वर्षा गायकवाड यांचा संतप्त सवाल, सरकारने बदलापूर घटनेतून काय बोध घेतला? शाळांमधील मुलींची सुरक्षा वाऱ्यावरच, राज्यातील शाळांमध्ये 'सखी सावित्री' समिती पुन्हा कार्यान्वित करा

भाजपा युती सरकारने राज्यातील शाळांमध्ये मुलींची सुरक्षा तर वाऱ्यावरच सोडली आहे. पुण्यातील एका नामांकित शाळेत चेंजिंग रूममध्ये मुलींचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना स्टाफमधील एक व्यक्ती पकडला गेला. ही घटना अत्यंत चिंताजनक आहे. बदलापूरच्या शाळेतील घटनेप्रमाणेच या घटनेतही शाळेतील कर्मचारीच आरोपी आहे. सरकारने बदलापूर घटनेतून काय बोध घेतला? असा संतप्त सवाल मुंबई काँग्रेस अध्यक्ष तथा खासदार वर्षा गायकवाड यांनी राज्य सरकारला विचारला.

पुण्यातील घटनेवर बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, पुण्यात काही दिवसांपूर्वीच दोन मुलींचे शाळेतून अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. आता हा चेंझिग रुममधील व्हिडोओ शुटींग, या सर्व घटना मन सुन्न करणाऱ्या आहेत. महाविकास आघाडी सरकारने सखी सावित्री समितीची स्थापना केली होती, ज्यामध्ये स्थानिक पोलीस आणि शाळा प्रशासन यांच्यात समन्वय साधण्याचे काम केले जात होते. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी असे कोणतेही ठोस उपाय आता उचलले जात नाहीत असा आरोपही यावेळी केला.

शेवटी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, लवकरात लवकर सखी सावित्री समिती पुन्हा कार्यान्वित करण्यात यावी आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी मार्गदर्शक तत्त्व जारी करण्यात यावीत. शाळांमधील पोक्सो कायद्यांतर्गत येणाऱ्या घटनांवर अंकुश आणणे केवळ अत्यावश्यकच नाही तर सरकारचे कर्तव्यही आहे अशी आठवणही यावेळी सरकारला करून दिली.

About Editor

Check Also

छगन भुजबळ यांची मागणी, राज्यात पीएनजी नेटवर्क वाढीसाठी केंद्र शासनाकडून आर्थिक पाठबळ आवश्यक निवासी व व्यावसायिक आस्थापनांना एलपीजी व पीएनजी गॅसचा अधिक चांगला व सुलभ पुरवठा उपलब्ध करून देणे

पीएनजी नेटवर्कचा राज्यभर विस्तार अधिक वेगाने करण्यासाठी केंद्र शासनाकडून तांत्रिक सहाय्य तसेच पायाभूत सुविधा उभारणीसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *