रामदास आठवले म्हणाले, अतिरेक्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानशी भारताची मैत्री कधीही नाही पंतप्रधान मोदींची विकासाची गाडी कोणी अडवू शकत नाही

अतिरेक्यांना आश्रय देणे थांबवून आतंकवाद संपवला तरच पाकिस्तानशी मैत्रीची चर्चा होईल. मात्र आतंकवाद संपवण्याची पाकिस्तानची ईच्छा नाही. पाकिस्तान अतिरेक्यांना पाठबळ देत आहे. अतिरेक्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानशी भारताची कधीही मैत्री होणार नाही असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज केले.

जम्मू येथील आमंत्रण रिसॉर्ट हॉल येथे महाराजा हरिसिंह डोगरा अवॉर्ड सोहळ्यात विशेष अतिथी म्हणून रामदास आठवले बोलत होते. यावेळी माजी राज्यपाल आणि भारताच्या पहिल्या महिला माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांच्यासह अनेक मान्यवरांना रामदास आठवले यांच्या हस्ते महाराजा हरिसिंह डोगरा अवॉर्ड प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाच्या आयोजक आणि रिपाइं जम्मू काश्मीर प्रदेश अध्यक्षा संध्या गुप्ता आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

रामदास आठवले पुढे म्हणाले की, दिवंगत अटल बिहारी वाजपेयी हे प्रधानमंत्री असताना आगरा येथे पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्याशी अटलजींची चर्चा झाली होती. तेंव्हा पाकिस्तान ने आतंकवादी करावया थांबवाव्यात. आतंकवाद जोपर्यंत रोखला जात नाही तोपर्यंत पाकिस्तानशी मैत्रीपूर्ण सबंध स्थापन होऊ शकत नाहीत असे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी सांगितल्यानंतर पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ या लष्करशहाने आतंकवाद संपविण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यामुळे आतंकवाद संपवण्याची आणि भारताशी मैत्री करण्याची पाकिस्तानचीच इच्छा नाही. त्यामुळे अतिरेक्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानशी भारताची मैत्री कधीही होणार नाही असेही यावेळी सांगितले.

भारत नाही कुणाचा गुलाम म्हणून आम्ही करीत आहोत देशासाठी बलिदान देणाऱ्यांना सलाम असे सांगत मंत्री रामदास आठवले यांनी देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांचा महाराजा हरिसिंह डोगरा अवॉर्डने सन्मान केला. त्यात बीएसएफ; सीआरपीएफच्या शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा समावेश होता. यावेळी २६/११ मुंबई हल्ल्यावेळी अनेकांचे प्राण वाचविणारे पोलिस सबइन्स्पेक्टर मंगेश नाईक यांचा यावेळी महाराज हरिसिंह डोगरा अवॉर्ड ने न. रामदास आठवले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

माजी राज्यपाल आणि भारताच्या पहिल्या महिला आयपीएस किरण बेदी या आपल्या शिस्तप्रिय कर्तृत्वासाठी लोकप्रिय होत्या. त्यांच्या कार्यकाळात दिल्लीत त्या आयपीएस म्हणून कर्तव्य बजावताना त्यांनी तत्कालीन पंतप्रधानांची गाडी जेसीबी ने उचलून नेऊन कारवाई केली होती. याची आठवण सांगताना रामदास आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाची गाडी कोणी अडवू शकत नाही. विकासाच्या दिशेने भरधाव वेगाने मोदींची विकासाची गाडी पुढे चालली असल्याचे सांगितले.

शिस्तप्रिय कर्तव्य कठोर अधिकारी म्हणून किरण बेदी अधिक लोकप्रिय आहेत. किरण बेदी यांचा महाराजा हरिसिंह डोगरा अवॉर्ड ने रामदास आठवले यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.

शेवटी रामदास आठवले म्हणाले की, जम्मू काश्मीर मधून कलम ३७० हटविल्यामुळे येथील पोलिस बीएसएफ यांना अधिकारी मिळाले आहेत. त्यामुळे पूर्वीपेक्षा तुलनेने जम्मू काश्मीर मध्ये चांगली शांतता वाढत आहे. आतंकवाद कमी होत आहे. जम्मू काश्मीर मधून संपूर्ण आतंकवाद नष्ट करायचा असल्याचेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

जयंत पाटील यांचा टोला, तुम्हाला १२ वर्षात जे करता आलं नाही, ते आम्ही तुमच्या आधी केलं सत्ताधाऱ्यांना टोले लागवत आणि चिमटे काढत जयंत पाटील यांनी कर्जमाफी योजनेची हवाच काढली !

२०१४ पर्यंत तत्कालीन राज्य शासनाने तिजोरीतून एकदाही कर्जमाफी केली नाही असे सत्ताधारी म्हणतात. २००८ मध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *