राहुल गांधी यांची एक्सवर पोस्ट म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येतेय… शिवसेना आणि ठाकरे कुटुंबियाबाबत सहवेदना, पुण्यतिथी निमित्त केले अभिवादन

राज्यात सध्या विधानसभा निवडणूकीचा माहोल सध्या सुरु असून निवडणूकीच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांचे उट्टे काढण्याची एकही संधी सोडली जात नाही. त्यातच भाजपाचे नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलेल्या आव्हानाची पूर्तता काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी पूर्ण करत भाजपाला प्रति आव्हान दिले. त्यानंतर शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक खास पोस्ट करत बाळासाहेब ठाकरे यांनी आठवण येत असल्याचे त्यात लिहिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने २५ वर्षे भाजपासोबत राहिलेल्या शिवसेनेचे शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबतची युती भाजपाने संपुष्टात आणली. त्यानंतर अनेकदा भाजपाने उद्धव ठाकरे यांना चुचकारण्याचा प्रयत्न केला. मात्र राज्यातील विधानसभा निवडणूकीचे औचित्य साधत प्रचारसभेच्या दरम्यान शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आता काँग्रेस सोबत गेलेले आहेत. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सोडून स्वातंत्र्यवीर वि दा सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत दोन चांगले शब्द वदवून दाखवावे असे आव्हान उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांना दिले.

काल शिर्डी येथील सभेत बोलताना काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी राहुल गांधी यांच्या आव्हानाची पूर्ती करत शिवाजी महाराजांचा अपमान ना बाळासाहेब ठाकरे यांनी सहन केला असता ना काँग्रेसचा कोणताही नेत्याने सहन केला असता असे सांगत भाजपाला जातीय जणगणना आणि आरक्षणाच्या प्रश्नावरून प्रति आव्हान दिले.

त्यातच आज १७ नोव्हेंबर दिनानिमित्त साधत राज्यातील अनेक नेते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जात आदरांजली वहात अभिवादन करत आहेत. हेच औचित्य साधत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक पोस्ट करत आज बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येत असून माझे विचार आणि सहवेदना उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संपूर्ण शिवसेनेच्या कुटुंबियासोबत असल्याचे त्यात लिहिले.

राहुल गांधी यांच्या या पोस्टनंतर भाजपाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आव्हानाला प्रत्युत्तर दिल्याचे स्पष्ट होत असून या नंतर भाजपा आता राहुल गांधी यांना काय उत्तर देणार हे औस्त्युक्याचा विषय ठरणार आहे.

About Editor

Check Also

प्रविण सहानी यांची माहिती, बदलत्या समीकरणात भारताला फार स्थान नाही, पाकिस्तानचा दबदबा मात्र वाढणार चीन, रशिया व अमेरिकेशी चांगले संबंध असणारा पाकिस्तान एकमेव देश

अमेरिका, इस्त्रायल, इराण युद्धानंतर जगाचे समिकरणच बदलले जाणार आहे. जग आता दोन शक्तीमध्ये विभागलेले राहिले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *