Editor

कोरोना : बाधितांपेक्षा ८५ टक्के घरी तर ९८५ मृतकांची नोंद ६३ हजार ३०९ नवे बाधित, ६१ हजार १८१ बरे झाले तर ९८५ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात आज चिंताजनक अशा मृतकांच्या संख्येची नोंद झाली असून हि नोंद तब्बल ९८५ जणांची आहे. तर ६३ हजार ३०९ नव्या बाधितांची नोंद झाल्याने राज्यातील अॅक्टीव्ह रूग्णांची ६ लाख ७३ हजार ४८१ वर पोहोचली आहे. मागील २४ तासात ६१ हजार १८१ रुग्ण बरे झाल्याने राज्यात आजपर्यंत एकूण ३७ लाख …

Read More »

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सुपुत्राचा अनोखा राजकिय प्रवेश स्वत:बरोबर आणखी पाच जणांच्या लसीचे पैसे मुख्यमंत्री फंडात जमा करणार

मुंबई: विशेष प्रतिनिधी राजकिय नेत्यांच्या सुपुत्रांचे राजकारणात प्रवेश हे ऐन निवडणूकीच्या काळात तरी होतात किंवा पक्ष संघटनेच्या पदावर नियुक्ती होवून तरी होतात. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतिक पाटील यांचा राजकारणात अनोख्या पध्दतीने प्रवेश केला असून मोफत लस घेतल्यानंतर स्वत:सह आणखी पाच जणांच्या लसीचे पैसे मुख्यमंत्री सहाय्यता …

Read More »

राज्याला ऑगस्ट महिन्यात या दोन परदेशी कंपन्यां करणार लसींचा पुरवठा ६ हजार ५०० कोटी रूपये खर्च करणार- आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यात मोफत लसीकरणाची मोहिम १ मे महाराष्ट्र दिनी जरी होणार नसली तरी पुढील सहा महिन्यात ५ कोटी ७१ लाख नागरीकांना लस देण्यात येणार आहे. त्यासाठी १२ कोटी लसींची आवश्यकता असून त्यासाठी ६ हजार ५०० कोटी रूपयांची तरतूद राज्य सरकारने केली असून ऑगस्ट महिन्यात जॉन्सन अँड जॉन्सन आणि झायडस …

Read More »

सीरम इन्स्टीट्युटने लसीच्या किंमतीत केली घट: राज्य सरकारला दिलासा अदार पुनावाला यांची ट्विटद्वारे माहिती

मुंबई: प्रतिनिधी देशात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी आता केंद्र सरकारबरोबरच राज्य सरकारकडूनही लसीच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. यापार्श्वभूमीवर सीरम इन्स्टीट्युटने आपल्या कोविशिल्ड या लसीच्या दरात १०० रूपयाने कपात करण्याचा निर्णय घेतला. तसेच या निर्णयाची अंमलबजावणी आज आणि आतापासून करण्यात येणार असल्याची माहिती सीरम इन्स्टीट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला …

Read More »

राज्यातील जनतेला मिळणार मॉडर्ना, फायझर, स्पुतनिक, जॉन्सन अँड जॉन्सन लस? परदेशी लसींच्या खरेदीच्या अनुषंगाने चाचपणी

मुंबई : विशेष प्रतिनिधी १ मे महाराष्ट्र दिनापासून राज्यातील १८ ते ४४ वर्षावरील नागरीकांचे मोफत लसीकरण सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून जरी घेण्यात आलेला असला तरी त्यासाठी लागणारा लसींचा पुरवठा सध्या तरी भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टीट्युटकडून उपलब्ध होणे शक्य होताना दिसत नाही. त्यामुळे राज्यातील जनतेसाठी अमेरिकन मॉर्डना,  फायझर, जॉन्सन …

Read More »

अखेर मुख्यमंत्री ठाकरेंची घोषणा ५.७१ कोटी जनतेला मिळणार मोफत लस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणाराज्यातील १८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील १८ ते ४४ या वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची घोषणा केली. लसीकरण कार्यक्रमाबाबत आरोग्य विभाग नियोजन करीत असून नागरिकांना याबाबत व्यवस्थित पूर्वसूचना देण्यात येईल, त्यामुळे लसीकरण केंद्रांवर अनावश्यक गर्दी करू नये …

Read More »

सर्व खाजगी, सरकारी रुग्णालयाचे फायर, स्ट्रक्चरल आणि ऑक्सिजन ऑडिट करा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे महापालिकांना निर्देश

मुंबई : प्रतिनिधी मुंबई महानगरातील खाजगी आणि सरकारी रूग्णालयांमध्ये आगीच्या घटना वारांवार घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर क्षेत्रातीलमधील सर्व महानगरपालिकांच्या अखत्यारीतील सरकारी आणि खाजगी रुग्णालयांचे फायर, स्ट्रक्चरल आणि ऑक्सिजन ऑडिट करण्याचे निर्देश आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. आगीच्या घटना टाळण्यासाठी हे ऑडिट त्रयस्थ तज्ञ संस्थेच्या माध्यमातून करण्याचे आदेशही …

Read More »

आभासी चित्र निर्माण करण्याचा गाफिलपणाही नको! आरटीपीसीआर चाचण्याचे प्रमाण वाढवा-देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर: प्रतिनिधी कोरोनाचे भय वाढणार नाही, याची काळजी घेतानाच आभासी चित्र निर्माण करण्याचा गाफिलपणा या काळात परवडणार नाही. त्यामुळे चाचण्यांच्या तुलनेत संसर्ग दर आणि अचूक बळीसंख्या यातूनच कोरोनाविरोधातील लढ्यासाठी योग्य आधार प्राप्त होऊ शकतो, असा सल्ला विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून दिला. गेल्यावर्षी …

Read More »

“मोफत लस” सरसकट कि फक्त आर्थिक दुर्बल घटकासाठी? मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे संकेत

मुंबई: प्रतिनिधी १८ वर्षावरील राज्यातील ५ कोटी ७१ लाख नागरीकांना लस देण्याची सुरुवात १ मे महाराष्ट्र दिनापासून सुरुवात होणार आहे. मात्र या वयोगटातील नागरीकांसाठी देण्यात येणारी लस ही केंद्र सरकारकडून मोफत देण्यात येणार की राज्य सरकारने त्यांच्या पैशातून द्यावे याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे राज्यातील जनतेला मोफत लस सरसकट किंवा फक्त …

Read More »

लस उपलब्ध झाली तरच लसीकरण १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी लसींची उपलब्धता हे आव्हान- आरोग्यमंत्री टोपे

मुंबई : प्रतिनिधी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात आज महाराष्ट्राने मैलाचा दगड रोवत दीड कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले आहे. याबद्दल आरोग्य यंत्रणनेचे अभिनंदन करतानाच दररोज ८ लाख लसीकरणाचे राज्याने उद्दिष्ट ठेवले असून त्याचा लसींचा पुरवठा वेळेवर व्हावा, अशी मागणी केंद्र शासनाकडे केल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील …

Read More »