Editor

जयंत पाटील म्हणाले, “व्वा रे बिट्या (किरीट सोमय्या) तुला कुणी सांगितलं ?…..” नरेंद्र मोदींनी लोकांना महागाईची एकप्रकारची सवयच लावली

अहमदनगर – पारनेर: प्रतिनिधी किरीट सोमय्या म्हणतात महाराष्ट्रातील अर्ध मंत्रिमंडळ हॉस्पिटलमध्ये तर अर्ध तुरुंगात जाईल. व्वा रे बिट्या तुला कुणी सांगितलं ? असा सवाल करतानाच ईडीची नोटीस येण्याआधी किरीट सोमय्या, चंद्रकांत पाटील यांना कसं कळतं? याचा अर्थ भाजपतर्फे तपास यंत्रणेचा गैरवापर केला जातोय असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि …

Read More »

मविआ सरकार वसविणार शिर्डी विमानतळाजवळ “आशा” नावाचं नवं शहर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई: प्रतिनिधी विमानतळाच्या सभोवतालचा परिसर विकसित करून सर्व सुविधायुक्त शहर वसविण्यासाठी शिर्डीची निवड करण्यात यावी तसेच महाराष्ट्रातील एक उत्तम विकास केंद्र याठिकाणी वसवावे अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ठाकरे बोलत होते. वर्षा येथील समिती कक्षात झालेली ही ७६ वी बैठक होती. …

Read More »

राज्यातील हृदयरूग्णांसाठी १२ जिल्ह्यात स्टेमी प्रकल्प: तासात उपचार शक्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते प्रकल्पाचे लोकार्पण

नागपूर : प्रतिनिधी हृदय विकाराचा झटका आल्यावर रुग्णांवर पहिल्या तासातच उपचार होण्याची आवश्यकता असते. स्टेमी महाराष्ट्र प्रकल्पामुळे पहिल्या तासात उपचार करणे शक्य होईल, असे आरोग्य मंत्री सार्वजनिक राजेश टोपे यांनी आज सांगितले. ‘जागतिक हृदय दिनी आज ‘स्टेमी महाराष्ट्र’ प्रकल्पाचे टोपे यांनी उपजिल्हा रुग्णालय, कामठी, नागपूर येथून व्हर्चुअल पद्धतीने उद्घाटन केले. त्यावेळी ते बोलत …

Read More »

पावसामुळे एमएच- सीईटी परिक्षा न देता आलेल्यांसाठी नव्या तारखा जाहिर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली घोषणा

मुंबई: प्रतिनिधी मागील दोन दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मराठवाड्यातील अनेक विद्यार्थ्यांना सीईटीची परिक्षा देता आली नाही. त्यामुळे हवालदिल झालेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सीईटी परिक्षा देता न आलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परिक्षा घेण्यात येणार असल्याची घोषणा सकाळी केली. त्यानंतर दुपारी यासंदर्भात पत्रकार परिषद घेत त्या …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या शब्दानंतर फडणवीस म्हणाले, “पोकळ शब्दांची नाही….” प्रत्यक्ष मदत देण्याची मागणी

मुंबई: प्रतिनिधी गुलाब चक्रीवादळामुळे विशेषत: मराठवाड्यात सतत दोन दिवस पडणाऱ्या पावसाचा फटका बसला असून येथील लाखो हेक्टर शेतजमिन पाण्याखाली गेल्याने हाताशी आलेली पीके गेल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपत्तीतून बाहेर काढणार असा शब्द देत धीर सोडू नका असे आवाहन केले. त्या आवाहनाचा धागा पकडत …

Read More »

जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाचे समूळ उच्चाटन करा पालघर जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी काँग्रेस कट्टीबद्ध : नाना पटोले

पालघर : प्रतिनिधी काँग्रेसचा विचार हाच देशाला, संविधानाला व सर्व जातीधर्माच्या लोकांना तारणारा आहे. काँग्रेसला इतिहास आहे व भविष्यही आहे. परंतु भारतीय जनता पक्षाकडे इतिहासही नाही आणि भविष्यही नाही. भाजपाने देश विकायला काढला असून डॉ. बाबासाहेब आंबडेकरांनी दिलेले संविधानही बदलण्याचा घाट घातला आहे, अशा भाजपाचे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये समूळ उच्चाटन …

Read More »

जयंत पाटलांचा कामाचा झपाटा; सकाळी ९ ते पहाटे ५, दिवस संपला दिवसभर अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी, कार्यकर्त्यांशी संवाद आणि विभागाचा आढावाही

बीड: प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील पक्षाच्या कार्यक्रमानिमित्त बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान सर्वांनाच त्यांच्या कामाचा झपाटा पाहायला मिळत असून पाटील यांचा सकाळी ९ वाजता सुरू झालेला दिवस दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता संपला. दिवसभरात अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी बीड, जालना, परभणी, औरंगाबाद आणि मराठवाड्यातील …

Read More »

ज्येष्ठ नागरिकांसाठी रोजगार एक्सचेंज, नवी नोकरी मिळणार १ ऑक्टोंबरपासून मिळणार नवा नोकर

मुंबई: प्रतिनिधी देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक खूशखबर आहे. सरकार ज्येष्ठ नागरिकांसाठी रोजगार एक्सचेंज सुरू करणार आहे. या एक्सचेंजद्वारे ज्येष्ठ नागरिकांना नवीन नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. हे एक्सचेंज १ ऑक्टोबरपासून सुरू होईल. याशिवाय सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक हेल्पलाइनही सुरू केली आहे. ज्येष्ठ नागरिकांना येणाऱ्या समस्यांचं निराकरण या हेल्पलाइनद्वारे केलं जाईल. देशात प्रथमच …

Read More »

भाजपामध्ये गेलेल्या लोकांना केंद्रीय एजन्सींचे संरक्षण आहे का?… राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा खोचक सवाल

अहमदनगर: प्रतिनिधी भाजपामध्ये गेलेल्या लोकांना सीबीआय, ईडी आणि आयकर विभाग या एजन्सींचे संरक्षण आहे का? आम्ही अशा लोकांची यादी देतो त्यांच्यावर ईडी काय कारवाई करणार असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अहमदनगर येथे आले …

Read More »

मुख्यमंत्र्यांनी दिला शेतकऱ्यांना शब्द, “आपत्तीतून बाहेर काढणार….” तातडीची सर्वतोपरी मदत पोहचविण्याचे प्रशासनाला निर्देश

मुंबई : प्रतिनिधी मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली, मात्र आम्ही सरकार म्हणून या शेतकऱ्यांच्या पाठीशी असून सर्वतोपरी मदत त्यांना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीचा जिल्हानिहाय आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत व पुनर्वसन विभागाकडून घेतला. कोणत्याही परिस्थितीत बाधित शेतकरी, …

Read More »