राजकारण

वीज कर्मचाऱ्यांच्या संपप्रकरणी झालेल्या बैठकीत मंत्र्यांनी दिले “हे” आश्वासन वीज खाजगीकरणाला विरोध करणार असल्याचे आश्वासन

महाराष्ट्रासह देशभरातील वीज कर्मचाऱ्यांनी वीज खाजगीकरणाच्या विरोधात संपाचे हत्यार उपसल्यानंतर राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी कर्मचाऱ्यांशी चर्चेची तयारी दाखवित संप मागे घेण्याची विनंती केली. परंतु तरीही वीज कर्मचाऱ्यांनी आपला संप सुरुच ठेवल्याने आज दुपारी निश्चित झालेली बैठकी रद्द करण्यात आली. मात्र पुन्हा आज संध्याकाळी कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत ऊर्जा मंत्र्यांनी दिलेल्या …

Read More »

शेलारांच्या मागणीवर गृहमंत्री वळसे-पाटील म्हणाले, प्रतिक्रिया देत बसलो तर … गुढीपाडवा, रामनवमीसाठी लवकरच अधिसूचना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

गुढी पाढवा आणि रामनवमी सण अगदी तोंडावर आले तरी अद्याप गृह विभागाकडून त्याबाबतची मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली नसल्याच्या मुद्यावरून भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला टोला लगावत हिंदू सणांचा विषय आला की ठाकरे सरकारच्या हाताला लकवा का मारतो? असा खोचक सवाल केला. त्याबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना …

Read More »

पोट निवडणूकीच्या प्रचारात चंद्रकात पाटील म्हणाले, मोदींचे हात बळकट करण्यासाठी मते द्या प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपाची प्रचारात आघाडी घरोघरी जाऊन भाजपा उमेदवाराचा प्रचार

काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या उत्तर कोल्हापूर विधानसभा पोट निवडणूकीतील कामगिरीवर चंद्रकांत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाचे भवितव्य ठरणार असले तरी आता काहीही करून ही जागा निवडूण आणायचीच असा चंग चंद्रकांत पाटील यांनी बांधला आहे. त्यामुळे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे हात मजबूत करण्यासाठी भाजपा उमेदवार सत्यजीत …

Read More »

नागपूरचे देवेंद्र फडणवीस मुंबईच्या झगमगाटात हरवले राज्याचे नेतृत्व आल्यापासून फडणवीसांना विदर्भाचा विसर:अतुल लोंढे

माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. परंतु मुख्यमंत्रीपदाची पाच वर्षे व त्यानंतर विरोधी पक्षनेतेपदी नियुक्त झाल्यापासून देवेंद्र फडणवीस हे मुंबईच्या झगमगाटात हरवले असून विदर्भ व नागपूरचा त्यांना विसर पडल्याचा आरोप काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला. …

Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी करा, पण नियमावली जाहीर होणार मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी दिले प्रशासनाला निर्देश

मागील दोन वर्षापासून कोविड संसर्गाजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरा करता आला नाही. मात्र यंदा कोरोनाचे सावट कमी झाल्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर य़ांची जयंती उत्साहात साजरी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले. मात्र आवश्यक नियमावलींचे परिपत्रक गृह विभागाकडून जारी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. भारतरत्न …

Read More »

राजकीय अभिनिवेश बाजूला सारून एसटी संपावर तोडगा काढा आ. सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे सरकारकडे मागणी

राज्यात गेल्या १५२ दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर महाविकास आघाडी सरकारने पक्षीय राजकारण व राजकीय अभिनिवेश बाजूला सारून, तातडीने सन्मानजनक तोडगा काढावा आणि ग्रामीण भागाच्या जीवन वाहिनीला पुन्हा गती द्यावी अशी मागणी विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली. २९ ऑक्टोबर २०२१ पासून राज्यात विविध भागात सुरू …

Read More »

भाजपाची काळी जादू चालणार नाही मविआ सरकार ५ वर्ष चालणार!: नाना पटोले

भाजपाने सत्तेसाठी पहाटेचा प्रयोग केला. परंतु तो फसल्यामुळे वैफल्यग्रस्त भारतीय जनता पक्ष महाविकास आघाडी सरकारविरोधात सातत्याने कटकारस्थाने करत आहे. सत्ता गेल्यामुळे भाजपाची तडफड होत असून महाविकास आघाडी सरकारवर भाजपाची काळी नजर आहे. परंतु भाजपची ही काळी जादू काही चालणार नाही आणि मविआ सरकार पूर्ण ५ वर्ष चालणार, असा विश्वास काँग्रेस …

Read More »

ठाकरे सरकारच्‍या हाताला लकवा का मारतो? भाजपा शोभायात्रा आणि राम नवमीच्‍या कार्यक्रमात सहभागी होणार

हिंदू सणांना परवानगी देण्‍याचा विषय आला की, ठाकरे सरकारच्‍या हाताला लकवा का मारतो?, असा सवाल करीत भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी आज पुन्‍हा एकदा सरकारवर तोफ डागली हिंदू नववर्षच्‍या निमित्‍ताने गुढीपाडव्‍याला निघणा-या शोभायात्रा आणि राम नवमीच्‍या मिरवणूका यांना परवानगी द्या, अशी मागणी भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार …

Read More »

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, पराभूत झाल्याने काँग्रेसला सोडू नका तर मजबूत करा काँग्रेस नेत्यांना केली मौल्यवान सूचना

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे जितके खवय्ये म्हणून प्रसिध्द आहेत. तितकेच राजकारणाच्या पलिकडे जावून मैत्री जपणारे नेते म्हणूनही ते परिचीत आहेत. मात्र आज त्यांनी चक्क काँग्रेस नेत्यांनाच पक्ष सोडून न जाण्याची विनंती करत पक्ष मजबूत करण्याचा सल्लाही दिला. त्यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या. एका प्रसार माध्यमाच्या कार्यक्रमात नितीन …

Read More »

आमदारांना घरे देण्याच्या निर्णयावरून शरद पवार म्हणाले, फक्त योजना राबविण्याऐवजी… मुख्यमंत्री ठाकरे आणि गृहनिर्माण मंत्र्यांच्या निर्णयावर दाखविली नाराजी

नुकत्यात झालेल्या अर्थसंकल्पिय अधिवेशऩात गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी मुंबई महानगर वगळता राज्यातील इतर भागातील ३०० आमदारांना घरे देण्याचा निर्णय जाहीर केला. गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांच्या घोषणेची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रि ओढत त्यांनीही आपल्या भाषणात आमदारांना घरे देणार असल्याची घोषणा केली. परंतु मुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्र्यांच्या या घोषणेवर …

Read More »