी असे करण्याबरोबर मुंबईतील इंग्रज अधिकाऱ्यांच्या नावे असलेली रेल्वे स्थानकांची नावे आता मराठी नावे देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य …
Read More »
Marathi e-Batmya