कोल्हापूरातील पोट निवडणूकीत काहीही करून काँग्रेसच्या ताब्यातील जागा हिसकावून घ्यायचीच असा चंग बांधून कोल्हापूरात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे ठाण मांडून बसले होते. तरीही भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे सध्या चंद्रकांत पाटील यांच्या त्या वक्तव्याची चर्चा सुरु झाली असून त्या वक्तव्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून आता हिमालयात जा अशी उपरोधिक …
Read More »मंत्री थोरात म्हणाले, भाजपाला सतेज बंटी पाटील पुरून उरले कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेने भाजपच्या धर्मांध राजकारणाला नाकारले
कोल्हापूर मधील स्वाभिमानी मतदारांनी भारतीय जनता पक्षाची दहशत, दडपशाही, प्रलोभनांना व धार्मिक ध्रुवीकरणाच्या अजेंड्याला न जुमानता महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांना विजयी केले. हा विजय जनतेचा महाविकास आघाडीवर असलेला विश्वास अधोरेखित करतो, असे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीच्या निकालावर …
Read More »राज ठाकरेंच्या आधीच नाशिकच्या मनसे पदाधिकाऱ्यांकडून अमित शाहंना पत्र मस्जिदीवीरल भोगें काढण्यासंदर्भात लिहीले पत्र
गुढी पाडव्याच्या मनसे मेळाव्यात मस्जिदीवरील भोंग हटविण्यासह मदरशांवर धाडी टाकण्याबाबत आपण स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगणार असल्याचे वक्तव्य मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाच्यावेळी जाहीर केले होते. तसेच जर मस्जिदीवरील भोंगे नाही उतरवले तर मस्जिदीसमोर मोठे भोंगे लावत हनुमान चालिसा लावणार असल्याचा इशारा दिला. मात्र मनसे प्रमुख राज ठाकरे …
Read More »राज ठाकरेंबद्दल शरद पवार म्हणाले, “त्या” रस्त्याने जायचा कार्यक्रम दिसतोय भोंगा विरूध्द हनुमान चालिसावरून शरद पवारांनी व्यक्त केले मत
मागील काही दिवसांमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील राजकारणात जातीय समीकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीकेचा भडीमार केला. त्यास शरद पवार यांनीही मुद्देसुद्द उत्तर देत राज ठाकरे यांचे आरोप परतवून लावले. मात्र आता मस्जिदीवरील भोंग्यावरून मनसे आणि भाजपाची एकच भूमिका असल्याचे जवळपास स्पष्ट झाल्याने आगामी काळात मनसे …
Read More »फडणवीसांच्या टीकेवर शरद पवार म्हणाले, प्रश्नाचे गांभीर्य नसणाऱ्याचं फारस गंभीर… मुंबईतल्या १३ व्या बाँम्बस्फोटावरून पवारांनी दिले उत्तर
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर जाती-पातीतील संघर्ष निर्माण झाला असल्याचा आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला. त्यानंतर मुस्लिम समुदायाचे लांगुलचालन आणि मतांचे राजकारण करण्यावरून भाजपाचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या एकूण धार्मिक राजकारणाचा पडदा पाश करण्यासाठी सलग १४ ट्विट करत मुस्लिमधार्जिणे राजकारण पवार करत असल्याचा आरोप केला. …
Read More »ऐरवी त्यांचे इंजिन सायडनिंगला असते, पण आता भाजपाला चालवायला दिलेय मराठी माणूस ते तथाकथित हिंदुत्व व्हाया मोदी: शिवसेना प्रवक्त्या प्रा डॉ मनीषा कायंदे यांची टीका
मराठी माणसाला न्याय मिळायला हवा असा दावा करून स्थापन झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कधी सूर सापडलाच नाही. शिवसेना आणि सेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करणे हा एक कलमी कार्यक्रम राबवणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पक्ष झेंड्यातून हिरवा रंग कधी गायब झाला आणि त्यांचे इंजिन रुळावरून कधी घसरले याचा …
Read More »किरीट सोमय्यांचे आरोप म्हणजे गावातल्या चेटकिणी बाईसारखे केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर सोमय्यांनी केलेल्या आरोपाचे काय झाले?: अतुल लोंढे यांचा सवाल
भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे विरोधी पक्षांच्या नेत्यांवर सातत्याने खोटे आरोप करून बदनामी करत आहेत. गाव खेड्यात दुसऱ्याचे नुकसान व्हावे, त्यांना त्रास व्हावा या कुहेतूने बाहुल्या बनवून त्याला लिंबू, मिरची, हळद, कूंकू, टाचण्या, टोचणाऱ्या चेटकीणीसारखी सोमय्या यांची अवस्था असून गावातल्या त्या चेटकिण बाईसारखेच त्यांचे आरोप असल्याची टीका …
Read More »पवारांच्या “त्या” वक्तव्याने दंगली थांबल्या तर फडणवीसांना दुःख वाटण्याचं कारण काय? मुंबईत दंगली घडाव्यात हा कदाचित भाजपचा उद्देश होता का?-महेश तपासे
शरद पवारांनी जर एखादं वाक्य बोलून शेकडो लोकांचे प्राण वाचवले असतील… दंगली रोखल्या असतील तर त्याच्यामध्ये फडणवीसांना दुःख वाटण्याचं कारण काय? ९३ च्या बॉम्बस्फोटानंतर मुंबईत दंगली घडाव्यात हा कदाचित भाजपचा उद्देश होता का? हे फडणवीस यांनी स्पष्ट करावे असे थेट आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिले. विरोधी …
Read More »डॉ. आंबेडकरांनी दिलेले संविधान संपविण्याचा केंद्रातील सत्ताधा-यांचा डाव काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आरोप
माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने दिला आहे. सर्व समाजाचे न्याय व हक्क अबाधित ठेवण्याचे काम संविधानाच्या माध्यमातून होत आलेले आहे. देशातील भारतीय जनता पक्षाचे सरकार संविधानिक संस्था संपवून संविधानच संपुष्टात आणण्याचे काम करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी करत या देशातील लोकशाही वाचवण्यासाठी …
Read More »चंद्रकांत पाटील म्हणाले, राज ठाकरे जे हिंदुत्वाचे मुद्दे मांडतात ते भाजपाचे हिंदूत्व हा भाजपाचा श्वास असल्याची कबुली
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणामुळे हिंदुत्वाचा मुद्दा ऐरणीवर आल्याची चर्चा असली तरी राज ठाकरे जे हिंदुत्वाचे मुद्दे मांडतात ते भारतीय जनता पार्टी खूप आधीपासून मांडत आहे. हिंदुत्व हा भाजपाचा श्वास आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत केले. राज ठाकरे …
Read More »
Marathi e-Batmya